Child Eye Care: तुमची मुलं देखील जवळून टीव्ही पाहतात? वेळीच घ्या काळजी नाहीतर या आजारांची शक्यता

Child Eye Care: डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जास्तवेळ टीव्ही, कंप्युटर किंना फोन पाहिल्याने मायोरपिया अथवा एस्टिगमॅटिज्म किंवा हे दोन्ही आजार होवू शकतात
how to protect child eyes from mobile screen
how to protect child eyes from mobile screenEsakal
Updated on

Child Eye Care: मोबाईलमध्ये कार्टून पाहणं, गेम खेळणं, तसचं तासंतास टीव्ही पाहणं हे सध्याच्या लहान मुलांचे छंद आहेत. त्यातही उन्हाळ्याची सुट्टी Summer Holiday सुरु झाली की हे प्रमाण अधिक वाढतं. सुट्टी असल्याने मुलं अनेक तास टीव्ही Television किंवा गॅजेट्समध्ये घालवतात.

अशावेळी मोबाईल अगदी डोळ्यांपुढे धरणं किंवा टीव्ही लहान मुलं टीव्ही देखील जवळून पाहतात. Marathi Health Tips Danger to children to watch tv from very near distance

जर तुमच्या मुलांना देखील या सवयी असतील तर पालकांनी वेळच या सवयी मोडणं गरजेचं आहे. कारण डॉक्टरांच्या Doctor म्हणण्यानुसार जवळून स्क्रीन Screen पाहिल्याने लहान मुलांना मायोपिया किंवा जवळची दृष्टी Vision कुमकुवत होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पालकांनी या गोष्टीचं गांभीर्य राखणं गरजेचं आहे.

काय म्हणतात डॉक्टर्स

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जास्तवेळ टीव्ही, कंप्युटर किंना फोन पाहिल्याने मायोरपिया अथवा एस्टिगमॅटिज्म किंवा हे दोन्ही आजार होवू शकतात. लहान मुलांचे डोळे खूपच नाजूक असतात. तसचं त्यांच्या डोळ्यांच्या कॉर्नियाचे कोलेजन खूपच मऊ असतं.

जेव्हा मुलं या गॅजेट्सचा वापर करतात तेव्हा ते खूप कमी वेळा पापण्यांची उघडझाप करतात. तसचं कमी रिफ्रॅक्टिव नंबर असूनही ते अनेक तास टीव्ही किंवा एखादी स्क्रीन पाहण्यासाठी डोळ्यांवर दबाव टाकतात.

डॉक्टरांच्या म्हणण्य़ानुसार जेव्हा या मुलांना आय स्पेशलिस्ट Eye Specialist म्हणजेच डोळ्यांच्या दवाखान्यात तपासण्यात येतं तेव्हा या मुलांमध्ये कमी अधिक प्रमाणात मायोपिया किंवा एस्टिगमॅटिज्म असल्याचं निदान होत.

काहीवेळा या दोन्ही समस्याचं निदान होतं. काहीवेळेला सुरुवातीलाच या समस्यांवर उपचार करणं शक्य आहे. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य नाही. जर लहान मुलं छोट्या स्क्रीनवर खूप जवळून काही पाहत असतो तेव्हा त्याला रिफ्रॅक्टिव एरर होण्याचा धोका अधिक असतो. तसचं ज्या मुलांना आधीपासून चष्मा आहे त्यांचा नंबर जलद गतीने वाढू शकतो.

हे देखिल वाचा-

how to protect child eyes from mobile screen
Vision Syndrome: योगा क्विन शिल्पाचा हा सोपा व्यायाम दूर करेल तुमचा कंप्युटर व्हिजन सिंड्रोम

डोळ्यांवर दबाव पडतो

अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशनच्या अभ्यासानुसार जास्त वेळ कंप्युटर, टॅबलेट किंवा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये पाहिल्याने डोळ्यांवर दबाव निर्माण होतो. यामुळे डोळे आणि दृष्टीसंबधी समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. यालाच कंप्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतात. 

मायोपियाची लक्षणे

अनेकदा मुलं जवळून टीव्ही किंवा मोबाईल पाहत असतील तरी पालक आक्षेप घेत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या मुलांना डोळ्यासंबधी किंवा दृष्टीसंबधी काही समस्या निर्माण झाल्या आहेत का या कडे दूर्लक्ष केलं जातं.

यासाठीच काही मायोपियाची काही लक्षणांबद्दल माहिती असणं गरजेच आहे. याच मुलं वारंवरा डोळे उघडझाप करतात, त्यांना दूरवरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत, तसचं पहाण्यास त्रास होणं, डोकेदुखी, डोळे लहान करून पाहणं, डोळ्यातून पाणी येणं, शाळेत फळ्यावर लिहिलेलं वाचण्यात अडचणी तसंच पुस्तकामधील अक्षरही अस्पष्ट दिसणं ही काही मायपियाची लक्षणं आहेत.

यापैकी काही लक्षण जर तुम्हाला मुलांमध्ये आढळली तर त्यांना लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेऊन डोळ्यांची तपासणी करणं गरजेच आहे. 

पालकांनी ही काळजी घेणं गरजेचं

जिथं मुलं अभ्यास करतात तिथे पुरेसा उजेट किंवा रोषणाई असावी. मुलांना कमीत कमी वेळासाठी मोबाईल हाताळण्यास द्यावा. जर डिजिटल स्क्रीनवर काही क्लास असेल तर मोबाईल एवजी लॅपट़पवरून कनेक्ट करावं, पुरेसा सुर्यप्रकाश डोळ्यांना मिळेल याची काळजी घ्यावी.

त्याचप्रमाणे मुलांच्या आहारात सुका मेवा आणि विटामिन ए युक्त डाएट असेल याची काळजी घ्यावी. तसचं लहान मुलांना घरात बसून कंप्युटर, मोबाईलमध्ये गेम खेळायला देण्याएवजी त्यांना घराबाहेरील मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे.

याचसोबत घरातही कॅरम, चेस वेगवेगळी कोडी आणि बॉस्क लर्निंग गेम आणून इतर खेळात रमवावं जेणे करून त्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.