Hair Care Tips: महागड्या हेअर ट्रिटमेंटमध्ये वापरलं जाणारं हे व्हिटामीन, फुकटात मिळतं या दोन पदार्थात

या ट्रिटमेंट मध्ये सुद्धा ते व्हिटॅमिन बी 12 चा वापर करतात अन् आपण त्यात खूप पैसे वायाला जातात
Hair Care with Vitamin B12
Hair Care with Vitamin B12esakal
Updated on

Hair Care with Vitamin B12 : व्हिटॅमिन बी 12 शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यात आणि मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करते. पण, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण याच्या कमतरतेमुळे केस झपाट्याने गळतात आणि पांढरे होऊ लागतात.

अशात, केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक पार्लरच्या ट्रिटमेंट करुन घेतो. या ट्रिटमेंट मध्ये सुद्धा ते व्हिटॅमिन बी 12 चा वापर करतात अन् आपण त्यात खूप पैसे वायाला जातात. पण हे व्हिटॅमिन बी 12 नक्की मिळतं कशात? चला जाणून घेऊया व्हिटॅमिन बी 12 नैसर्गिकरित्या कसे मिळवावे?

व्हिटॅमिन बी 12

व्हिटॅमिन बी 12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशी (RBCs) तयार करण्यासाठी याची मदत करते.

या पेशी तुमच्या केसांच्या कूपांना खाद्य देतात. तुमच्या केसांच्या कूपमधील पेशी जिवंत असतात. त्यामुळे केस कापताना तुम्हाला काहीही वाटत नाही. परंतु केस मुळांपासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला वेदना होतात.

Hair Care with Vitamin B12
Hair Growth : दीपिका सारखे सिल्की सिल्की केस हवेत? फार काही नाही ट्राय करा हा एकमेव पदार्थ...

तुम्हाला केस गळणे तसेच राखाडी केसांचा त्रास होत असेल, तर तुमच्यात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता आहे, हे समजून जा. तुमच्या शरीरातील या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे थकवा, ऊर्जेचा अभाव, चिंता आणि चक्कर येऊ शकते.

तुमची त्वचा पिवळी झाली असेल, मूडमध्ये बदल होत असेल किंवा तुम्हाला दृष्टीमध्ये काही अडचण येत असेल, तर शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता आहे. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन व्हिटॅमिन बी-12 ची पातळी तपासा.

Hair Care with Vitamin B12
Curry Leaves For Hair : केसांवर सतत केमिकल लावण्यापेक्षा एकदा कडिपत्त्याचा मास्क लावून बघाच!

केसांसाठी व्हिटॅमिन बी 12 असलेले पदार्थ

1. अंडी

अंडी हे प्रथिने आणि बी12 चा उत्तम स्रोत आहे. दोन मोठ्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण 46% असते. अंड्यातील पांढऱ्यापेक्षा अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची पातळी जास्त असते.

खरं तर, केसांना अंड्यातील पिवळ बलकमध्ये असलेले बी 12 शोषून घेणे देखील सोपे आहे. त्यामुळे जर तुमचे केस निस्तेज आणि फ्रिजी असतील तर एक अंड घ्या आणि त्यात कोरफड टाकून छान मिक्स करुन नंतर केसांना लावा. अर्धा तासानंतर शॅम्पूने धुवून टाका.

Hair Care with Vitamin B12
Hair Care : केसांमध्ये घाम येण्याची कारणे आणि उपाय

2. दही

दही तुमच्या केसांसाठी अनेक प्रकारे काम करते, त्यापैकी एक म्हणजे ते तुमच्या केसांना मऊ बनवून त्यात जिवंतपणा आणते.

दह्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमच्या केसांमधील कोंड्याची समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे दही घ्या आणि त्यात लिंबू पिळा आणि नंतर केसांना लावा. 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर आपले केस पाण्याने धुवा आणि शॅम्पू करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.