सब्जाच्या बियांचे अनेक फायदे, वजन होईल कमी आणि मिळेल Skin Glow सुद्धा

या बियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि गुड कार्ब्स असतात. अनेक पोषक तत्व असल्यामुळे सब्जाच्या बियांच्या सेवनामुळे आरोग्याच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते
Tulsi Seeds Benefits
Tulsi Seeds BenefitsEsakal
Updated on

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये Summer Days किंवा गरमी वाढू लागली विविध पेय किंवा सरबतांचं सेवन केलं जातं. यामध्ये लिंबू सरबत असो किंवा कोकम सरबत आणि गुलाब सरबतामध्ये सब्जा टाकून त्याचं सेवन केलं जातं.

खरं तर सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया Sabja Tulsi Seeds या शरीरासाठी थंड असल्याने या उन्हाळ्यामध्ये विविध सरबत किंवा फालुद्यामध्ये टाकून या बियांचं सेवन केलं जातं. Marathi Health Tips Benefits of Sabja Seeds for weight loss and skin glow

शरीर थंड ठेवण्यासोबतच सब्जाचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळेच केवळ उन्हाळ्यातच Summer नव्हे तर तुम्ही इतर वेळी देखील या बियाचं सेवन करू शकता. सब्जाच्या बियांमध्ये Tulsi Seeds मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, आयर्न तसंच फॉलिक अॅसिड्स असतात.

तसंच या बियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि गुड कार्ब्स असतात. अनेक पोषक तत्व असल्यामुळे सब्जाच्या बियांच्या सेवनामुळे आरोग्याच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते.

वजन कमी होण्यास मदत

जर वाढत्या वजनामुळे तुम्ही त्रस्त आहात आणि डाएट करणं देखील तुम्हाला कठिण जातं असेल किंवा सतत भूक लागत असल्याने वजन नियंत्रणात ठेवणं कठिण होत असेल तर तुम्ही सब्जाचं सेवन करून वजन कमी करू शकता.

यासाठी तुम्हाला रात्री २ चमचे सब्जा पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी १ ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू, मध आणि भिजलेले सब्जा टाकून सकाळी या पाण्याचं सेवन करा. आठवड्यातून केवळ २-३ वेळा या सब्जाच्या पाण्याचं सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

Tulsi Seeds Benefits
Tulsi Water Benefits : रोज सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' फायदे

PCOD साठी उपयुक्त

ज्या महिलांना PCODची समस्या आहे. अशा महिलांसाठी सब्जाचं सेवन उपयुक्त ठरू शकतं. यासाठी १ चमचा सब्जा रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी कोमट पाण्यासोबत या बियांचं सेवन करा. या बियांच्या सेवनामुळे अनियमित येणारी मासिक पाळीची Menstrual Cycle समस्या दूर होण्यास मदत होते.

सब्जामध्ये असलेल्या प्रोटीन, व्हिटॅमिन्स, खनिजं आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्समुळे पीसीओडीची समस्या दूर होण्यास मदत होते. तसचं हार्मोनल बॅलेन्स सुरळित होतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

सब्जाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन तसंच जीवनसत्व आणि खनिजं असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या बियांच्या सेवनामुळे सर्दी-पडसे अशा संसर्गापासून दूर राहणं शक्य होतं.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

सब्जामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, आयर्नसारखी पोषक तत्व आढळतात. त्यामुळे त्वचा आणि केसांचं आरोग्य चांगलं राहण्यात मदत होते. यासाठी तुम्ही सब्जाच्या सेवनासोबतच सब्जाच्या बिया भिजवून त्याची पेस्ट तयार करून फेसपॅक किंवा हेअरपॅक म्हणूनही वापर करू शकता. यामुळे त्वचा आणि केस चमकदार होतील.

शरीराला मिळेल कॅल्शियम

सब्जाच्या सेवनामुळे शरीराला पुरेस कॅल्शियम मिळतं. शरीरातील कॅल्शियमची कमतरचा दूर करण्यासाठी दिवसभरात १ चमचा सब्जाचं सेवन करणं उपयुक्त ठरतं. यामुळे हाडं आणि स्नायू मजबूत होतात.

सब्जाच्या बियांचं सेवन तुम्ही सरबत, स्मूदी, दूध किंवा सूप आणि स्वीट डीशमध्ये टाकून करू शकता. अशा प्रकारे केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर कधीही सब्जाचं सेवन करणं आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतं.

हे देखिल वाचा-

Tulsi Seeds Benefits
Healthy Drinks For Bones : वेळ निघून गेल्यावर हाडे दुखतात म्हणून रडून काही फायदा नाही, वेळीच ही फळे खायला सुरू करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.