International Yoga Day 2024 : गरोदरपणात योगा करताना महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? वाचा एका क्लिकवर

International Yoga Day 2024 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
International Yoga Day 2024 :
International Yoga Day 2024 :esakal
Updated on

International Yoga Day 2024 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नियमित योग केल्याने आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तसेच, योगाभ्यास केल्याने आजारांशी लढण्याची शारिरीक क्षमता मजबूत होते. विशेष म्हणजे विविध प्रकारच्या आजारांसाठी तुम्ही योगाचे विविध प्रकार करू शकता. सर्व वयोगटातील व्यक्ती योगाचा सराव करू शकता.

जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिच्यासाठी देखील योग करणे फायदेशीर आहे. कारण, या स्थितीत योगा केल्याने त्याचा बाळाला ही फायदा होतो आणि आईचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

परंतु, या अवस्थेत योगा करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी? आज योग दिनानिमित्त आम्ही तुम्हाला गरोदरपणात योगा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? त्याबद्दल सांगणार आहोत.

International Yoga Day 2024 :
International Yoga Day 2024 : योग शिकण्यासाठी देश-विदेशातील लोक भारतातील 'या' प्रसिद्ध ठिकाणांना देतात भेट

गरोदरपणात कोणता योगा करावा?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरोदर असताना महिलांनी योगा करताना सर्व प्रकारची योगासने करू नयेत. महत्वाची बाब म्हणजे प्रशिक्षित योग प्रशिक्षकाच्या किंवा योग तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच योगाचा सराव करावा. या स्थितीमध्ये पोटावर दाब आणणारी आणि पोट ताणणारी योगासने करणे टाळा. गरोदर महिलांनी चक्रासन, भूजंगासन, हलासन, धनुरासन इत्यादी आसने करू नयेत.

गरोदरपणात योगा करताना काय काळजी घ्यायची?

  • गरोदर महिला पहिल्या तीन महिन्यांमध्ये उभी राहून केलेली योगासने करू शकते. परंतु, यासाठी तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

  • त्यानंतर, योगासने तुम्ही करू शकता. सुरूवातीच्या ३ महिन्यांमध्ये अशा प्रकारची आसने करा की, जेणेकरून तुमच्या पायांच्या स्नायू मजबूत होतील आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल. अशा प्रकारच्या आसनांचा सराव केल्याने तुमच्या पायांची सूज आणि जडपणाही कमी होऊ शकतो.

  • गर्भधारणेच्या तीन महिन्यानंतर महिलांनी थकवा देणारी किंवा खूप जोर देऊन करावी लागणारी योगासने टाळावीत. या काळात गरोदर महिला प्राणायाम आणि ध्यानाचा सराव नक्कीच करू शकतात.

  • त्यानंतर, गरोदरपणाच्या चौथ्या आणि पाचव्या महिन्यात योगासनांचा सराव करणे बंद करा. कारण, हा कालावधी प्रत्येक महिलेसाठी महत्वाचा आणि नाजूक असतो. त्यामुळे, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योगासनांचा सराव करा.

  • एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या की, गरोदर महिलेसाठी ही गर्भावस्था अतिशय नाजूक असते. त्यामुळे, कोणताही योगा, व्यायाम करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, योगगुरूंच्या मार्गदर्शनाखालीच योगासनांचा सराव करा. इंटरनेट किंवा युट्यूबचा वापर अजिबात करू नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

International Yoga Day 2024 :
International Yoga Day 2024 : महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने, दररोज सराव केल्याने मिळतील भरपूर फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.