Liver Damage Signs: Liver खराब होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

यकृत निकामी झाल्यास देतं हे संकेत? वेळीच ओळखा
Liver Damage Signs
Liver Damage Signsesakal
Updated on

Liver Damage Signs: लिव्हर हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे रक्तातील रासायनिक पातळी नियंत्रित करण्याबरोबरच पित्त नावाचे महत्त्वपूर्ण पाचक द्रव तयार करणे. याशिवाय यकृत रक्त स्वच्छ करण्याचे आणि ग्लायकोजेन नावाच्या साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठवण्याचे ही काम करते.

आपल्या शरीराचा असा आवश्यक भाग खराब झाला तर? यकृत खराब होण्याच्या समस्येमुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्याची लक्षणे वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार सुरू केले तर यकृत खराब होण्यापासून वाचवता येते. त्यामुळेच जाणून घेऊयात ते कसे ओळखायचे.

Liver Damage Signs
World Liver Day : दारू न पिणाऱ्या लोकांचंही होऊ शकतं लिव्हर खराब, 'या' चुका कधीही करू नका...

यकृत

यकृत खराब होणे म्हणजे ते आपली कार्ये योग्यरित्या करण्यास सक्षम नाही. ही गंभीर परिस्थिती आहे. अशा रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असते. तर हे आधीच रोखण्याचे काही मार्ग असू शकतात का? यासंदर्भात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही लक्षणांच्या आधारे त्यांची ओळख पटवून प्रतिबंधात्मक पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो.

लक्षणे

ज्या लोकांना यकृत निकामी होण्याची भीती असते त्यांना रक्ताच्या उलट्या , थकवा, कावीळ आणि सतत वजन कमी होण्याच्या समस्या उद्भवतात. आपल्याला अशा समस्या जाणवताच आपण डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Liver Damage Signs
Madhurani Prabhulkar: ह्या उष्णतेच्या काळात स्वतःला असं कूल ठेवते मधुराणी.. म्हणाली, 'हेच आहेत माझे Life Savers..'

यकृत खराब होण्याची कारणे?

  • सर्वसाधारणपणे ज्यांना हिपॅटायटीस बी, लिव्हर सिरोसिस सारखे आजार असतात त्यांना यकृत खराब होण्याचा धोका जास्त असतो.

  • याशिवाय अल्कोहोल किंवा काही औषधांच्या अतिसेवनामुळेही यकृत खराब होण्याची भीती असते.

  • यकृत खराब होण्याची समस्या विकसित होण्यास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.

  • यकृत कमकुवत झाल्याने रूग्णाचा जीवही जाऊ शकतो.

मद्यपानामुळे हा आजार गंभीर बनतो का

- बऱ्याच काळापर्यंत अधिक प्रमाणात दारू प्यायल्याने लिव्हर खराब होण्याचा धोका वाढतो.

- महिलांमध्ये मद्यपनामुळे होणाऱ्या लिव्हर डॅमेजचा धोका पुरुषांच्या तुलनेत अधिक असतो.

- जाडेपणाची समस्या असलेल्या लोकांमध्ये मद्यपनामुळे होणाऱ्या लिव्हर डॅमेजचा धोका अधिक असतो.

- हेपेटायटिस B व हेपेटायटिस C च्या समस्येचा सामना कराव्या लागणाऱ्या लोकांमध्ये लिव्हर डॅमेजचा धोका खूप जास्त असतो.

ही गंभीर परिस्थिती कशी टाळता येईल?

ज्या लोकांना यकृतरोग आहे किंवा यकृत खराब होण्याची लक्षणे दिसत आहेत, डॉक्टर प्रथम त्यांना मद्यपान न करण्याचा सल्ला देतात. याशिवाय अशा रुग्णांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

अशा रुग्णांना जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच लाल मांस, चीज आणि अंड्यांचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.

तसेच पौष्टिक आहार, म्हणजेच धान्यय, प्रोटीन्सचे सेवन करणेही आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरते. साखर, अनहेल्दी फॅट या पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे.

नियमितपणे व्यायाम करावा. वजन आटोक्यात ठेवावे. आणि नियमितपणे हेल्थ चेकअप करावे. या सर्व उपायांनी तुम्ही लिव्हरचे आरोग्य सुधारून लिव्हर डॅमेजचा धोका कमी करू शकता.

Liver Damage Signs
Kidney Health : मूत्रपिंड निकामी होण्याची कारणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.