Jamun Benefits for Diabetic Patients: मधुमेह ही एक अशी समस्या आहे जिच्यावर अद्याप कोणताही इलाज नाही. मात्र आहारात योग्य ते बदल करून आणि काही आयुर्वेदिक औषधांच्या Ayurvedic Medicine च्या मदतीने मधुमेह नियंत्रणात ठेवणं शक्य आहे.
अशाच एका छोट्याश्या फळाच्या मदतीने तुमची शुगर झटक्यात नियंत्रणात येईल. Marathi Health Tips Advantages of Jamun Fruit for Diabetic Patients
हे फळ म्हणजे जांभूळ Purple Jambhul. जांभळाच्या सेवनामुचे शरीरासाठी इतरही अनेक फायदे आहेत. जाभंळातील पोषक तत्व मधुमेही Dieabetic रुग्णांसाठी फायदेशीर आहेतच शिवाय इतर अनेक समस्यांसाठी हे फळ Fruit उपयुक्त ठरू शकतं.
जांभुळ हा आयर्नचा एक मुख्य स्त्रोत आहे. यातील अँटीऑक्सिडेंट गुण अशुद्ध रक्त-शोषक म्हणून काम करतात. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी तो एक रामबाण उपाय आहे. जांभळाचं नियमित सेवन ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतं. मधुमेही रुग्णांनी जांभळाच्या अर्काचं नियमित सेवन केल्यास नक्कीच फरक जाणवू शकतो.
जांभळाचा अर्क काय काम करतं.
जांभळामध्ये जॅम्बोलिन नावाचं सक्रिय तत्व असते. हे जंबोसीन रक्तातील सारखेचे प्रमाण कमी करते आणि शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढवते. NIH एका संशोधनात सांगण्यात आले आहे की, जांभूळ डायबेटीसमध्ये बायोएक्टिव्ह कंपाउंडप्रमाणे काम करतात.
जांभळामध्ये साइज़ीगियम क्यूमिनी आढळतं ज्यामुळे कि अँटीहाइपरग्लाइसेमिक (antihyperglycemic action) एक्शन घडते. मधुमेहात खाल्ल्या जाणाऱ्या मेटफॉर्नमिन औषधाप्रमाणेच हे काम करतं. यामुळे आधी शुगल मेटाबोलिज्म जलद होतं. त्यासाठी इन्सुलिनची निर्मिती वाढते. त्याचसोबत यामुळे स्वादूपिंड्याच्या कामाला गती मिळते आणि शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मधुमेहामध्ये जाभुळ खाण्याचे फायदे
मधुमेहात जांभुळ खाण्याचे एक नव्हे तर अनेक फायदे आहेत.
यातील बायोएक्टिव्ह कंपाउंड स्वादूपिंडच्या कामात गती निर्माण करतं.
यातील प्लेव्होनाइड्स, पॉलिफेनॉल्स आणि अँटीऑक्सिडंट्स इन्सुलिनप्रमाणे काम करतात. त्यामुळे शरीरात साखर लवकर पचण्यास मदत होते.
तसंच जांभळातील विटामिन सी हे मधुमेहातील इतर समस्या जसं की त्वचेच्या समस्या, पोटाच्या समस्या आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणं अशा समस्यांवर उपयुक्त ठरतं.
जांभळाच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते.
जांभळाच्या सेवनाने पोटाच्या समस्या दूर होतात.
मधुमेहामध्ये जांभळाचं सेवन कसं करावं
मधुमेहासाठी तुम्ही विविध प्रकारे जांभळाचं सेवन करू शकता. यासाठी तुम्ही थेट जांभळाचं फळ खाऊ शकता. मात्र हे फळ वर्षभर उपलब्ध नसल्याने तुम्ही जांभळाच्या अर्काचं सेवन करू शकता. तसचं जांभळाच्या पावडरचं तुम्ही सेवन करू शकता.
हे देखिल वाचा-
जांभळाच्या बिया देखील मधुमेह नियंत्रणात राखण्यासाठी फायदेशीर
जांभळाच्या फळाप्रमाणेच या फळाच्या बियादेखील मधुमेह नियंत्रणात आणण्यास मदत करतात. या बियांचा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो.
या बियांमध्ये देखील अँटी-डायबेटिक, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुण आढळतात. त्यामुळे या बिया डायबिटीज आणि अॅनिमिया या आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी रामबाण उपाय आहेत.
जांभळाच्या बियांची पावडर कशी तयार कारावी?
मधुमेही रुग्णांनी जांभळाचं सेवन केल्यानंतर बिया न फेकता त्या साठवून ठेवाव्यात. त्यानंतर या बिया स्वच्छ धुवून घ्याव्या. जवळपास २ ते ३ दिवस या बिया उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्याव्या.
या बिया पूर्णपणे वाळल्यानंतर त्यावरील साल काढून घ्यावी आणि आतीस हिरव्या गराचे दोन भाग करून घ्यावे. हे हिरवे गर पुन्हा २-३ दिवस वाळू द्यावे. हे गर पूर्णपणे वाळल्यावर मिक्सरमध्ये त्याची पावडर तयार करावी. ही पावडर हवाबंद डब्यामध्ये ठेवावी.
हे देखिल वाचा-
जांभळाच्या बियांच्या पावडरचं सेवन कसं करावं
रोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जांभळाच्या बियांची पावडर मिसळून सेवन करावं. नियमित हे पेय प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
अशा प्रकारे मधुमेही रुग्णांसाठी जांभळाच्या फळांसोबतच त्याच्या बिया देखील शुगर नियंत्रणात आणण्यास उपयुक्त ठरू शकतात.
टीप - हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. कुठल्याही पदार्थाचे वैद्यकीय कारणासाठी सेवन करण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.