Breast Milk : दूध प्यायल्याने आईचं दूध वाढतं का ?

आईचे दूध वाढवण्यासाठी नवीन आईने जास्त दूध पिण्याची गरज नाही. दुधामध्ये कॅल्शियमसह अनेक पोषक घटक असतात, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Breast Milk
Breast Milkgoogle
Updated on

मुंबई : आई होणे ही खूप सुंदर भावना आहे. जेव्हा एखादी महिला आई बनणार असते तेव्हा तिला गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर विविध प्रकारचे सल्ले दिले जातात. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या नवीन आई आणि मुलाच्या आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात.

गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरचा प्रवास प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असतो. म्हणूनच कोणत्याही सल्ल्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. स्तनपानाबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि त्यावर विश्वास ठेवला जातो. (is it necessary to drink milk to increase breast milk)

नवीन मातांना देखील आईचे दूध वाढवण्यासाठी अधिक दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण जास्त दूध पिल्याने खरंच आईचे दूध वाढते का ? डायटीशियन राधिका गोयलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

Breast Milk
Food Storage : अंडी फ्रीजमध्ये ठेवताय ? या गोष्टींची काळजी घ्या

आईचे दूध वाढवण्यासाठी जास्त दूध प्यावे का ?

तज्ज्ञांच्या मते, आईचे दूध वाढवण्यासाठी नवीन आईने जास्त दूध पिण्याची गरज नाही. दुधामध्ये कॅल्शियमसह अनेक पोषक घटक असतात, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. पण आईचे दूध वाढवण्यासाठी त्याचे सेवन करण्यात काहीच अर्थ नाही.

आईच्या दुधाचा पुरवठा तुम्ही तुमच्या बाळाला दिवसातून किती वेळा पाजता याच्याशी थेट संबंधित आहे. तुमचे बाळ जितके जास्त फीड करेल, तितका तुमचा दुधाचा पुरवठा त्यानुसार वाढेल.

Breast Milk
Hair Stylist : हेअर स्टायलिस्ट म्हणून करिअर कसं कराल ?

स्तनपान करताना आईचा आहार

स्तनपान करताना, नवीन आईने तिच्या आहाराची खूप काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जे काही खाता ते तुमच्या बाळावर थेट परिणाम करेल. आहारात पाणी, नारळपाणी, ताजे रस किंवा इतर आरोग्यदायी पेये सेवन करणे आवश्यक आहे. स्तनपान देणाऱ्या आईने निरोगी आहार योजना पाळली पाहिजे, जी तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार असेल.

यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. हिरव्या पालेभाज्या, प्रथिने आणि फायबरयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. तसेच, जास्त वेळ उपाशी राहणे टाळा. आईचे दूध वाढवण्यासाठी काही नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.