Back Pain: काम करताना कंबरेत सतत चमक येते? मग करा हे उपाय....

Back Pain Relief Exercise: रोजची काम करत असताना कंबरेत लचक येणं किंवा खांद्यामध्ये वेदना निर्माण होणं या समस्या निर्माण होत असतानाही अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र कालांतराने या वेदना गंभीर स्वरुप घेऊ शकतात
Kamrecha Vyayam
Kamrecha VyayamEsakal
Updated on

Back Pain Relief Exercise: अनेकदा काम करत असताना कंबरेमध्ये अचानक चमक येते किंवा गोळा येतो. तसचं पाठीमध्ये खांद्यामध्ये किंवा खांद्यांच्या खाल तीव्र वेदना Pains निर्माण होतात. बऱ्याचदा अचानक खाली वाकल्याने, एखादी जड वस्तू उचलल्याने किंवा काही वेळस अनेक तास एकाच जागी बसून राहिल्याने देखील कंबर अखडते किंवा लचकली जाते. Marathi Fitness Tips how to get relief from waist pain

स्नायूंमधील Muscles या वेदनांमुळे अनेकदा रोजची काम करणं देखील कठीण होतं. खास करून महिलांमध्ये या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. रोजची काम करत असताना कंबरेत लचक येणं किंवा खांद्यामध्ये वेदना Shoulder Pain निर्माण होणं या समस्या निर्माण होत असतानाही अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र कालांतराने या वेदना गंभीर स्वरुप घेऊ शकतात.

यासाठीच रोजच्या दिनचर्येमध्ये काही साध्या योगासनांचा Yoga समावेश केल्यास या समस्या दूर होवू शकतात.

नियमितपणे काही साधी योगासनं केल्याने पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत होते. तसचं काही योगासनांमुळे एनर्जी लेव्हल वाढण्यासोबतच शरीराचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

१. स्ट्रेचिंग- कोणत्याही व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी तुम्ही पद्मासनामध्ये बसा. त्यानंतर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये लॉक करा. हात वरकरत संपूर्ण शरीराला ताण देण्याचा प्रयत्न करा. साधारण २० सेकंदांसाठी हात स्ट्रेच करा. त्यानंतर शरीर सैल सोडा.

त्यानंतर ताठ उभे राहून हात सरळ वर करून मागील बाजूला वाका. छत पाहण्याचा प्रयत्न करा. हळूहळू सरळ होत पुढील बाजूला वाकून हाताने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. २० सेकंदांसाठी या स्थिर रहा.

Kamrecha Vyayam
Muscle Memory : बॉडी स्ट्राँग करणारी ही मसल्स मेमरी म्हणजे नेमके काय? जाणून घ्या सविस्तर

सेतूबंधासन- पाठीचं दुखणं दूर करून पाठीचे स्नायू मजबूत करण्यासाठी तसंच कंबरदुखी कमी करण्यासाठी सेतूंबंधासन फायदेशीर ठरतं. यासाठी जमिनीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवावे. त्यानंतर हळुवारपणे कंबर वर उचलावी.

खांदे आणि पायांवर भार घेत पोटाकडील भाग वर उचलल्याने शरीराची स्थिती सेतू म्हणजेच पुलासारखी दिसते. या स्थितीत ३० सेकंदांसाठी थांबून पुन्हा पोटाचा भाग खाली घेत जमिनिला टेकवावा. साधारण ४-५ वेळा हे आसन पुन्हा करावं.

मार्जार्यासन- मार्जरी आसनामुळे पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत होते. यामध्ये तुम्हाला गुडघ्यांवर एखाद्या प्राण्याप्रमाणे वाकून गुडघे आणि हात टेकावे. त्यानंतर पाठीला पूर्णपणे बाक काढून वरील बाजूला पहावं. या आसनामुळे पोटीची चरबी कमी होण्यासही मदत होते.

भुजंगासन- भुजंगासनाचे शरीराला अनेक फायदे मिळतात. हे योगासन म्हणजे एक उत्तम प्रकारचं स्ट्रेचिंग आहे. भुजंगासनामुळे पाठीचे स्नायू ताणले गेल्यामुळे ते लवचिक आणि मजबूत होण्यास मदत होते.

तसंच भुजंगासनामध्ये खांदे, हाताचे स्नायू आणि पोटाचे स्नायू देखील ताणले जातात. यामुळे पोट कमी होण्यास मदत होते. तसचं खांदे देखील मजबूत होतात.

अर्धमच्छेंद्रासन- अर्धमच्छेंद्रासनामुळे शरीर लवचिक होण्यास मदत होतो. खास करून पाठीचा कणा आणि नितंब लवचिक होतात. यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. अर्धमच्छेद्रासनामुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान होणारी पाठदुखी आणि कंबरदुखी कमी होण्यास मदत होते.

दररोज या काही योगासनांचा सराव केल्यास पाठीचा कणा मजबूत होवू शकतो. ज्यामुळे अचानक कंबरेमध्ये कळ येणं, पाठ किंवा खांदे अवघडणं या समस्या दूर होतात.

हे देखिल वाचा-

Kamrecha Vyayam
Strong Muscles : स्नायू बळकट बनवायचे असतील तर हे खा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.