Diabetes असलेल्यांना हे गंभीर आजार होण्याचा असतो धोका, वेळीच व्हा सावधान

मधुमेहामध्ये आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास इतर अनेक आरोग्याच्या समस्या Health Problems निर्माण होतात. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास काही वेळीस गंभीर समस्यांमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं
धोके डायबेटिस रुग्णांसाठी
धोके डायबेटिस रुग्णांसाठीEsakal
Updated on

गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेहाचं Diabetes प्रमाण वाढताना दिसत आहे. अगदी लहान मुलापासून ते तरुण आणि वयोवृद्धांमध्ये मधुमेहाची समस्या निर्माण होवू लागली आहे. Know the dangers the diabetic patients may face for their health

यासाठी काही अंशी अनुवांशिक कारणं Genetic Reasons जबाबदार असली तरी बदललेली जीवनशैली Lifestyle ज्यात चुकीच्या खाण्याच्या सवयी, झोपेच्या वेळा तसचं सुस्त दिनचर्या या काही कारणांमुळे कमी वयातच मधुमेहाची समस्या उद्भवत असल्याचं दिसू लागलं आहे.

मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचं Blood Sugar प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने इतर अनेक समस्या निर्माण होतात. मधुमेहाच्या आजाराने घेरल्यास योग्य आहारासोबतच चांगली दिनचर्या असणं गरजेचं आहे. यात अनेक पथ्य पाळणं काहीजणांना बंधनकारक असतं.

मधुमेहामध्ये आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास इतर अनेक आरोग्याच्या समस्या Health Problems निर्माण होतात. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास काही वेळीस गंभीर समस्यांमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. diabetes complications

हृदयासंबंधीत समस्या निर्माण होण्याचा धोका

मधुमेहामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. जास्त काळ रक्तातील शुगरचं प्रमाण वाढल्यास हृदयामध्ये सूज वाढू शकते. यामुळे कोलेस्ट्रालची समस्या निर्माण होवू शकते. एवढचं नव्हे तर यामुळे हार्ट अटॅकचा धोका देखील वाढतो.

दृष्टी कमी होवू शकते

जर मधुमेहाच्या समस्येमध्ये तुम्ही आरोग्याची तसंच आहाराची योग्य काळजी घेत नसाल तर इतरही समस्या वाढू लागतात. डायबेटिसमध्ये ग्लूकोमा आणि मोतीबिंदू होवू शकतो.

यामध्ये तुमच्या डोळ्याच्या मागील बाजूस असलेल्या रेटिनातील रक्तवाहिन्यांनाचं नुकसान होवू शकतं. या समस्येला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात. यामुळे नजर कमी होवू शकते तसचं काही वेळेस दृष्टी पूर्णपणे जावू शकते.

हे देखिल वाचा-

धोके डायबेटिस रुग्णांसाठी
Diabetes Tips : मधुमेही रुग्णांनी Coconut Water चं सेवन करावं का?

बहिरेपण

मधुमेहाच्या आजारामध्ये बहिरेपण येण्याचा धोका देखील वाढतो. शुगरचं प्रमाण जास्त असल्यास मेंदूला मिळणाऱ्या संकेतांवर त्याचा परिणाम होतो. यामुळेच मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कानाच्या संसर्गाचा धोका वाढतो. परिणामी यामुळे बहिरेपण येण्याची किंवा ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता वाढते.

पायांवर सूज आणि वेदना

मधुमेहाच्या समस्येमध्ये पायाच्या नसांवर परिणाम होवून त्या बधीर होवू शकतात. पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो. तसंच पायांवर सूज येऊ शकते तर काही वेळेस पायांची बोटं सुन्न पडू शकतात.

यासाठी मधुमेह असलेल्या रुग्णांनी पायाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी नियमितपणे पायांचे व्यायाम करणं तसचं काही मिनिटांसाठी चालणं आवश्यक आहे.

त्वचेच्या समस्या

मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये त्वचेच्या समस्या निर्माण होवू शकता. यामध्ये त्वचेला कोणतही इंफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. तसंच त्वचा पातळ होणं किंवा जाड होणं, खाज येणं अशा काही इतर त्वचेच्या समस्या निर्माण होवू शकतात.

या समस्यांसोबतच युरिन इन्फेक्शन आणि पचनाच्या समस्या देखील निर्माण होतात. यासाठीच मधुमेह असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आहार घेणं आणि दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा सहभाग करणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

धोके डायबेटिस रुग्णांसाठी
Diabetes Symptoms: आता डोळे बघूनही ओळखता येणार मधुमेहाचे लक्षण, तज्ज्ञांनी सांगितली पद्धत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.