आपलं आरोग्य चांगलं असेल, तरच आपण आपली कामं चांगली करू शकतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मी कायम तत्पर असते. विविध प्रोजेक्ट्स आणि चित्रपटांच्या चित्रीकरणामुळे मला नेहमी बाहेर राहावं लागतं. प्रत्येक ठिकाणी जिम असेलच असं नाही, त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जिम करते.