Summer Skin Care: उन्हाळ्यात फक्त या ५ गोष्टींच्या मदतीने त्वचा होईल चमकदार आणि तरुण

काहींना उन्हाळ्यात गरमीमुळे चेहऱ्यावर मोठे फोड येतात तर काहींना एखाद्या ऍलर्जीप्रमाणे बारीक पुरळ येत. अशात नेमकं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत
Summer Skin Care Tips
Summer Skin Care TipsEsakal
Updated on

Skin Glowing Tips: उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे एकीकडे सनबर्नची चिंता सतावतेय तर दुसरीकडे घाम आणि उन्हामुळे त्वचा चिकट होवून मुरुम, ऍक्ने आणि पुरळ अशा समस्या उद्भवतात.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेला खाज येणं, जळजळ हा त्रास देखील होवू लागतो. Marathi Beauty Tips Skin care routine in Summer

या दिवसांमध्ये चेहऱ्यावरचा Face ग्लो टिकवून ठेवणं आणि चेहरा ताजातवाना ठेवणं एक अवाहनच असंत. यासाठीच उन्हाळ्यात त्वचेची खास काळजी Skin Care घेणं गरजेचं असतं. अनेकदा उन्हात जास्त काळ राहिल्यास चेहरा काळवंडतो तर काहीवेळा चेहरा लालसर होऊन चट्टे पडतात.

काहींना उन्हाळ्यात गरमीमुळे चेहऱ्यावर मोठे फोड येतात तर काहींना एखाद्या ऍलर्जीप्रमाणे बारीक पुरळ येत. अशात नेमकं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. 

क्लिंजर आणि सनस्क्रीन

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुर्याच्या अतिनील किरणांपासून चेहऱ्याचं रक्षण करण्यासाठी चेहरा दिवसातून दोनदा तरी स्वच्छ करणं आवश्यक आहे.  चेहरा क्लिन करण्यासाठी क्लिंजरचा cleanser वापर करावा.

हे क्लिंजर अल्कोहल, केमिकल आणि स्मेल फ्री असेल असं निवडावं. विटामिन B3 इन्फूस्ड क्लिंजर हा उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे चेहऱ्यावरी अतिरिक्ट तेल आणि पोर्स सहजपणे स्वच्छ करण्यास मदत करतं. 

त्याचसोबत सनस्क्रिन हा उन्हाळ्यासाठी अतिआवश्यक आहे. यामुळे सुर्याच्या UV किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं. तुमच्या त्वचेप्रमाणे सनस्क्रीन निवडणं गरजेचं आहे. चेहरा तेलकट असल्यास क्रिम बेस सनस्क्रीन  न निवडता ते  वॉटरबेस्ट किंवा जेलबेस्ट सनस्क्रीन निवडावं. नाहीतर चेहरा चिकट होवून पिंपल येऊ शकतात.  Sunscreen for summers 

तसचं सनस्क्रीन हे किमान ३० SPF क्षमता असलेलं तरी असावं. घरातून बाहेर निघण्यापूर्वी किमान २० मिनिट आधी ते लावावं. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात बाहेर राहणार असाल. तर अशावेळी सतत घाम येऊ शकतो. त्यामुळे शक्य झाल्यास काही तासांनी पुन्हा चेहरा धुवून सवस्क्रीन लावल्यास जास्त फायदा होईल. 

हे देखिल वाचा-

Summer Skin Care Tips
Benefits of Tulsi for Skin : तुळशीचा Face Pack लावून इतकं गोरं व्हाल की, लोकं विचारतील ‘क्या है आपकी खुबसूरती का राज!

त्वचेला एक्सफोलिएट करणं

वेळोवेळी त्वचेला एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. यामुळे चेहरा स्वच्छ दिसू लागतो आणि चेहऱ्यावर चमक येते. एक्सफोलिएट म्हणजेच चेहऱ्यावरील मृतपेशी काढून टाकणं. या प्रक्रियेला एक्सोफोलिएशन म्हंटलं जातं. यासाठी एक योग्य स्क्रब निवडणं गरजेचं आहे.

ज्यामुळे जळजळ होणार नाही आणि त्वचा खोलवर साफ होण्यास मदत होईल. नियमितपणे एक्सोफोलिएशन केल्याने त्वचेचा पोत सुधारतो तसचं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. Scrub skin 

त्वचा हायड्रेट ठेवणं

उन्हाळ्यात शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम जात असल्याने शरीरात पाणी आणि इतर पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. शरीरात ओलावा राखण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्यासोबत त्वचेचं बाहेरुन रक्षण करणं गरजेचं आहे.

त्वचेतील ओलावा राखुन ठेवण्यासाठी हायऐल्युरोनिक  hyaluronic  ऍसिड युक्त डे क्रिमचा वापर करावा. यामुळे त्वचा मॉइस्चराइस होण्यास मदत होते. दिवसातून दोन वेळा या क्रिमचा उपयोग करावा. 

नाईट रिपेयर फॉर्मुला

जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर स्वत:ला रिपेयर करणायचं काम करत असतं.  त्वचेलाठी देखील ही वेळ रिकव्हर होण्याची असते. यासाठी योग्य नाईट क्रिमची निवड करावी. नाईट क्रिम लावल्याने त्वचा ग्लो करू लागते तसचं सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे चेहरा तरुण दिसण्यास मदत होते. 

व्हिटॅमिन सी चा वापर

त्वचेला हेल्दी आणि चमकदार ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन सी धूळ, धूर आणि प्रदूषणापासून त्वचेच रक्षण करण्यास मदत करतं. व्हिटॅमिन सी मुळे त्वचेतील कोलेजन पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावरील डाग फिके होण्यास मदत होते. तसचं चेहरा उजळतो. Vitamin C for glowing skin

तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये या गोष्टींचा समावेश केला तर उन्हाळ्यातही तुम्हाला तुमच्या त्वचेचं संरक्षण करून त्वचा हेल्दी आणि तजेलदार ठेवता येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.