गेल्या आठवड्यात Avoidant Personality Disorder असलेले हेमंत आणि आशिष यांची उदाहरणं बघितली. आता या डिसॉर्डरबाबतची लक्षणं आणि उपचार बघूया. या डिसॉर्डरमध्ये पुढीलपैकी लक्षणं आढळतात.
आपल्याला नाकारलं जाईल, टीका होईल या भीतीनं नोकरी- व्यवसाय करणं टाळलं जातं.
विशिष्ट आवडत्या परिचित व्यक्ती सोडून इतरांशी संबंध टाळला जातो.
टिंगल होईल, नाकारलं जाईल या भीतीनं नवीन नातं जोडणं, प्रेम व्यक्त करणं या गोष्टी टाळल्या जातात. सार्वजनिक समारंभ टाळले जातात.
इतरांपेक्षा सर्वार्थानं कमी असल्याची भावना मनात रुजलेली असते. कुठलीही जोखीम घेण्याची तयारीच नसते.
अत्यंत दुर्बल आत्मप्रतिमा. आत्मविश्वासाचा अभाव आढळतो.