Health : हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी 6 सोपे मार्ग; एकदा वापरुन पहा, फरक जाणवेल

सुजलेल्या हिरड्या, खराब किडलेले दात ही सर्व तोंडातील आरोग्य बिघडले असल्याचे लक्षण आहे.
Health : हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी 6 सोपे मार्ग; एकदा वापरुन पहा, फरक जाणवेल
Updated on
Summary

सुजलेल्या हिरड्या, खराब किडलेले दात ही सर्व तोंडातील आरोग्य बिघडले असल्याचे लक्षण आहे.

आपल्या निरोगी आरोग्याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तोंडाची आणि दात, हिरड्या यांचीही स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. सुजलेल्या हिरड्या, खराब किडलेले दात ही सर्व तोंडातील आरोग्य बिघडले असल्याचे लक्षण आहे. दरम्यान, यावर अनेक उपाय आहेत, त्यांचा वापर करुन त्यांच्यावकर योग्य ते उपचार केले जाऊ शकतात.

नियमितपणे दातांची तपासणी करून घेण्याव्यतिरिक्त हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे आवश्यक असते. दिवसातून दोनदा ब्रश करणे अशा काही चांगल्या सवयी लावून घेणे आरोग्यासाठी गरजेचे असते. परंतु हिरड्यांचे आजार टाळण्यासाठी काही मार्ग जाणून घेणे आणि त्यांचे पालन करणे हेही महत्वाचे आहे. आज आपण असे काही मार्ग जाणून घेणार आहोत.

Health : हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी 6 सोपे मार्ग; एकदा वापरुन पहा, फरक जाणवेल
Recipe : पान आइस्क्रीम कसे तयार करावे?, पहा हेल्दी आणि सोपी रेसिपी

ऑईल पुलिंगचा अभ्यास करा

मौखिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी ऑईल पुलिंग करणे ही आयुर्वेदातील लोकप्रिय पद्धतींपैकी एक आहे. सकाळी उठल्यावर नारळ किंवा ऑलिव्ह किंवा तिळाचे तेल 15 मिनिटे दात न घासता तोंडात लावल्याने हिरड्यांना खराब होण्यापासून आळा बसतो. तुम्हाला चांगल्या आणि आरोग्यदायी हिरड्या राहण्यासाठी फायदा होतो. आरोग्यासाठी काही हानिकारक पदार्थांपासून तोंड स्वच्छ करण्यासाठी याची मदत होते. हे आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते.

कडुलिंब वापरा

हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या डहाळ्यापासून ते पानापर्यंत वापर केला जातो. अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, जंतुनाशक कडुलिंब हिरड्या मजबूत करण्यासाठी, रक्तस्त्राव थांबवण्यास, प्लेक तयार करण्यासाठी वापरला जातो. तसेच हिरड्यांना आलेली सूज रोखण्यासाठी आणि दातांना मुलामा चढवण्यासाठीही याचा वापर केला जातो हे सिद्ध झाले आहे.

Health : हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी 6 सोपे मार्ग; एकदा वापरुन पहा, फरक जाणवेल
Vastu Tips : स्वयंपाकघरात 'या' वस्तू अजिबात ठेवू नका; अन्यथा होईल मोठे नुकसान

टी ट्री ऑईल

अत्यावश्यक टी ट्री ऑईल असलेली टूथपेस्ट निवडा. हे हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. हे तेल वापरत असताना, तेल थेट अविभाज्य स्वरूपात वापरले जाणार नाही, याची काळजी घ्या.

क्रॅनबेरी वापरा

पीरियडॉन्टायटीसशी संबंधित जळजळ क्रॅनबेरीच्या वापराने बरे होऊ शकते, असे एका संशोधनात समोर आले आहे. बॅक्टेरिया दातांना चिकटण्यापासून दूर ठेवण्यासाठी चांगले आहेत.

व्हिटॅमिन सी

द्राक्षे, संत्री, किवी, आंबा, पपई, स्ट्रॉबेरी, लाल मिरची, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि कॅनटालूपमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी हिरड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन सी तुम्हाला पीरियडॉन्टल रोगाचा धोका कमी करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.