Crying Benefits हसण्यासारखेच रडण्याचेही शरीराला आहेत फायदे, रडा आणि आरोग्यदायी रहा

ज्याप्रमाणे मनसोक्त हसल्याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मन मोकळं करून रडल्यानेही आरोग्य सुधारतं. तेव्हा पाहुयात रडण्याचे काही फायदे...
रडण्याचे फायदे
रडण्याचे फायदेEsakal
Updated on

अनेकदा आपल्याला कुणी काही वाईट बोललं किंवा आपलं मन दुखावलं असताना अश्रू Tears अनावर होतात. काही वेळा शारीरिक वेदना हे देखील अश्रूंसाठी कारण असू शकतं. मात्र अनेकदा अश्रू किंवा रडणं हे कुमकुवत Weak असल्याचं लक्षण मानलं जातं. Marathi Health Tips Crying also can be beneficial

यासाठीच अनेक पुरुष Male आपल्या भावनांना Emotions वाट मोकळी करून देण्यासाठी रडत नाहीत. मात्र तुम्हाला एकून आश्चर्य वाटेल पण रडण्याचे आरोग्यासाठी काही फायदे देखील आहेत. रडल्यामुळे Crying मन हलकं झाल्याचं तुम्हाला अनेकदा जाणवलं असेल. रडल्यामुळे डोक्यावरील विचारांचं ओझ दूर होवून मानसिक शांती लाभते.

यामुळेच अनेक संशोधकांच्या मते रडणं हे शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी Mental Health फायद्याचं आहे. ज्याप्रमाणे मनसोक्त हसल्याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मन मोकळं करून रडल्यानेही आरोग्य सुधारतं. तेव्हा पाहुयात रडण्याचे काही फायदे...

शरीरातील टॉक्सिन्स Toxins बाहेर पडतात- तज्ञांच्या मते ज्याप्रमाणे घाम आणि लघवीवाटे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर पडतात. त्यातप्रमाणे डोळ्यातून अश्रू आल्यावरही डोळे स्वच्छ होण्यास मदत होते. अश्रू हे तीन प्रकारचे असतात. रिफ्लेक्स, कंटीन्यूअस आणि इमोशनल टीयर असे अश्रूंचे तीन प्रकार आहेत.

हे देखिल वाचा-

रडण्याचे फायदे
Eye Care : पालकांच्या या चुकांमुळे लहान वयातच मुलांना लागतोय चश्मा

जेव्हा डोळ्यामध्ये एखादा धुळीचा कण किंवा कचरा जातो तेव्हा निघणाऱ्या अश्रूंना रिफ्लेक्स टीअर्स म्हणतात. तर कंटिन्युअस अश्रूंमुळे डोळ्यांमध्ये ओलावा राहण्यास मदत होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो. या अश्रूंमध्ये ९८ टक्के प्रमाण हे पाण्याचं असतं.

तर इमोशनल टीयर्स म्हणजेच भावनात्मक अश्रूंमध्ये स्ट्रेस हार्मोन आणि टॉक्सिनचं प्रमाण अधिक असल्याने हे अश्रू येणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. यामुळे शरीरातील स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.

स्वत:ला शांत ठेवण्यासाठी होते मदत- स्वत:ला शांत करण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी रडणं हा खरंतर एक उत्तम पर्याय आहे. २०१४ मध्ये करण्यास आलेल्या एका अभ्यासानुसार रडल्याने आपल्या शरीरातील पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टीम (PNS) उत्तेजित होते आणि हे PNS शरीराला आराम देण्यास मदत करतात आणि त्याचसोबत पचनासही मदत करतात.

अनेकदा रडल्याचे फायदे लगचेच दिसून येत नाहीत. मात्र बराच वेळ रडल्यानंतर किंवा काही काळाने याचे फायदे जाणवू शकतात.

वेदना कमी होण्यास मदत- जास्त वेळ रडल्याने ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन सारखी रसायने रिलीज होतात. ही रसायनं म्हणजेच फिल गुड केमिकल्स असल्यामुळे शारीरीक आणि भावनिक वेदना कमी होण्यास मदत होते. ऑक्सिटोसिन केमिकलमुळे आपल्याला आराम वाटतो आणि यामुळे मन शांत होतं.

रडल्यानंतर मूड चांगला होतो- रडल्यानंतर जसे काही फायदे काही लगेच दिसून येत नाहीत, तर थोड्या वेळाने दिसतात. त्यापैकी एक म्हणजे रडल्यानंतर थोड्या वेळातच तुमचा मूड चांगला होतो. रडताना जेव्हा आपण हुंदके देतो तेव्हा श्वासासोबत थंड हवा शरीरामध्ये जाते. यामुळे मेंदूचं तापमान कमी होवून शरीराच तापमानही नियंत्रणात येऊ लागतं. जेव्हा तुमचं डोकं थंड होतं. तेव्हा तुमचा मुडही चांगला होतो.

दृष्टी चांगली राहते- अश्रूंमुळे डोळ्याचे पडदे कोरडे पडत नाहीत. अनेकदा डोळ्यांचे पडदे कोरडे पडल्याने दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. मात्र अश्रूंमुळे पडद्यांमध्ये ओलावा राहिल्याने दृष्टी चांगली राहण्यास मदत होते.

त्याचप्रमाणे रडल्यानंतर ताण कमी झाल्याने आणि डोक शांत झाल्याने चांगली झोप लागण्यासही मदत होते. मात्र जर तुम्हाला नैराश्यामुळे खूर जास्त वेळ आणि सतत रडू येत असेल, शिवाय काही वेळेला सतत रडू येत असेल आणि त्यामागचं कारणं तुमच्या लक्षात येत नसेल, केवळ सतत उदास वाटत असेल, तर मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेंचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.