Cat-Cow Pose: पाठ अन् कंबरेच्या वेदनेपासून सुटका हवीय? मग 'या' आसनाचा करा सराव

जागतिक योग दिनानिमित्त जाणून घेऊया Cat-Cow Pose कसा करावा आणि त्याचे फायदे कोणते आहेत.
Cat-Cow Pose
Cat-Cow PoseSakal
Updated on

International Yoga Day 2024: योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अनेक लोकांना दिवसभर थकवा, आळसपणा आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर या आसनाचा सराव करू शकता. त्याचा शरीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी सकाळी 10 मिनिटे काढून मार्जारासन-बितलासन योग करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया याचे फायदे कोणते आहेत.

मार्जारासन-बितलासन योग

सकाळी उठल्यानंतर अनेकांना कंबरदुखी, अंगदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना होतात. सकाळी उठल्यानंतर योगा करणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर मार्जारासन-बितलासन करावे. बिटिलासन म्हणजे गायीची मुद्रा, याला गाय मुद्रा असेही म्हणतात. मार्जारासनाला मांजरीची मुद्रा म्हणतात. या योगासनाचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमच्या मणक्याच्या आणि पाठीच्या वेदना कमी होऊन स्नायून लवचिक होतात.

मार्जारासन-बितलासन योगाचे फायदे

जे लोक लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम करतात त्यांना मान आणि पाठदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.

हा योग केल्याने शरीर आणि मन दोन्ही शांत राहते. यामुळे तुम्ही कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता.

तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. हा योग नियमित केल्यास अनेक प्रकारचे आजार दूर राहतात.

या योग तुमची मुद्रा सुधारेल आणि आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

पाठदुखीपासून आराम मिळेल आणि पाठीचा कणा मजबूत होईल.

तसेच तणावही कमी होतो आणि मुख्य स्नायू मजबूत होतात आणि शरीरात स्थिरता वाढते.

यामुळे हात, खांदे आणि मनगट दुखण्यापासून आराम मिळतो.

यामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि नितंब, गुडघ्याचे सांधे आणि खांद्याचे सांधे दीर्घकाळ मजबूत राहतात.

या योगासनाचा नियमितपणे सराव केल्यास चांगली झोप येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.