Health Tips : झटपट Weight Loss करायचाय? मग मखानाच्या या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा

मखाना हा एक हेल्दी स्नॅक्स म्हणून तुम्ही दैनंदिन आहारामध्ये खावू शकता. तसचं वेट लॉस डाएटमध्ये तुम्ही मखानाच्या विविध रेसिपी ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला कॅलरीची चिंता न करता चविष्ट पदार्थ खाल्ल्याचं समाधान मिळेल
मखानाच्या रेसिपी
मखानाच्या रेसिपीEsakal
Updated on

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण विविध पदार्थ ट्राय करत असतात. अनेकदा डाएटसाठी क्विनोओ, अवाकाडो, झुकिनी अशा एक ना अनेक परदेशी पदार्थांचा आपण आहारात समावेश करतो. Marathi Food Tips for healthy diet try foxnut makhana in your food

मात्र अनेकदा आपण आपल्या देशात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांकडे दुर्लक्ष करत असतो ज्याचे आरोग्यासाठी मोठे फायदे आहेत. यापैकीच एक म्हणजे मखाना Makhana.

जगभरात सध्या फॉक्सनट Foxnut किंवा लोटस सीड नट्स म्हणून डाएटफूड Diet Food म्हणून प्रचलित असलेला मखाना भारतात सहज उपलब्ध होतो. मुळात जगभरातील एकूण मखाना उत्पादनापैकी सर्वात जास्त मखानाचं उत्पादन हे भारतातच होतं. वजन कमी करण्यासोबतच मखानाच्या सेवनाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

मखानामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, प्रोटीन, फायबर तसचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस आढळतं. तसचं यात अत्यंत कमी कॅलरीज असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तर त्याचसोबत हाडं मजबूत होण्यास, ब्लड प्रेशर Blood Pressure नियंत्रणात राखण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राखण्यास मखानाचं सेवन उपयुक्त ठरतं.

मखाना हा एक हेल्दी स्नॅक्स म्हणून तुम्ही दैनंदिन आहारामध्ये खावू शकता. तसचं वेट लॉस डाएटमध्ये तुम्ही मखानाच्या विविध रेसिपी ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला कॅलरीची चिंता न करता चविष्ट पदार्थ खाल्ल्याचं समाधान मिळेल.

हे देखिल वाचा-

मखानाच्या रेसिपी
Health : महिलांनो मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जरुर वाचा...

चटपटीत मखाना चाट

संध्याकाळची वेळ झाली की अनेकांना काहीतरी चटपटीत खाण्याची सवय असते. अशात जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर मखाना चाट हा एक उत्तम पर्याय आहे.

मखाना चाट तयार करण्यासाठी एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालून ते तापू द्या.

तूप तापताच त्यात १ वाटी मखाना टाकून मंद आचेवर ५-७ मिनिटं मखाना चांगले भाजू द्या.

त्यानंतर एका बाऊलमध्ये मखाना काढा. यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली काकडी टाका.

आता यात चिमूठभर मीठ, जीरं पावडर, पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा चाट मसाला टाकून सर्व एकत्र करून घ्या.

यावर आवडीनुसार थोडं लिंबू पिळून तुम्ही चटपटीत मखाना चाट एन्जॉय करू शकता.

मखाना खीर

जर वेटलॉस डाएटमध्ये तुम्ही हेल्दी स्विटडीश शोधत असाल तर मखाना खीर नक्की ट्राय करा. कमी कॅलरी असलेली ही खीर तुम्ही ट्राय करू शकता.

मखाना खीर तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये १ वाटी मखाने ५-७ मिनिटांसाठी मंद आचेवर रोस्ट करा.

कढईतील मखाने काढून याच कढईत १ चमचा तूप घालून २ काजू आणि २ बदामाचे तुकडे हलके परतून घ्या. त्यानंतर यात २ कप दूध टाका.

दुधाला चांगली उकळी येऊ द्या.

तोवर भाजलेले मखाने खलबत्ता किंवा मिक्सरमध्ये हलके बारीक करा. मखानाची पावडर होणार नाही याची काळजी घ्या.

हे बारीक केलेले मखाना उकळच्या दुधात टाका आणि ढवळत रहा.

४-५ मिनिटांसाठी मखाने दुधात शिजू द्या.

आता यात पाव चमचा वेलची पूड टाका.

खिर गोड व्हावी यासाठी साखरेएवजी २ चमचे खारिक पावडर किंवा ३-४ खजुराची पेस्ट करूनही टाकू शकता.

अशा प्रकारे ही मखानाची खीर तुम्ही थंड किंवा गरमागरम खावू शकता.

हे देखिल वाचा-

मखानाच्या रेसिपी
Benefits Of Eating Makhana : पुरुषांसाठी मखाना खाण्याचे हे आहेत फायदे...

मखाना रायता

वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएटमध्य मखाना रायता खावू शकता. दह्यासोबत हा रायता किंवा कोशिंबीर तयार केली जातत असल्याने शरीराला आवश्यक प्रोटीन आणि कॅल्शियम मिळतं.

मखाना रायता तयार करण्यासाठी एका वाडग्यात १०० ग्रॅम दही चांगलं फेटून घ्या. यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाव चमचा जींरं पूड, एक बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्ही दही फेटा. आता यात भाजलेले मखानी थोडे बारीक करून अॅड करा. रायता १० मिनिटांसाठी झाकून ठेवा. त्यानंतर जेवणासोबत किंवा स्नॅक्स म्हणूनही तुम्ही रायता खावू शकता.

अशा प्रकारे तुमच्या वेटलॉस डाएटमध्ये मखानाच्या या टेस्टी डिशमुळे तुम्हाला पुरेसं पोषण मिळेल आणि वजनही वाढणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.