Keto Diet : किटो डाएटमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो असे एका अभ्यासातून पुढे आले आहे. याबाबत कॅनडाच्या डॉक्टरांनी बातमी प्रकाशित केलीय. "आमच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की लो कार्बोहायड्रेट आणि हा प्रोटीनयुक्त आहाराचा नियमित वापर LDL कोलेस्ट्रॉलची किंवा "खराब" कोलेस्टेरॉलची शरीरातील पातळी वाढवते. आणि ही समस्या हृदयविकाराचा धोका वाढण्याशी संबंधित आहे.असे कॅनडातील प्रमुख अभ्यास लेखक डॉ. युलिया हेल्दी हार्ट प्रोग्रॅम प्रिव्हेन्शन क्लिनिक, व्हँकुव्हर येथील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या सेंटर फॉर हार्ट लंग इनोव्हेशनसह इटानने एका बातमीत म्हटले आहे.
या अभ्यासात किटो डाएटबाबत काही चाचण्या करण्यात आल्या. कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढण्यामागे या आहाराचा समावेश असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. रक्तातील हाय किटोन लेव्हल असलेल्या व्यक्तींमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका जास्त असतो.
अभ्यासात, संशोधकांनी लो कार्बोहायड्रेट, हाय फॅट (LCHF) आहाराची व्याख्या केली आहे की, एकूण दैनंदिन कॅलरीजपैकी 45% चरबीमधून येतात आणि 25% कार्बोहायड्रेट्समधून येतात. हा अभ्यास रविवारी अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या वार्षिक वैज्ञानिक सत्रात वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डिओलॉजीसह सादर करण्यात आला.
क्लिनिकमध्ये हायपरकोलेस्टेरोलेमिया असलेल्या रूग्णांच्या आहारावर अभ्यास करण्यात आला.
हायपरकोलेस्टेरोलेमिया, किंवा उच्च कोलेस्टेरॉल, एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा इतर प्रतिकूल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांचा धोका वाढवते.
किटो डाएटमुळे म्हणजो लो कार्ब, हाय प्रोटीन डाएटचा संबंध हृदय व रक्तवाहिन्यांसंबधी रोगांशी असल्याचे दिसून आले.
संशोधकांना असे आढळून आले की LCHF(लो कार्ब्स अँड हाय फायबर) आहारातील लोकांमध्ये कमी-घनतेच्या लिपोप्रोटीनची पातळी जास्त असते, ज्याला LDL, कोलेस्टेरॉल आणि apolipoprotein B म्हणूनही ओळखले जाते. Apolipoprotein B हे प्रोटीन आहे जे LDL कोलेस्टेरॉल प्रथिनांना लेप देते आणि LDL कोलेस्टेरॉलच्या वाढीव पातळीपेक्षा हृदयरोगाचा चांगला अंदाज लावू शकतो.
संशोधकांनी हे देखील लक्षात घेतले की एलसीएचएफ आहारातील सहभागींच्या एकूण चरबीचे सेवन सॅच्युरेटेड फॅटमध्ये जास्त होते आणि नियंत्रण गटातील (16%) तुलनेत प्राणी स्त्रोतांचा (33%) वापर दुप्पट होता.
“सरासरी 11.8 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि धूम्रपान यासारख्या हृदयविकाराच्या इतर जोखीम घटकांच्या समायोजनानंतर एलसीएचएफ आहार घेतलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका दुप्पट होता. अनेक प्रमुख हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटना, जसे की धमन्यांमधील अडथळे, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांसारख्या समस्या अभ्यासकांना दिसून आल्यात.
हा अभ्यास किटो डाएट आणि हृदयविकार यांचा संबंध दर्शवणारा होता. या अभ्यासातून किटो डाएट फॉलो करणाऱ्या दर ५ पैकी १ व्यक्ती हा हृदयविकाराच्या समस्यांनी त्रस्त असल्याचे दिसून येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.