माणूस हा समाजशिल प्राणी असला तरी अनेकजण असे आहेत जे एकटं राहाणं पसंत करतात. तर काहींना परिस्थितीनुसार एकटं राहावं लागतं. मागल्या दोन वर्षातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर कोरोनाची लागण झाल्याने एकटं राहाण्याची पाळी आली होती. मात्र तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासातून असं निदर्शनास आलंय की, माणसाच्या जीवनातील एकटेपणा म्हणजे हृदय संबंधित रोगांना आमंत्रण. (Health Awareness: may increase cardiovascular diseases)
एकटेपणामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीच्या (Cardiovascular Diseases) काही समस्या उद्भवू शकतात असे मत अमेरिकन हार्ट असोसिएशनने मांडले आहे. अशा वेळी सामाजिक संवाद फार महत्वाचा ठरतो. तसेच एचए (American Heart Association) च्या रिपोर्टमध्ये असेही सांगितल्या गेले आहे की, सामाजिक दूरी आणि एकटेपणा या दोन्हींचा शरीरातील रक्तवाहिन्यांवर व मेंदूवर घातक परिणाम होतो.
अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेल्या स्टडीनुसार ३० टक्के हृदयाचे विकार वाढण्यात एकटेपणा जबाबदार आहे. तसेच गेल्या ४० वर्षाच्या संशोधनातून एकटेपणाचे परिणाम आरोग्यावर झाल्याचे दिसून येते. मृत्यूदरामध्ये वाढ होण्यासही एकटेपणा कारणीभूत असल्याचे कळते. आणि एकटेपणाचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
सामाजिक संवादाच्या अभावाने मुले डिप्रेशनच्या अभावी जातात आणि नतर त्यांना लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर आणि ग्लुकोजचे प्रमाण वाढण्यासारख्या समस्या उद्भवतात. सोशल आयसोलेशन आणि एकटेपणाचं प्रमाण १८ ते २२ वयोगतील वर्गात कॉमन दिसून येतं. तसेच वयाची पासष्टी गाठणाऱ्यांतही एकटेपणा दिसून येतो. असे लोक स्वत:ला आयसोलेट करून घेतात की यांना खरंच एकटेपणा वाटतो यावर अजूनही अभ्यास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.