Tomato Side Effect : टोमॅटोचे अतिसेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

किडनी स्टोनबाबत अनेक प्रकारचे समज इंटरनेट आणि सोशल मीडियावरही पसरतात. टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोकाही वाढतो, असेही म्हटले जाते.
Tomato Side Effect
Tomato Side Effectesakal
Updated on

Health Tips : दैनंदित जीवनातील गडबड आणि अनियंत्रित आहार यामुळे लोकांमध्ये किडनी स्टोनची समस्या सामान्य झाली आहे. किडनी स्टोनमुळे रुग्णाला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. किडनी स्टोन असल्यास अनेक गोष्टींचे सेवन टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

या आजारामध्ये, कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. किडनी स्टोनबाबत अनेक प्रकारचे समज इंटरनेट आणि सोशल मीडियावरही पसरतात. टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोकाही वाढतो, असेही म्हटले जाते. मात्र हा समज किती खरा किंवा खोटा आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.

टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन होतो का?

टोमॅटो भारतीय जेवणातील प्रत्येक भाजीत असतोच. टोमॅटोमध्ये असलेले पोषक तत्व आणि गुणधर्म देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, पोटॅशियम आणि प्रोटिन यांसारख्या पोषक तत्वांचे पुरेसे प्रमाण शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.

प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात टोमॅटोचा वापर कोणत्या ना कोणत्या प्रकारे केला जातो. पण असे म्हणतात की टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. काही लोकांचा असा विश्वास आहे की टोमॅटोच्या बिया खाल्ल्याने तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो.

आरोग्य हेल्थ सेंटरचे क्लिनिकल डायटीशियन डॉ. व्हीडी त्रिपाठी सांगतात की, सोशल मीडिया आणि इंटरनेटवर टोमॅटो खाण्याबाबत अनेक अफवा दिसून येतील. असा दावा केला जातो की टोमॅटोच्या लहान बिया किडनी स्टोनला कारणीभूत ठरतात.

Tomato Side Effect
Kidney Stones Remedies : किडनी स्टोनच्या त्रासाची करा सुट्टी; या 6 गोष्टी करतील मदत!

डॉ. त्रिपाठी म्हणतात की, कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो. टोमॅटोमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट देखील आढळते. पण टोमॅटोमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण खूप कमी असते आणि या प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोन होत नाही. सुमारे 100 ग्रॅम टोमॅटोमध्ये फक्त 5 ग्रॅम ऑक्सलेट आढळते.

त्यामुळे टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन होऊ शकतो असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. किडनीशी संबंधित समस्यांमध्ये टोमॅटो खाणे फायदेशीर आहे. जर तुम्हाला किडनी स्टोन किंवा किडनीशी संबंधित कोणताही आजार असेल तरीसुद्धा तुम्ही टोमॅटोचे सेवन अगदी न घाबरता करू शकता. (Calcium)

Tomato Side Effect
Kidney Stone : मुलांना किडनी स्टोन होऊ नये म्हणून त्यांच्या आहारातून आजच वगळा हे पदार्थ

किडनी स्टोन कसा तयार होतो?

आहारातील फास्ट फूड आणि चुकीची जीवनशैली यामुळे कोणत्याही व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. दिल्ली एनसीआरचे प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. नितीन श्रीवास्तव यांच्या मते, किडनी स्टोन हे खरे तर तुमच्या मूत्रपिंडातील खनिजे आणि सोडियम (मीठ) यांचे स्फटिक असतात. (Health News)

त्यांचा आकार प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो. किडनी स्टोन हे सहसा चार प्रकारचे असतात - युरिक ऍसिड, कॅल्शियम ऑक्सलेट, स्ट्रुविट आणि सिस्टिन. किडनी स्टोन तयार झाल्यानंतर हे खडे किडनीमध्येही राहू शकतात आणि मूत्रमार्गातही जाऊ शकतात. किडनी स्टोनच्या समस्येवर सुरुवातीला उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुम्हालाही किडनी स्टोनची लक्षणे दिसली तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.