Kidney Health : या आजारांपासून बचाव करण्यासाठी अशी घ्या किडनीची काळजी, जाणून घ्या टिप्स

किडनीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर तुम्हाला कोणत्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.
Kidney Health
Kidney Healthesakal
Updated on

Kidney Health : किडनी हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे, जे आपल्या शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून स्वत:ला दूर ठेवू शकता. किडनीच्या आजाराला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात. कारण किडनीसंबंधित आजाराची सुरुवातीची लक्षणे नीट दिसत नाहीत.

त्यामुळे किडनीची काळजी घेणे आणि सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया किडनीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर तुम्हाला कोणत्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.

  • किडनीमध्ये त्रास झाल्यास कमकुवतपणा येणे फार सामान्य आहे. तुम्हाला कुठल्याही कामानंतर थकवा जाणवेल.

  • किडनीमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास सुरुवातीला पायांच्या टाचा आणि पायांमध्ये सूजन जाणवते.

  • किडनी डॅमेज झाल्यास भूक कमी लागते. यूरिया क्रिएटिनिन, अॅसिड यांसारखे टॉक्झिक पदार्थ शरीरात जमा होऊ लागते. ज्यामुळे तुमच्या अॅपेटाइट आणि टेस्टवर प्रभाव पडतो.

  • किडनीचा त्रास झाल्यास पायांच्या टाचा फार दुखायला लागतात. त्यामुळे डोळ्यांच्या अवतीभवती सूज आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. आणि सेल्समध्ये लिक्विड कॉम्बिनेशनला जबाबदार ठरते.

  • किडनीच्या समस्या उद्भवल्यास अस्वस्थ वाटणे, उलटी येणे यांसारख्या आजाराचे संकेत दिसून येतात.

Kidney Health
Kidney Stone Ayurvedic Treatment : या आयुर्वेदीक वनस्पतीमुळे किडनी स्टोन बर्फासारखा वितळेल; ट्राय करून बघा!

किडनीची अशी काळजी घ्या

1. किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे मूत्रपिंडाद्वारे शरीरातून युरिया आणि सोडियमसारखे विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

2. तुमची किडनी निरोगी ठेवण्यासाठी वेळोवेळी कोलेस्ट्रॉलची पातळी तपासत राहा. यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट आवश्यक आहे. (Health)

Kidney Health
Kidney Cancer बरा होवू शकतो का? काय आहेत लक्षणं? जाणून घ्या उपचार पद्धती

3. तुम्ही तेलकट, फास्ट आणि जंक फूड जितके टाळाल तितके चांगले, ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने किडनी निरोगी राहते.

4. किडनी निरोगी ठेवण्यासाठी निरोगी आहार निवडा आणि वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.

5. किडनी निरोगी ठेवण्यासाठी सॉल्टेड पदार्थ कमी खावे. यासाठी पॅकेज केलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो टाळा.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.