International Yoga Day 2024 : योगा करताना मॅटचा वापर करणे का गरजेचे आहे? जाणून घ्या एक्सपर्टकडून

21 जून रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो. योगा करताना मॅट वापरणे का गरजेचे आहे ते जाणून घ्या.
International Yoga Day 2023
International Yoga Day 2023esakal

International Yoga Day 2023 : योगा केल्याने शरीर तंदुरुस्त राहाते. सोबतच शरीर लवचिकसुद्धा बनते. हल्ली लोक हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. त्यामुळे योगाबाबतही लोकांमध्ये जागृकता वाढत चालली आहे. योगा करतना मॅटचा वापर केला जातो. याशिवाय योगासनादरम्यान शरीराला पूर्ण आधार मिळावा यासाठी खास डिझाइन आणि मटेरियलपासून योगा मॅट्स बनवल्या जातात. 21 जून रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो. योगा करताना मॅट वापरणे का गरजेचे आहे ते जाणून घ्या.

योगा करताना योगा मॅटचा वापर का गरजेचा आहे याबाबत लखनऊचे रवींद्र योगा क्लिनिकच्या एक्सपर्ट डॉ. प्रिया श्रीवास्तव यांच्याकडून जाणून घेऊया.

सर्वात आधी त्या सांगतात की मॅटऐवजी चुकूनही बेडचा वापर करू नका. बेडची गादी झोपण्यासाठी आरामदायी असली तरी योगा करण्यासाठी योग्या नाही. तुम्ही योगा मॅटची तुलना बेडवरील गादीशी करू शकत नाही. चला तर जाणून घेऊया योगा करताना मॅट वापरण्याचे फायदे.

योगा करण्यासाठी मॅट का गरजेची आहे?

काही योगासने करण्याची प्रक्रिया अवघड असते. अशा परिस्थितीत मॅटशिवाय योगासने केल्यास दुखापत होण्याची भीती असते.

ज्या लोकांचे वजन जास्त आहे ते योगासने करताना त्यांचे संतुलन डगमगण्याची शक्यता असते. अशा स्थितीत त्यांनी योग्य पकड ठेवण्यासाठी मॅटचा वापर करावा.

जे लोक साठीच्या पुढे आहेत त्यांची हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा स्थितीत शरीर स्थिर ठेवून योगासने करणे थोडे कठीण जाते. अशावेळी मॅटवर योगासने केल्याने शरीराचा समतोल राखला जातो आणि स्नायूंवर कोणताही ताण येत नाही.

योगासने करताना शरीरातून घाम येतो. घामामुळे योगा करताना तुम्ही घसरू शकता. अशा वेळी मॅटचा वापर फायदेशीर ठरतो.

International Yoga Day 2023
Yoga for Skin: निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी करा ही चार योगासने

मॅटशिवाय योगाभ्यास करता येत नाही का? योगा मॅट का महत्त्वाची आहे?

योगतज्ज्ञ डॉ.प्रिया श्रीवास्तव यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे मॅट नाही किंवा ज्यांना मॅट वापरायची नाही, ते त्याशिवाय योग करू शकतात.

जुन्या काळात मॅट इतके लोकप्रिय नव्हते. ज्यांना योगाभ्यासाचा सराव आहे, त्यांच्यासाठी समतोल साधणे अवघड नाही. मात्र आता सुविधेनुसार सगळीकडे मॅट उपलब्ध आहे. यामुळे तुमच्यासाठी योगाभ्यास सुलभ होईल. आपण इच्छित असल्यास, आपण चटई शिवाय योगाभ्यास करू शकता. (Health & Fitness)

International Yoga Day 2023
PM Modi Yoga : योगदिनाच्या आधीच आला पंतप्रधान मोदींचा खास Video; आसनांचे दाखवले प्रात्यक्षिक

मॅट निवडताना कशी निवडावी?

मॅट तुमच्या शरीराला योगादरम्यान आधार देण्याचे काम करते. खूप पातळ किंवा जाड मॅट योगाभ्यासासाठी चांगली मानली जात नाहीत. लक्षात ठेवा की मॅट जाडी 1.5 इंचांपेक्षा जास्त नसावी.

कॉटन मॅट घसरण्याची शक्यता जास्त असते, म्हणून रबर मॅट खरेदी करा. पण ते देखील स्वच्छ करावे लागेल कारण रबर मॅट्सला लवकर खराब होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com