Lips
Lips Sakal

Health Secrets In Lips : बदलणाऱ्या ओठांच्या रंगांत दडलंय हेल्थ सीक्रेट्स

प्रत्येकाच्या ओठांचा रंग जन्मापासून वेगळा असतो. पण जर...
Published on

Health Secrets In Lips : ओठांचा रंग शरीरात होणारी क्रिया दर्शवू शकतो. जसे की, रक्ताची पातळी, शरीराचे कार्य, शरीराचे तापमान. मात्र, जर, ओठांच्या रंगात अचानक बदल होत असेल तर, चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण बदलणाऱ्या ओठांच्या रंगांमध्ये हेल्थचे अनेक सीक्रेट्स दडलेले आहेत. आज आपण त्याचबाबत अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. (Health Secrets Hidden In Lips Color)

Lips
Vaginal health : योनीमार्गाचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी हे पदार्थ खा

प्रत्येकाच्या ओठांचा रंग जन्मापासून वेगळा असतो. पण जर तुम्हाला ओठांच्या रंगात सामान्य रंगाव्यतिरिक्त बदल दिसू लागला तर, त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे आरोग्याशी संबंधित अनेक इशारे असू शकतात.

गुलाबी किंवा पांढरे ओठ

ओठ हलके गुलाबी, पांढरे किंवा राखाडी झाले तर दोन्ही हात आणि पायांना थंडी जाणवते. फिकट गुलाबी, पांढरे किंवा राखाडी ओठ हे अशक्तपणाचे लक्षण असू शकते. याचा अर्थ शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाले आहे. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास लोहयुक्त पदार्थ जसे हिरव्या भाज्या, खजूर आदींचा समावेश आहारात करावा.

लाल किंवा गडद रंगांचे ओठ

चेन स्मोकिंगमुळे ओठांचा रंग गडद लाल किंवा काळा होतो. पण, धुम्रपान न कराताही जर तुमचे ओठ गडद लाल किंवा काळे होत असतील तर, याचा अर्थ तुमची पचनसंस्था नीट काम करत नाही असा होतो. अशा स्थितीत जुलाब, आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठतेची समस्या जाणवू शकते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी चिकन, दूध, अंडी किंवा दही असा प्रथिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे.

Lips
Men Blood Pressure : वयानुसार पुरुषांचा रक्तदाब किती असावा?

लाल ओठ

लाल ओठ असणे चांगले मानले जाते. पण, अचानक लाल ओठ कधी कधी यकृताशी समस्येशी संबंधित सूचित करतात. अशा स्थितीत पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होऊ शकते. सततच्या खाण्यामुळे वजनही वाढू शकते. त्यामुळे ओठ सतत लाल दिसत असतील तर, त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरू शकते.

पिवळे ओठ

रक्तातील बिलीरुबिनचे प्रमाण वाढल्याने ओठांचा रंग पिवळा होतो. यकृताशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास किंवा ती नीट काम करत नसेल तरीही असे होते. काही प्रकारच्या विषाणूजन्य संसर्गामुळेही ओठांचा रंग पिवळा होतो.

Lips
Happy Life : तुम्हालाही तणाणमुक्त जगायचं? फॉलो करा 91 टक्के लोकांचा फॉर्मुला

निळे ओठ

फुफ्फुस किंवा हृदयाशी संबंधित काही समस्या असल्यास, रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किंवा कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण जास्त झाल्यास ओठ निळे पडतात. ओठ अचानक निळे पडणे ही देखील गंभीर परिस्थिती आहे. जर बाळाच्या जन्मानंतर ते लगेच रडले नाही तर, ते फुफ्फुसांच्या अयोग्य कार्यामुळे होते. त्यामुळे त्याचे ओठ निळे पडतात.

कोरडे ओठ

कोरडे ओठ हे निर्जलीकरणाचे लक्षण आहे. जर तुमचे ओठ दीर्घकाळ कोरडे राहत असतील तर, तुम्हाला हायपोथायरॉईडची समस्या असू शकते. हायपोथायरॉईडच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा, खोकला, वजन वाढणे यासह इतर अनेक समस्या जाणवू शकतात. त्यामुळे ओठ दीर्घकाळ कोरडे राहिल्यास त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. तुमच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.