Stomach ache in monsoon: आला पावसाळा तब्येत सांभाळा असं आपण कायमच ऐकत आलो आहोत. पावसाळा Monsson सुरू झाला कr आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येतो. पावसाळ्यात कायम चिंता असते ती म्हणजे आजारी पडण्याची. Know the reason and care of your stomach during monsoon season
या दिवसांमध्ये सर्दी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांसोबतच पोटासंबंधीच्या अनेक समस्या Stomach Problems निर्माण होतात. पावसाळ्यामध्ये पचन बिघडल्याने पोटदुखी, मळमळ, गॅस तसंच बद्धकोष्ठता अशा अनेक समस्या उद्धवत असतात.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नाक अनेकदा नाक बंद झाल्याने किंवा दमट वातावरणामुळे शरीरात योग्यरित्या ऑक्सिजनचा Oxygen पुरवठा होत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीराच्या pH लेवलमध्ये असंतुलन निर्माण होतं.
शरीराची pH लेवल शरीरासाठी गरजेचे असलेल्या गट बॅक्टेरियाचं असंतुलन निर्माण होतं. गट बॅक्टेरिया किंवा गुड बॅक्टेरिया हे अन्न पचनाचं काम करतात. म्हणूनच या बॅक्टेरियाचं असंतुलन निर्माण झाल्यास अपचन होवून पोटाच्या समस्या निर्माण होतात.
यासोबतच पावसाळ्यात अशुद्ध पाणी आणि अन्न, तसंच कच्च अन्न अशा काही कारणांमुळे देखील पोटाच्या समस्या निर्माण होवू शकतात.
पावसाळ्याच पोटाच्या समस्या निर्माण होण्याची कारणं
दूषित पाणी आणि अन्न- पावसाळ्यामध्ये तुमच्या घरातल्या नळाला येणारं पाणी देखील दूषित असू शकतं. तसंच जर तुम्ही हॉटेल किंवा बाहेर इतर ठिकाणी पित असलेलं पाणी शुद्ध असेलच याची खात्री नसते परिणामी पोट बिघडू शकतं.
त्याचप्रमाणे दूषित अन्न म्हणजेच खास करून बाजारातील उघड्यावरील अन्न पदार्थ्यांच्या सेवनामुळे पोट बिघडण्याचा किंवा फूड पॉझनिंगचा मोठा धोका असतो. या दिवसांमध्ये माइक्रोऑर्गेनिज्म जास्त सक्रिय असतात. बाजारातील जे अन्न पदार्थ उघड्यावर ठेवले जातात त्यावर हे सूक्ष्म जीव अधिक असण्याची शक्यता असते.
अशा पदार्थांच्या सेवनामुळे पचन बिघडू शकतं. तसंच पोटदुखी होवू शकते.
हे देखिल वाचा-
कच्चे पदार्थ किंवा अर्धवट शिजलेले पदार्थ- अर्धवट शिजलेल्या पदार्थांमुळे केवळ पावसाळ्यातच नव्हे तर अन्य दिवसांमध्ये देखील पोटं बिघडू शकतं. मात्र पावसाळ्याच्या काळामध्ये पोटाची आणि पचनाची क्रिया अधिक मंद असल्याने अर्धवट शिजलेल्या पदार्थांच्या सेवनाने तसंच कच्च्या पदार्थांमुळे पोटामध्ये इंन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो.
त्यामुळेच या काळामध्ये कच्च्या भाज्या किंवा सॅलडचं सेवन टाळावं. तसंच बाहेर अन्न पदार्थांचं सेवन टाळावं.
दमट वातावरण- पावसाळ्यात दमट हवामानाचा संपूर्ण पचनक्रियेवर परिणाम होतो. या काळामध्ये पचनक्रिया मंदावते. तसंच या काळामध्ये थंड वातावरणामुळे पाणी कमी प्यायलं जातं. परिणामी डिहायड्रेशनमुळे देखील पोटाच्या समस्या निर्माण होवू शकतात.
अस्वच्छता- पावसाळ्याच्या काळामध्ये फंगल तसंच बॅक्टेरियल आजारांचा धोका अधिक असतो. यासाठीच घर तसंच घराबाहेरही स्वच्छतेकडे लक्ष देणं गरजेचं असतं. या काळात माश्यांचं प्रमाणही वाढतं. यामुळे पोट बिघडून डायरिया किंवा उलटीचा त्रास होवू शकतो.
या काही इतर कारणांमुळे देखील पावसाळ्यामध्ये पोटाचे विकार किंवा अन्य छोट्या मोठ्या समस्या निर्माण होत असतात. यासाठी योग्य आणि हलका आहार घेणं गरजेचं असतं. तसंच पावसाळ्याच्या काळामध्ये अधिक स्वच्छता बाळगल्याने आजारांपासून दूर राहणं शक्य आहे.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.