Diabetes 2 रुग्णांना या कॅन्सरचा धोका जास्त, महिलांनी घ्यावी विशेष काळजी

नव्या संशोधनानुसार टाइप-२ डायबेटिसमुळे महिलांमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे महिलांनी टाइप-२ डायबेटिस असलेल्या महिलांनी अधिक काळजी घेणं जास्त गरजेचं आहे
डायबेटिस २ च्या रुग्णांनी घ्यावी काळजी
डायबेटिस २ च्या रुग्णांनी घ्यावी काळजीEsakal
Updated on

मधुमेह ही सध्याच्या काळात एक वाढती जाणारी समस्या निर्माण झाली आहे. खास करून टाइप-२ डायबेटिसच्या रुग्णांमध्ये अधिक वाढ होतेय. जगभरातमध्ये ५३ कोटी रुग्ण असून वैज्ञानिकांच्या मते ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे. Marathi Health Tips Diabetes 2 patients have danger of cancer

मधुमेहावर अद्यार कोणतेही उपचार उपलब्ध नसल्याने हा आजार बरा होणं शक्य नाही. शिवाय मधुमेहामुळे Diabetes आरोग्याच्या इतर गंभीर समस्या देखील निर्माण होतात. टाइप २ डायबेटिस हा अगदी कमी वयात किंवा लहान मुलांमध्ये Children देखील आढळून येत आहे. खास करून आता महिलांसाठी ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.

कारण नव्या संशोधनानुसार टाइप-२ डायबेटिसमुळे महिलांमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे महिलांनी टाइप-२ डायबेटिस असलेल्या महिलांनी अधिक काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.

महिलांना एंडोमेट्रियल कॅन्सरचा धोका

एंडोमेट्रियल हा गर्भाशयात होणाऱ्या कर्करोगाचा हा सामान्य प्रकार आहे. एका अंदाजानुसार २०२२ सालामध्ये अमेरिकेमध्ये ६६,००० महिलांना एंडोमेट्रियल कॅन्सरचं निदान झालं होतं. तर एका नवीन अभ्यासात टाइप-२ मधुमेह हा या कर्करोगासाठी एक मोठं कारण ठरू शकतो असं मांडण्यात आलंय.

एंडोमेट्रियम कॅन्सरचा धोका

युकेमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात टाइप-२ डायबेटिस असलेल्या महिलांमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण हे १.५ टक्के जास्त असल्याचं आढळून आलं. या संशोधनामध्ये ज्या महिलांना एंडोमेट्रियल कॅन्सर आहे अशामधील टाइप-२ डायबेटिस असलेल्या महिलांमध्ये कॅन्सरचं गंभीर रुप किंवा जोखीम जास्त आढळून आली.

तर चीनमधील काही संशोधकांच्या मते टाइप-२ डायबेटिसमध्ये ग्लुकोज अतिप्रमाणात वाढल्यामुळे एंडोमेट्रियल कॅन्सरचा धोका वाढू शकतो किंवा कॅन्सरमध्ये गंभीर स्वरूप पाहायला मिळू शकतं.

डायबेटिस २ च्या रुग्णांनी घ्यावी काळजी
Yoga To Control Diabetes: दिवसातून फक्त 10 मिनिटे करा ही योगासनं, ब्लड शुगर होईल कमी

मधुमेही महिलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढण्याचं कारण

अभ्यासामध्ये टाइप-२ डायबेटिस असलेल्या महिलांमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याची शक्यता ६२ टक्के जास्त असते. इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे या रुग्णांमध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ झपाट्याने झाल्याचं दिसून आलं आहे.

खास करून वृद्ध महिलामध्ये म्हणजेच ज्यांचं वय ६० वर्षांहून अधिक आहे अशांमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सरचा धोका अधिक असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी कोणत्याही वयोगटातील महिलांना या कॅन्सरचा धोका आहे. त्यामुळेच टाइप-२ मधुमेह असलेल्या महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

तज्ज्ञांच्या मते मधुमेह असलेल्या महिलांनी रजोनिवृत्तीनंतर एंडोमेट्रियल कर्करोगाची तपासणी करणं गरजेचं आहे. तसंच जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करणं गरजेचं आहे. टाइप-२ मधुमेह असलेल्या महिलांनी योग्य आहार आणि व्यायामावर भर देणं आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.