दिवसभर सतत गोड पदार्थ खाताय? Diabetes सह होवू शकतात ‘हे’ आजार

गोड खाण्याच्या सवयी कालांतराने महागात पडू शकतात. गोड खाल्ल्याने मधुमेह होतो असा अनेकांचा समज असतो. मात्र गोड पदार्थांमुळे केवळ मधुमेहच नव्हे तर इतरही गंभीर आजारांना निमंत्रण मिळतं
सतत गोड खाण्याची घातक सवय
सतत गोड खाण्याची घातक सवयEsakal
Updated on

गोड पदार्थ खाणं कुणाला आवडतं नाही. भारतात तर सणासुदीच्या दिवसांत गोड पदार्थ आवर्जुन घराघरामध्ये बनवले जातात. सणासुदीला किंवा कधीतरी गोड पदार्थ खाणं योग्य आहे. मात्र ज्याप्रमाणे कोणत्याही पदार्थाचं अतिसेवन आरोग्यासाठी Health हानिकारक ठरू शकतं. Marathi Health Tips Avoid Eating Sweets whole day to avoid illness

त्याचप्रमाणे सतत गोड पदार्थ खाल्ल्याने त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतात. अनेकांना गोड पदार्थ Sweets खायला आवडतात. चॉकलेट, केक, पेस्ट्री तसचं मिठाई आणि गोड पेये सहज उपलब्ध होत असल्याने अनेकजण दिवसभर सतत गोड पदार्थांचं सेवन करत असतात.

जेवल्यानंतर काही ना काही गोड पदार्थ खाण्याची काहींना सवय असते. तर अनेकांना गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय रात्री झोपच Sleep लागत नाही.

येता जाता चॉकलेट, केक असे पदार्थ खाण्याची सवय असते. तर अनेकांना झोपण्यापूर्वी मिठाई किंवा आईस्क्रिम खाण्याची सवय असते. मात्र या गोड खाण्याच्या सवयी कालांतराने महागात पडू शकतात. गोड खाल्ल्याने मधुमेह होतो असा अनेकांचा समज असतो. मात्र गोड पदार्थांमुळे केवळ मधुमेहच नव्हे तर इतरही गंभीर आजारांना निमंत्रण मिळतं.

हृदय रोगांचा धोका वाढतो

गोड पदार्थांच्या सेवनामुळे हृदयाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. खास करून सॉफ्ट ड्रिंक्स किंवा पाकिटबंद ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचं प्रमाण असतं. तसचं यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हचं प्रमाणही जास्त असतं. ज्याचा थेट तुमच्या हृदयावर परिणाम होत असतो.

शिवाय गोड पदार्थांच्या सेवनामुळे वजन वाढून त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होवू शकतो.

सतत गोड खाण्याची घातक सवय
Midnight Hunger: तुम्हाला देखील मध्यरात्री भूक लागते का? Ice cream किंवा Sweets खाण्याची इच्छा होते का? हे आहे त्यामागचं कारण

मधुमेह

सतत गोड पदार्थांच्या सेवनामुळे मधुमेहाचा धोका बळावतो. गोड पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. तसचं येता जाता गोड पदार्थ खात असाल तर शरीरात सतत इन्शुलिन तयार होत राहतो. या सर्वाचा परिणाम शरीरावर होवून मधुमेहासोबतच डोकेदुखी, मूड स्विंग अशा समस्या निर्माण होवू शकतात.

कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका

जास्त गोड पदार्थाच्या सेवनामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. साखरेच्या अति सेवनामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढत असल्याचं रिसर्चमधून समोर आलंय. तसचं अनेक गोड पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल, बटर, तूप यांचा वापर करण्यात आलेला असतो. ज्यामुळे देखील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं.

फॅटी लिव्हर

अति साखरेच्या किंवा गोड पदार्थाच्या सेवनामुळे लिव्हर म्हणजेच यकृतावर परिणाम होवू शकतो. यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होवू शकते.

लठ्ठपणा

गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे जलद गतीने वजन वाढू शकतं. शिवाय वजन वाढल्याने शरीराच्या इतर समस्या निर्माण होवू शकतात. वजन वाढल्यानंतरही जर तुम्ही सतत गोड पदार्थांचं सेवन करत असाल तर नैराश्य, चिंता अशा मानिसक समस्या निर्माण होवू शकतात.

इतर समस्या

जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दातांच्या समस्या निर्माण होतात. दातदुखी किंवा दातांना किड लागणं अशा समस्या निर्माण होतात. गोड पदार्थांच्या सेवनामुळे हाडं ठिसूळ होवून सांधेदुखी आणि हाडांच्या समस्या उद्भवतात. तसचं पिंपल्स आणि त्वचा तेलकट होते. यासाठीच गोड पदार्थांचं नियंत्रणात सेवन करणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.