Major Sign Of Stomach Cancer: धक्कादायक! तरुणांमध्ये वाढला पोटाच्या कॅन्सरचा धोका! पोटदुखी आणि जळजळ ठरू शकतं कारण

डेली रूटीन नसल्यामुळे हा धोका वाढतो आहे आणि यात धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीच्या काही स्टेप्स मध्ये हा कॅन्सर कळत नाही.
cancer
cancergoogle
Updated on

मुंबई : सध्या कॅन्सर फार झपाट्याने वाढतो आहे आणि अनेकदा त्याच लक्षणं लोकांना कळतच नाहीयेत. खूप साधी साधी दुखणी पण कॅन्सरचे कारण असू शकतात. या सगळ्यात ज्याचा कॅन्सर सर्वात जास्त वाढतो आहे तो म्हणजे पोटाचा कॅन्सर.

पोटाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. त्याची लक्षणे ओळखून योग्य वेळी उपचार केले तर एखाद्याचा जीव वाचू शकतो त्यामुळे या गोष्टी सगळ्यांनाच माहिती असणं खूप गरजेचं आहे. हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

पोटाचा कॅन्सर पूर्वी म्हाताऱ्या लोकांना सर्वात जास्त व्हायचा पण धक्कादायक बाब म्हणजे आता हा आकडा सर्वात जास्त तरुणांमध्ये दिसतो आहे.

कॅन्सर हा एक प्राणघातक आजार आहे आणि पोटाचा कॅन्सर हा थेट जठरासंबंधीत आहेत. पोटात अचानकपणे वाढणाऱ्या पेशी हे पोटाच्या कॅन्सरच मुख्य कारण आहे.

जर आपण जुना अहवाल बघितला तर तेव्हा म्हाताऱ्या आणि वयोवृध्द लोकांना पोटाचा कॅन्सर सर्वात जास्त होत होता. पण आत्ताच्या अहवालानुसार ३० ते ४० वयापर्यंतच्या लोकांना पोटाचा कॅन्सर सर्वात जास्त होतो आहे.

डेली रूटीन नसल्यामुळे हा धोका वाढतो आहे आणि यात धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीच्या काही स्टेप्स मध्ये हा कॅन्सर कळत नाही.

मसालेदार अन्न, कौटुंबिक आनुवंशिकता, लठ्ठपणा, धूम्रपान, जुन्या शस्त्रक्रिया आणि दीर्घकाळ जठराची जळजळ ही पोटाच्या कॅन्सरची कारणे आहेत. हा कॅन्सर टाळण्याचा उपाय म्हणजे त्याची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपाय करणं.

पोटाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षण जाणून घेऊया.

१. अपचन

जर तुम्ही जेवल्यावर तुमचं अन्न पचत नसेल. काहीही खाल्ल तरी छातीत जळजळ होत असेल आणि ढेकर दिल्याने अन्न परत घशात येत असेल तर ही पोटाच्या कॅन्सरची लक्षण असू शकतात. अपचनासाठी रोजची औषध काम करत नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

२. सतत छातीत जळजळ

जर एखाद्या व्यक्तीला पोटात सतत जळजळ होत असेल तर एसिडीटी झाली आहे अस आपण म्हणतो. पण, हा त्रास तर रेग्युलर होत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

३. त्वचेवर गाठी आणि पुरळ दिसणे

पोटाच्या कॅन्सरची लक्षण त्वचेवरही दिसून येतात. त्वचेवर पुरळ दिसते आणि सूज येण्याबरोबरच त्वचा सोलली जाते; ही देखील कोलन कॅन्सरच लक्षण असू शकतात.

४. भूक न लागणे

अचानक काहीही कारण नसतांना भूक लागण थांबल किंवा काहीही खावस वाटत नाहीये अगदी आवडती वस्तू समोर बघूनही खाता येत नाहीये, किंवा त्याची चव लागत नाहीये तर हे कॅन्सरच लक्षण असू शकतं.

५. मळमळ आणि उलट्या होणे

पोटात काहीही अन्न गेलं की लगेच उलट्या होण किंवा मळमळल्या सारखं होण हे सुद्धा कॅन्सरच कारण असू शकतं.

६. वजन कमी होणे

अचानक वजन कमी होणं, अशक्तपणा जाणवणे, थकवा जाणवण ही लक्षण देखील कॅन्सरची असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com