Lifespan Calculator : तुम्ही किती वर्ष जगाल हे सांगेल हा कॅलक्युलेटर, भरपूर जगायचं असेल तर करा हे काम..

जसं आयुष्य सध्या आपण जगत आहोत, त्यामुळे आपण किती जगणार आणि कधी मरणार हे सांगणं अवघड झालं आहे.
Lifespan Calculator
Lifespan Calculatoresakal
Updated on

Lifespan Calculator : हल्ली जशी आपली लाईफस्टाइल झाली आहे त्यामुळे आपल्या आरोग्यानुसार आपण किती काळ जगणार हे सांगणं कठीण होतं. पण तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टीमने यावर बराच सर्व्हे केला आणि एक नवीन पद्धत शोधून काढली.

कोणाचा कधी मृत्यू होईल हे आपल्याला सांगता येत नाही. पण जर आपण आपल्या आरोग्याची नीट काळजी घेतली तर आयुष्य वाढू शकते. आपल्या शरीरात कोणता आजार वाढत आहे हे बराच काळ बहुतेकांना माहितच नसतो. यासाठी बऱ्याच टेस्टही आपण करतो. पण आयुष्य वाढवण्यासाठी काय करावं? हे जाणून घ्या.

सर्व्हे करून अभिनव पद्धतीचा शोध

एका डॉक्टरने फारच अभिनव कॅलेक्युलेटर बनवलं आहे. ज्यामुळे तुम्हाला काही मिनीटांमध्येच समजेल की, तुमच्या आरोग्यानुसार तुम्ही किती वर्ष जगाल. एवढेच नाही तर जर तुमचं आयुष्य कमी होत असेल तर ते कसे वाढवता येईल. याविषयी संशोधन करण्यात आलं आहे. अमेरिकाचे डॉ थॉमर्स पर्ल्स यांनी लिव्हिंग टू १०० लाइफ एक्सपेक्टेंसी कॅलक्युलेटर तयार केलं आहे.

इंसायडरच्या रिपोर्टनुसार बऱ्याचशा लोकांना ते हेल्दी असूनही किती वर्ष जगतील हे माहित नसतं. अशा लोकांना या कॅलक्युलेटरचा फायदा होईल.

Lifespan Calculator
Sci-Tech : त्या 'कोका-कोला' फोनची आता भारतात विक्री सुरु; वैशिष्ट्ये अन् किंमत

मोठ्या आयुष्यासाठी काय करावं?

कोणाच्याही मृत्यूची वेळ कोणीही निश्चित सांगू शकत नाही. पण तुमच्या लाइफस्टाइलवरून तुमच्या अपेक्षित वयाचा अनुमान लावला जातो. डॉ. थॉमस पर्ल्स यांनी एकूण ४० प्रश्नांची यादी तयार केली आहे आणि त्याचे उत्तर द्यावे लागते. पर्ल्सने दिलेल्या माहितीनुसार LivingTo100.com वर जाऊन तुम्हाला तुमची जन्म तारीख, लिंग, देश, जीप कोड ही माहिती भरावी लागते. त्यानंतर ४० प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात. यानंतर तुम्हाला फॅमिली, पर्सनल, लाइफस्टाइस, मेडिकलशी संबंधीत प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्नांची उत्तर दिल्यावर समजते की तुम्ही किती वर्ष जगणार आहात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.