International Yoga Day 2024: आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनलाच का साजरा केला जातो? काय आहे यंदाची थीम? घ्या जाणून

10th International Day of Yoga theme: "Yoga for self and society": भारताने जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला.
International Yoga Day 2024
International Yoga Day 2024esakal
Updated on

International Yoga Day 2024 : प्राचीन योगविद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळाला आहे. योगा हे जणू भारताला मिळालेले मोठे वरदान आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. भारताने जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला. योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे.

जगभरातील लोकांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत योग दिनाचा प्रस्ताव मांडला.

त्यानंतर, हा प्रस्ताव स्विकारण्यात आला आणि योग दिनासाठी २१ जून ही तारीख निवडण्यात आली, तेव्हापासून आजतागायत हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

२१ जून रोजी हा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय आहे? आणि योग दिनाचा इतिहास काय? ते जाणून घेणार आहोत.

International Yoga Day 2024
International Yoga Day 2024 : महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने, दररोज सराव केल्याने मिळतील भरपूर फायदे

२१ जूनलाच योग दिन का साजरा केला जातो?

२१ जूनलाच हा योग दिन का साजरा केला जातो? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनलाच साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. ज्याला ग्रीष्म संक्रांती असे ही म्हटले जाते.

विशेष म्हणजे हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. या दिवसानंतर सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. त्यामुळे, योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळेच, २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची यंदाची थीम काय?

दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक विशिष्ट थीम ठरवली जाते. ही थीम घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदाच्या आतंरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘स्वत: साठी आणि समाजासाठी योग’ (Yoga For Self And Society) अशी आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास काय?

सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा २१ जून २०१५ मध्ये साजरा करण्यात आला. या दिवशी जगभरातील असंख्य लोकांनी एकत्रितपणे योगाचा सराव केला. दिल्लीतील राजपथावर झालेल्या या योग कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सहभागी झाले होते.

त्यापूर्वी, २७ सप्टेंबर २०१४ रोजी प्रथमच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव ११ डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने स्विकारला होता. त्यानंतर, दरवर्षी २१ जून रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

International Yoga Day 2024
International Yoga Day 2024 : योग दिनानिमित्त करा ‘ही’ सोपी योगासने, दररोज सराव केल्याने मिळतील भरपूर फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.