International Yoga Day 2024 : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि व्यायाम करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. योगामुळे मानसिक आणि शारिरीक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे योगा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण नियमितपणे योगा करू शकतात.
जगभरात दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांमधील नागरिक एकत्रितपणे योगासनांचा सराव करतात आणि निरोगी राहण्याची शपथ घेतात. योगाला प्राचीन इतिहास लाभला असून भारताला मिळालेले ते मोठे वरदान आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. भारताने जगाला योगाचे महत्व पटवून दिले आणि जागतिक स्तरावर योग दिन साजरा करण्यास सुरूवात केली.
या योग दिनानिमित्त जर तुम्ही पहिल्यांदाच योगा करणार असाल तर, सोप्या योगासनांचा सराव करा. आज आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच योगा करणाऱ्या लोकांसाठी सोप्या आणि फायदेशीर योगासनांबद्दल सांगणार आहोत. कोणती आहेत ती योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.
उत्तानासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. हे योगासन करायला देखील अतिशय सोपे आहे. या योगासनाचा सराव करताना शरीर खालील बाजूला झुकते, त्यामुळे, रक्तप्रवाह सरळ पायांकडे जाण्याऐवजी मेंदूकडे सुरू होतो. परिणामी मेंदूपर्यंत रक्त आणि ऑक्सिन चांगल्या प्रमाणात पोहोचू लागतो.
मानसिक आणि शारिरीक आरोग्य सर्वोत्तम ठेवण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर मानले जाते. हे योगासन केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम मानले जाते. या आसनाचा सराव केल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरणाचा प्रवाह सुरळीत राहतो. ज्यामुळे, केसांचे उत्तम पोषण होते. केसांसोबतच हे योगासन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
भूजंगासन हे योगासन पाठीचा कणा बळकट करण्यासाठी आणि झोपेच्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाचा सराव केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य सुधारण्यास मदत होते. या आसनात आपल्या शरीराची मुद्रा ही सापासारखी असते. त्यामुळे, या योगासनाला भूजंगासन किंवा सर्पासन असे ही म्हटले जाते.
या आसनाचा सराव केल्याने पाठीचे स्नायू मजबूत होतात. पचन, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. तसेच, तणाव आणि थकवा ही दूर करण्यासाठी हे योगासन लाभदायी आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.