आजपर्यंत, आपल्यापैकी बर्याच जणांना ‘फॅट’ हा शब्द शरीराच्या प्रकाराबाबत(लठ्पणा) किंवा शरीरासाठी आवश्यक असलेल्या अन्नाच्या घटकाचे वर्णन करतो म्हणून माहित आहे शरीरातील फॅट्स तुमच्या शरीराची बाहेरची सुंदरतेवर परिमाण करतो. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारे फॅट उपलब्ध आहेत. त्यापैकी काही फॅट्स शरीरासाठी चांगले असतात तर काही धोकादायक. यापैक पोटाच्या भागातील फॅट्स खूप धोकादायक मानले जातात.
शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि कार्यप्रणालीसाठी आहारात फॅट्सचा समावेश करणे अत्यावश्यक असले तरी, कोणत्या प्रकारची AFTखावे हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे मिळविण्यासाठी चांगल्या फॅट्सची आवश्यकता असते; ते शरीराला ऊर्जा देतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. तर खराब फॅट्समुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांचा धोका वाढतो (Know all about the types of body fat)
बेज फॅट हे व्हाईट( white)आणि ब्राऊन (Brown) फॅट्सचे मिश्रण आहे. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरातील व्हाईट फॅट्सचे रूपांतर इरिसिन हार्मोन वापरून बेज फॅटमध्ये होते, या प्रक्रियेला ब्राऊनिंग म्हणतात. हे सहसा कॉलर बोनच्या आसपास आणि मणक्याच्या बाजूने आढळते. द्राक्षे सारखे पदार्थ खाल्ल्याने ब्राऊन होण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ शकतो.
ब्राऊन फॅट हे चांगले फॅट्स आहेत जे मानेच्या मागच्या बाजूला आणि छातीचा भागात आढळतात. तसेच याला ब्राऊन ऍडिपोज टिश्यू किंवा BAT म्हणूनही ओळखले जाते, हे फॅट्स शरीरासाठी चांगले असतात कारण त्यामुळे शरीराच्या आतील भागाचे (core)तापमान नियंत्रित ठेवण्याच मदत करते.
खराब व्हाईट फॅट्स आहारात घेत असल्यास ते फॅट कटर म्हणून काम करतात. निरोगी अन्न, पूरक आहार आणि आपल्या जीवनशैलीत लहान परंतु महत्त्वपूर्ण बदल करून शरीरात त्याचे प्रमाण वाढवता येते.
या फॅट्समुळे शरीराला जास्त त्रास होत असल्याच्या गंभीर धोक्यांमुळे तुम्ही कदाचित हे नाव अनेकदा ऐकले असेल. पोटाता हे फॅट्स नेहमी आढळतात. वाढलेली ढेरी (Belly Fat) किंवा मोठ्या पोटामुळे हे फॅट्स सहज लक्षात येतात. अवयवांचे रक्षण करण्यासाठी त्यातील काही प्रमाण आवश्यक असले तरी, अवयवांभोवती चरबीचा जास्त साठा झाल्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि रक्तातील कोलेस्टेरॉल, कर्करोग, हृदयविकार आणि टाइप-2 मधुमेह वाढण्यास कारणीभूत ठरते.
व्हाईट फॅट्सचा हे फॅट्सचासाठा आटोक्यात ठेवतात. त्वचेखालील व्हाईट फॅट्स अॅडिपोनेक्टिनच्या उत्पादनामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या इन्सुलिनचे नियमन करते. त्वचेखालील व्हाईट फॅट्स हे शरीरासाठी चांगले असतात. तसेच शरीरामध्ये त्याचे प्रमाण वाढल्यास अॅडिपोनेक्टिनचे प्रमाण जास्त होते. ज्यामुळे चयापचय मंदावते आणि नितंब(Hips), मांड्या (thighs) आणि पोटाभोवती चरबीचे प्रमाण वाढते.
त्वचेखालील फॅट्स संपूर्ण शरीरात आणि विशेषतः नितंब, हात आणि पाय यांच्या मागील बाजूस असते. पोटावर जास्त प्रमाणात घेतल्यास मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्वचेखालील फॅट्सचा अधिक अर्थ म्हणजे शरीरात इस्ट्रोजेनचे जास्त प्रमाण जे पुरुष आणि स्त्रियांमध्ये अस्वास्थ्यकर वजन वाढण्यास प्रोत्साहन देऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.