Lupas Disease : चेहऱ्यावर फुलपाखरासारखे चट्टे येत असतील तर सावधान.! महिलांमध्ये सर्वाधिक आढळतो ल्यूपस विकार

Lupas Disease : आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच अवयवांवर हल्ला चढविते, यातूनच हा विकार जडतो. प्रामुख्याने २० रुग्णांमध्ये ९ रुग्ण या महिला असतात, असे वातरोग तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
Lupas Disease
Lupas Diseaseesakal
Updated on

Lupas Disease : चेहऱ्यावर फुलपाखरांच्या आकारासारखे चट्टे (बटरफ्लाय रॅश) येत असतील, गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण होत असेल, वारंवार गर्भपात होत असल्यास वातरोगातील ल्युपस विकार (एलसीई) असू शकतो. हा विकार रोगप्रतिकार शक्तीचा विकार आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच अवयवांवर हल्ला चढविते, यातूनच हा विकार जडतो. प्रामुख्याने २० रुग्णांमध्ये ९ रुग्ण या महिला असतात, असे वातरोग तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

ल्युपसबाबत समाजात जनजागृती नाही. एक लाख व्यक्तींमध्ये ३ ते ४ रुग्ण याचे आढळतात. या आजारात एकाच वेळी शरीरातील उती अन्य अवयवांवर हल्ला करतात, यामुळे या विकारात वेळेत उपचार करणे आवश्यक आहे.

लहान वयातील मुली असो की, प्रजननक्षम महिला यांना हा विकार जडू शकतो. त्यामुळे या विकारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये,असे डॉ चहांदे म्हणाले.

ल्युपसचे निदान करणे कठीण आहे. निदानासाठी रक्त तपासणी, त्वचेची बायोप्सी, किडनीची बायोप्सी केली जाते. यामुळे महिलांमध्ये ही लक्षणे आढळल्यानंतरही महिला लपवितात. यामुळे आजार अधिक बळावतो. निदानासाठी बराच वेळ लागतो. निदान लवकर झाल्यास शरीराच्या अवयवांवर प्रभाव पडण्यापासून रोखता येते. गर्भधारणेस विलंब आणि गर्भपात यासारख्या समस्या उद्‍भवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून योग्य वेळेत उपचारांनी मातृत्वातील अडचण दूर करता येते आणि सामान्य जीवन जगता येते.

— डॉ. सौरभ चहांदे, वातरोगतज्ज्ञ, नागपूर

शरीराच्या विविध भागात दिसणारी लक्षणे

  • सांधे दुखणे-सुजणे व अकडणे

  • वारंवार ताप येणे

  • चेहऱ्यावर फुलपारखाच्या आकाराचे लाल चट्टे येणे

  • केस गळती, टक्कल पडणे

  • हातांच्या बोटांचा रंग बदलून निळा, काळा पडणे

  • हृदय, फुफ्फुसात पाणी जमा झाल्यास धाप लागणे

  • रक्तदाब वाढणे

  • श्वास घेण्यास त्रास

  • लघवीद्वारे प्रोटिनचे विसर्जन अधिक होणे

  • मेंदू संबधित लक्षणांमध्ये डोके दुखणे

  • फिट येणे, पक्षाघात होणे

  • रक्ताच्या विविध घटकांचे प्रमाण कमी होणे

  • रक्त आपोआप गोठणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.