Pregnancy Planning Tips: आई होणं Motherhood ही कोणत्याही महिल्याच्या आयुष्यातील एक महत्वाची पायरी असते. आई होत असताना प्रत्येक महिला ही मानसिक Psychological आणि भावनिकरित्या विविध परिस्थितींचा सामान करत असते. Marathi Health Tips Change Lifestyle before conceiving
आई होत असताना तिला स्वत:च्या आरोग्यासोबतच Health पोटातील गर्भाची देखील काळजी घ्यायची असते. म्हणून आई होण्यापूर्वी महिलांना फिट Fitness राहणं अत्यंत गरजेचं आहे. अलिकडे बदललेल्या जीवनशैलीमुळे Lifestyle गर्भधारणेसाठी अनेक समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. यासाठीच प्रेग्नन्सी Pregnancy प्लॅन करण्यापूर्वीच लाइफस्टाइल म्हणजेच जीवनशैलीत बदल करणं अत्यंत गरजेच आहे.
प्रेग्नन्सी प्लॅन करताना वजन नियंत्रणात Weight Control ठेवणं तसचं योग्य डाएट आणि अनेक गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर तसचं गर्भधारणेच्या शक्यतेवर आणि गरोदरपणावर परिणाम होत असतो. यासाठीच जर तुम्ही आधीपासून काही चांगले बदल केले तर तुमचा गरोदरपणाचा काळ आनंदी जाण्यासाठी मदत होईल. तसचं कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत.
वजन नियंत्रणात ठेवणं- आई होत असताना तुमचं वजन हा एक महत्वपूर्ण घटक आहे. गर्भधारणेसाठी तुमचं वजन हे जास्त किंवा कमी देखील असू नये. अलिकडे खास करून वाढत्या वजनामुळे कन्सिव्ह होण्यासाठी समस्या निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय.
वजन नियंत्रणात असल्यास कन्सिव्ह करण्यासाठी म्हणजेच गर्भधारणेसाठी समस्या निर्माण होत नाहीत. तसचं यामुळे गर्भपाताचा धोका कमी होतो. शिवाय गर्भधारणेत महिलांचं वजन किमान १५-१६ किलोंनी वाढतं. अशात आधीच वजन जास्त असेल तर पुढे गरोदरपणात आणि प्रसूतीसाठी समस्या निर्माण होऊ शकता.
त्यामुळेच प्रेग्नन्सी प्लॅन करताना किमान ३ महिने आधी पासून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू करा. वर्कआउट, योगाच्या मदतीने तसचं योग्य डाएट घेऊन जास्त वजन असल्यास ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.
हे देखिल वाचा-
प्रोसेस्ड फूड बंद करा- जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर आधी प्रोसेस्ड फूड म्हणजेच प्रक्रिया केलेल पदार्थ आणि जंक फूड बंद करा. प्रोसेस्ड फूड आणि साखरेमुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. यामुळे जेस्टेशनल डायबिटीसचा धोका देखील वाढतो. परिणामी गर्भावस्थेत समस्या निर्माण होवू शकतात.
प्रोसेस्ड फूडच्या अति सेवनामुळे हार्मोन्सवरही Hormones परिणाम होवून गर्भधारणेस समस्या निर्माण होवू शकतात. तसचं यामुळे हाडांवर परिणाम होत असल्याने पुढे जाऊन इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.
फॉलिक अॅसिडचं प्रमाण वाढवा- गर्भधारणेसाठी तसचं बाळाच्या न्यूरल ट्यूबच्या विकासासाठी फॉलिक अॅसिड अत्यंत गरजेचं असतं. यामुळे पुढे बाळाचा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड तयार होण्यासाठी मदत होते. म्हणून प्रेग्नेंसी प्लॅन करतानाच डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलिक अॅसिडचं औषध घेण्यास सुरुवात करा.
याचसोबत आहारामध्ये फॉलिक अॅसिडने परिपूर्ण असलेल्या पदार्थांचा समावेश वाढवा. यासाठी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, बिन्सचा समावेश करा. तसचं पपई, केळी, द्राक्ष आणि खरबूज अशा फळांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.
कॅफेनचं प्रमाण कमी करा- प्रेग्नन्सी प्लॅन करताना कॅफेनयुक्त पदार्थांच्या सेवननावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. दिवसातून केवळ एक कप चहा किंवा कॉफीचं सेवन करा. तसचं खास करून कॅफेनयुक्त सॉफ्ट ड्रिंक्स आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स पूर्ण पणे बंद करा. या पेयांमध्ये कॅफेनसोबतच साखरेचं प्रमाण जास्त असल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.
व्हिटॅमिन्स- गर्भधारणा आणि गरोदरपणासाठी शरीराला व्हिटॅमिन्स गरजेची असतात. यासाठीच आधीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रिनेटल विटामिन्स घेणं सुरु करा. तसचं आहारामध्य व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी तसचं व्हिटॅमिन बी१२ असलेल्या पदार्थांचा समावेश वाढवा.
गरोदरपणामध्ये आणि त्यानंतर शरिराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियमची आवश्यकता असल्याने नियमितपणे दूधाचं सेवन करा.
अशा प्रकारे जर प्रेग्नेंची प्लान करतानाच तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर पुढे गरोदरपणामध्ये समस्या निर्माण होणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.