International Yoga Day 2024: योगासनांचा सराव करण्यापुर्वी अन् नंतर टाळा 'या' चुका

International Yoga Day: योगा करताना काही चुका आरोग्यासाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरू शकतात.
International Yoga Day:
International Yoga Day:Sakal
Updated on

International Yoga Day 2024: योग दिन हा २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचा मगचा उद्देश म्हणजे लोकांना यागाचे फायदे आणि महत्व सांगणे आहे. योग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सुर्यनमस्कार, भुजंगासन,प्राणायाम यासारखे अनेक योगासनांचा सराव करण्याची सवय लावतात. योग दिनानिमित्त अनेक लोक योगा करायला सुरुवात करतात. पण ते चुकीच्या पद्धतीने करतात. योगा करताना काही चुका आरोग्यासाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरू शकतात. यामुळे कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

घट्ट कपडे घालू नका

योगासन किंवा जिममध्ये घट्ट कपडे घालू नका. योगा करताना आरामदायक कपडे घालावे. उन्हाळ्यात हलक्या रंगाच्या सुती कपड्यांमध्ये योगासने करावे. यामुळे शरीराला आराम मिळेल आणि योगसाधना करताना तुम्ही एकाग्र होऊ शकाल.

योगानंतर लगेच आंघोळ करू नका

योगा केल्याने शरीराची ऊर्जी खुप खर्च होते. तसेच शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर लगेच आंघोळ करू नका. यामुळे सर्दी- खोकला सारखे आजार होऊ शकतात.

International Yoga Day:
Yoga Tips: बेंच प्रेस व्यायाम केल्याने शरीर राहते लवचिक अन् हाडं होतात मजबूत

योगा केल्यानंतर पाणी पिऊ नका

योगासन केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. योगानंतर पाणी प्यायल्याने कफची समस्या उद्भवू शकते. यामुळे योगासने केल्यानंतर काही वेळ वाट पाहिल्यानंतरच पाणी प्यावे.

योगानंतर काही खाऊ नका

योगासनांचा सराव केल्यानंतर लगेच काही खाऊ नका. योगासन केल्यानंतर किमान अर्ध्या तासानेच काही पदार्थांचे सेवन करावे. योगा करण्यापुर्वी काही खाऊ नका. कारण यामुळे पचन बिघडू शकते.

आजारी असल्यास योगा करू नका

तुम्ही रोज योगा करत असाल तर ते आरोग्यासाठी चांगले आहे. पण आजारी असाल तर योगा करणे टाळा. कारण आजारपणात आधीच थकवा जाणवतो आणि तुम्ही योगा केला तर अधिक थकल्यासारखे वाटते. यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योगासन करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.