Health Alert : लग्नात वाजणारं म्युझिक एक दिवस तुमच्या हृदयाचे ठोके थांबवेल, स्टडी सांगते...

गेल्या काही महिन्यांत देशभरातून अशा काही धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये लोक अचानक पडताना दिसले आणि काही घटनांमध्ये लोकांचा जागीच मृत्यू झाला.
Health Attack due to loud sounds
Health Attack due to loud soundsesakal
Updated on

Health Alert due to loud sounds : लग्नकार्यातील म्युझिक जरी आनंदाचे क्षण म्हणून आपण एन्जॉय करत असू तरी त्याचे किती घातक परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतात याची कल्पनासुद्धा तुम्हाला नाहीये.

4 मार्च 2023 रोजी, बिहारमधील सीतामढी येथील 22 वर्षीय सुरेंद्र कुमार यांचा वधूला हार घालताना स्टेजवरच मृत्यू झाला. सुरेंद्र कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सुरेंद्र कुमारचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मोठ्या आवाजामुळे त्याच्या हृदयाचे ठोके वाढले आणि आणि त्याच वेळी स्टेजवरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला.

अशीच दुसरी घटना तेलंगणात घडली आहे. लग्नात नाचताना एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी वाराणसीच्या पिपलानी कटरा येथे एका लग्न समारंभात डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

या सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती नाचताना आणि अचानक जमिनीवर कोसळताना दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांत देशभरातून अशा काही धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये लोक अचानक पडताना दिसले आणि काही घटनांमध्ये लोकांचा जागीच मृत्यू झाला.

नोव्हेंबर 2019 मध्ये युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे सांगण्यात आले होते की, कोणत्याही प्रकारचे संगीत, मग ते मंद असो वा वेगवान, एखाद्या व्यक्तीचे हृदय कमकुवत करू शकते.

संशोधकांनी 500 निरोगी प्रौढांचा अभ्यास केला. या संशोधनात अशा लोकांचा समावेश करण्यात आला होता जे अतिशय व्यस्त आणि सतत गोंधळ असलेल्या बाजारपेठांत राहत होते किंवा काम करत होते.

पाच वर्षांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या लोकांना हृदयविकाराची कोणतीही लक्षणे नव्हती, त्यांना गोंगाटाच्या वातावरणात राहिल्यानंतर हृदयविकाराची लक्षणे दिसू लागली. या संशोधनात असे आढळून आले की, हृदयाशी संबंधित आजार होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आवाज.

संशोधनात असे आढळून आले की 24 तासांच्या कालावधीत सरासरी 5-डेसिबल आवाजाच्या प्रदर्शनामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर गंभीर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका 34 टक्क्यांनी वाढतो.

निर्णय घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या म त्याचा मेंदूवरही त्याचा रिणाम होतो. आणि हा भाग आकुंचन पावल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. यामुळे मूड बदलणे, राग येणे यासारख्या समस्या उद्भवतात जी हृदयविकाराची लक्षणे आहेत.

Health Attack due to loud sounds
Health Attack due to loud sounds

मोठ्या आवाजातील संगीताचा हृदयाच्या गतीवर कसा परिणाम होतो?

जर्मनीतील मेंझ युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्येही असाच अभ्यास करण्यात आला. यामध्ये 35 ते 74 वयोगटातील सुमारे 15 हजार लोकांचा समावेश होता. या अभ्यासात संगीत किंवा आवाज हे हृदयविकाराच्या झटक्याचे कारण आहे की नाही यावर अभ्यास करण्यात आला.

संशोधनात हे समोर आले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या आवाजाच्या संगीताच्या संपर्कात येते तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके झपाट्याने वाढतात, हे जॉगिंग किंवा शारीरिक व्यायामाच्या वेळी हृदयाचे ठोके वाढण्यासारखेच असते.

अनियमित हृदयाच्या ठोक्याला अॅट्रियल फायब्रिलेशन (एएफआयबी) म्हणतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचे धोके वाढतात.

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की रक्तदाब वाढवणारी कोणतीही क्रिया फायब्रिलेशनला चालना देऊ शकते आणि मोठ्या आवाजातही असेच घडते. यामध्ये हृदयाच्या वरच्या दोन कक्षांमध्ये रक्त योग्य प्रकारे पोहोचत नाही. यामुळे खालच्या चेंबर्समधील रक्तप्रवाह देखील विस्कळीत होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

संशोधनात असेही सांगण्यात आले की, खूप मोठा आवाज केल्याने कानाच्या संवेदनशील पेशी आणि संरचनांना थकवा येऊ शकतो. जर तुम्‍हाला बराच वेळ मोठा आवाज येत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या कानांच्या प़डद्यांवरही होतो. त्यामुळे श्रवणशक्ती कायमची निघून जाते.

अभ्यासाचे निष्कर्ष असे दर्शवतात की 60 डेसिबलपर्यंतचा आवाज मानवी कानासाठी सामान्य आहे. पण क्लब किंवा पार्ट्यांमध्ये आवाजाची पातळी वाढते. जे आपल्यासाठी हानिकारक आहे.

15 मिनिटांपेक्षा जास्त काळ 100 डेसिबल किंवा त्याहून अधिक आवाजावर संगीत ऐकणे टाळा कारण त्याचा श्रवणावर वाईट परिणाम होतो. 50-70 डेसिबलपेक्षा जास्त आवाज हा हानिकारक मानला जातो ज्यामुळे मानवी हृदय आणि मनावर परिणाम होतो.

गेल्या वर्षी, जागतिक आरोग्य संघटनेने ऐकण्यासाठी एक मानक तयार केले होते. हे मानक 12 ते 35 वर्षे वयोगटातील लोकांच्या श्रवणविषयक समस्या लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते जे क्लब किंवा कॉन्सर्टमध्ये जातात.

Health Attack due to loud sounds
Heart Attack : सुपर फिट सुष्मिताला हार्ट अटॅक कसा काय आला? तुमच्या 'या' सवयी ठरतात जीवघेण्या..

भारतीय तज्ज्ञ काय म्हणतात?

डॉ. अजय कौल, कार्डिओलॉजिस्ट आणि फोर्टिस हॉस्पिटलचे चेअरमन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, "एकीकडे, संगीत एक थेरपी म्हणून काम करते पण दुसरीकडे, खूप मोठा आवाज किंवा ध्वनीचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

चांगले संगीत झोपी जाण्यास फायदेशीर आहे आणि इतर विविध मानसिक समस्यांवर (Mental Health) औषध म्हणून काम करते, तर दुसरीकडे ६० डेसिबलच्या वर मोठ्या आवाजात संगीत असेल तर ते खूप घातक ठरू शकते.त्यामुळे झटकेही येतात.

आकडेवारीनुसार, भारतात तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेच्या एका रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, 2015 पर्यंत भारतातील 62 दशलक्ष लोकांना हृदयाशी संबंधित आजार होते. हृदयविकाराला बळी पडलेल्या सुमारे 2.3 कोटी लोकांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.

म्हणजे 40 टक्के हृदयरुग्णांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. ही आकडेवारी भारतासाठी त्रासदायक आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की संपूर्ण जगात ही आकडेवारी भारतात सर्वात वेगाने वाढत आहे.

2016 मध्ये हृदयविकार हे अकाली मृत्यूचे पहिले कारण बनले आहे, त्यापूर्वी हृदयविकाराचा झटका अकाली मृत्यूमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता.

हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित आणखी काही प्रश्न आहेत जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. (Health News)

पुरुष किंवा स्त्रिया ज्यांचे हृदय कमकुवत आहे

2018 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, उच्च रक्तदाब, मधुमेह, दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार, स्ट्रोक या चार प्रकरणांमध्ये महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

या संशोधनात महिलांमध्ये धूम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी दिसून आली. संशोधनात असे सांगण्यात आले की, 50 वर्षांखालील महिलांमध्ये भांग आणि कोकीनच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढतो.

तुमच्या हृदयाचा तुमच्या वयाशी काही संबंध आहे का?

2010 मध्ये नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार, 35-44 वयोगटातील लोकांपेक्षा 65-74 वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सात पटीने जास्त असते. त्याच वेळी, हा धोका 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 65-69 वयोगटातील लोकांपेक्षा दोन ते तीन पट जास्त असतो.

वृद्धांच्या तुलनेत, 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका या परिस्थितीत वाढतो. प्रथम, अति धूम्रपान, लठ्ठपणा, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास म्हणजेच अनुवांशिक.

Health Attack due to loud sounds
Heart Attack : बॉलीवूड सेलिब्रिटी फिटनेसची काळजी घेतात तरीही त्यांच्यात हार्टअटॅकचं प्रमाण जास्त का ?

हृदयविकाराच्या झटक्यास जबाबदार इतर घटक

वय : वाढत्या वयानुसार हृदयविकाराचा धोका वाढतो.

लिंग : वाढत्या वयानुसार, पुरुषांपेक्षा स्त्रियांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. उदाहरणार्थ, रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका वाढतो. त्याच वेळी, या वयात पुरुषांमध्ये हा धोका स्त्रियांपेक्षा थोडा कमी असतो.

आनुवंशिकता : ज्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये हृदयविकाराचा झटका आला असेल त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.