Nagin Disease: नागिण होण्यामागचं कारणं माहितेय का? ‘या’ Home Remedies नी मिळेल आराम

Shingles / Herpes Zoster: नागिण या आजाराला इंग्रजीमध्ये herpes zoster असं म्हणतात. त्वचेचा हा आजार कोणालाही होवू शकतो. साधारण ४० वयानंतर हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. हा वेरिसेला झोस्टर या कांजण्यांच्या विषाणूमुळे होते
nagin disease causes and Home Remedies
nagin disease causes and Home Remedies Esakal
Updated on

आपल्या देशामध्ये अनेक साथीच्या आजारांबद्दल विविध समज-गैरसमज पाहायला मिळतात. यातीलच एक संसर्गजन्य आजार म्हणजे नागिण. नागिण herpes zoster हा एक संसर्गजन्य त्वचारोग आहे. या आजारामध्ये शरीरावर विशिष्ट ठिकाणी लालसर बारिक फोड Blisters येतात. Know About herpes zoster its symptoyms and remedies

या फोडांमुळे त्वचेची प्रचंड जळजळ होते. तसचं प्रचंड वेदनाही Pain होतात. हे फोड हळू हळू वाढत जातात. अनेकदा ते एखाद्या चट्ट्याप्रमाणे वाढतात.

त्वचेवर Skin आलेल्या या फोडांचा किंवा पुरळांचा विळखा पूर्ण झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होवू शकतो असा अनेकांचा समज आहे. मात्र हा केवळ एक त्वचेचा आजार असून योग्य औषधोपचाराने तो बरा होणं शक्य आहे.

नागिण या आजाराला इंग्रजीमध्ये herpes zoster असं म्हणतात. त्वचेचा हा आजार कोणालाही होवू शकतो. साधारण ४० वयानंतर हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

हा वेरिसेला झोस्टर या कांजण्यांच्या विषाणूमुळे होते. यामध्ये शरीरावर पाण्याचे बारिक पुरळ किंवा फोड येतात. ज्यामुळे शरीराला खाज सुटते, जळजळ होते तसचं वेदना आणि ताप येतो. हा एक संसर्गजन्य आजार असल्याने यात वेळीच काळजी घेणं गरजेचं असतं.

खासकरून ज्यांना आधी कांजण्यांची Chiken Pox लागण होवून गेली अशा व्यक्तींना भविष्यात नागिण होण्याची शक्यता असते. कारण कांजण्यांनंतर वेरिसेला झोस्टर वाररस शरीरामध्ये राहतो. काजण्या बऱ्या झाल्यानंतर तो नर्व्हस सिस्टिमध्ये काही वर्ष सुप्तावस्थेत राहतो. त्यामुळे भविष्यात नागिण होण्याची शक्यता असते.

हे देखिल वाचा-

nagin disease causes and Home Remedies
Skin Care : घामानी खाज येणं होईल झटकन बंद! करा हे उपाय

नागिणची लक्षण Symptoms of Herpes

नागिणच्या लक्षणांमध्ये थंडी भरून येणं, ताप येणं तसचं डोकेदुखी ही काही सामान्य लक्षणं आहेत.

तसंच थकवा जाणवणं आणि पोटदूखी ही सुरुवातीची काही लक्षणं आहेत.

तर काही दिवसांनी काही गंभीर लक्षणं दिसू शकतात यात एखाद्या ठिकाणची त्वचा लाल होणं. त्वचेवरील ठराविक भागात फोड वाढत जाणं.

फोड पाण्याने भरणं तसचं फोड आलेल्या ठिकाणी वेदना होणं अशी लक्षण कालांतराने दिसू लागतात.

नागिणमधून बरं होण्यास किती दिवस लागतात
नागिणची लक्षणं दिसू लागल्यापासून साधारण ३-४ किंवा ५ आठवडे देखील या आजारातून बरं होण्यासाठी लागू शकतात. शरीरावर सामान्यत: कंबरेच्या भागात, पाठीवर, मानेभोवती किंवा काही वेळेस चेहऱ्यावर आणि काखेतही नागिणच्या फोड येण्याची सुरुवात होते.

सुरुवातीला बारीक पुरळ येण्यास सुरुवात होते. कालांतराने साधारण ५-६ दिवसात त्यात पाणी भरू लागतं. काही वेळेस १५ दिवसात ते सुकतात. मात्र पूर्णपणे बरं होण्यासाठी २-३ आठवड्यांचा काळ लागतो.

नागिणवर उपचार
नागिणचा त्रास सुरू होताच वेळीच डॉक्टरांकडे गेल्यास त्रास आणि वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. या आजारावर एसाइक्लोविर हे अँटी वायरस मेडिसिन दिलं जातं. याशिवाय फॅमसीक्लोविर आणि व्हॅलासायक्लोव्हिर ही औषधेही रुग्णाला दिली जातात.

तसंच जळजळ आणि खाज कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून मलम दिलं जातं. एखाद्या रुग्णाला अधिक वेदना होत असतील तर त्याला जोस्टावैक्स नावाचं वॅक्सिन दिलं जातं.

हे देखिल वाचा-

nagin disease causes and Home Remedies
Skin Care: खाल तूप तर येईल रूप… त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘तुप’ अत्यंत फायदेशीर

नागिणवर घरगुती उपचार
थंड पाण्याने आघोळ- थंड पाण्याने दिवसातून दोनदा तरी आंघोळ करावी यामुळे शरीराला येणारी खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. तसचं वेदना देखील कमी होण्यास मदत होते.

तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर आंघोळीपूर्वी एक कप कोमट पाण्यामध्ये ओट्स आणि कॉर्नस्टार्च मिसळा. १०-१५ मिनिटांनी हे मिश्रण आंघोळीच्या गार पाण्यास मिसळून आंघोळ घ्या. लक्षात घ्या नागिणच्या आजारात गरम पाण्याने आंघोळ टाळावी. यामुळे त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते.

थंड शेक- थंड पाण्याने आंघोळ करण्यासोबतच तुम्ही नागिणच्या समस्येमध्ये आराम मिळण्यासाठी थंड पाण्याचा शेक घेऊ शकता. यासाठी एखादा टॉवेल किंवा रुमाल गार पाण्यात बुडवून तो पिळून जखमेवर ठेवा.

यामुळे वेदना आणि जळजळ कमी होईल. लक्षात घ्या शेकण्यासाठी कधीही बर्फ किंवा आइसपॅकचा वापर करू नका. यामुळे वेदना वाढू शकतात.

कॉर्नस्टार्च आणि बेकिंग सोडा- नागिणच्या आजारामध्ये होणारी जळजळ आणि अंगाला येणाऱ्या खाजेपासून सुटका हवी असेल तर तुम्ही हा घरगुची उपाय करू शकता.

कॉर्नस्टार्च किंवा बेकिंगसोडमध्ये थोडं पाणी मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट नागिण आलेल्या भागावर लावा. १०-१५ मिनिटांनी थंडं पाण्याने पेस्ट धूवून काढा. यामुळे तुम्हाला आराम पडेल.

हे देखिल वाचा-

nagin disease causes and Home Remedies
Skin Cleaning Tips : नारळाचं तेल लावा अन् शरीरावरील ‘ती’ काळी कुळकुळीत जागा गोरीपान करा!

योग्य आहार- नागिणच्या समस्येतून लवकर बरं व्हायचं असेल तर आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. नागिणची वाढ म्हणजेच फोडं वाढणं थांबवण्यासाठी आहारामध्ये विटामिन बी, ई, ए आणि सीचा समावेश करणं गरजेचं आहे.

हिरव्या भाज्या , फळं आणि अंड आहारात समाविष्ट करा. तसचं मासांहार, तिखट आणि तेलकट पदार्थांचं सेवन पूर्णपणे टाळा.

या काही घरगुती उपयांसोबतच तुम्ही  कॅमोमाइल ऑइल, टी-ट्री ऑइल अशा काही हर्बल तेलांचा वापर करू शकता. मात्र यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
टीप - हा लेख सर्वसाधारण माहितीवर आहे. कुठलेही उपचार घेण्यापूर्वी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.