Kidney Detox करण्यासाठी नियमित करा या फळांचं सेवन

किडनी डिटॉक्स Kidney Detox करण्यासाठी अलिकडे बाजारात विविध प्रकारचे ज्यूस Juices मिळतात. मात्र या ज्यूसएवजी जर तुम्ही काही फळांचं सेवन Fruit Intake केलं तरीही किडनी नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यासाठी मदत होईल
kidney detox fruits
kidney detox fruitsEsakal
Updated on

kidney detox fruits: किडनी शरीरातील अत्यंत महत्वपूर्ण अवयव आहे. शरीरातील घाण लघवीवाटे बाहेर काढण्याचं kec किडनी Kidney करतं.

शरीरातील अतिरिक्त मिनिरल्स, केमिक्लस, सोडियम, कॅल्शियम Calcium, पाणी तसंच फॉस्फरस, पोटॅशियम शरीराबाहेर फ्लशआउट करण्याच काम किडनी करतं. यासाठीच किडनी निरोगी राहणं गरजेचं आहे. Marathi Health Tips Eat these fruits to detox your Kidney

किडनी डिटॉक्स Kidney Detox करण्यासाठी अलिकडे बाजारात विविध प्रकारचे ज्यूस Juices मिळतात. मात्र या ज्यूसएवजी जर तुम्ही काही फळांचं सेवन Fruit Intake केलं तरीही किडनी नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यासाठी मदत होईल. तेव्हा आज आपण अशाच काही फळांबद्दल जाणून घेणार आहोत.

किडनी डिटॉक्स करणारी फळं

लाल द्राक्षं- किडनी डिटॉक्स करण्यासाठी लाल द्राक्षांचं Grapes सेवन उपयुक्त ठरतं. लाल द्राक्षांमध्ये असलेल्या फ्लेवेनाईड्समुळे किडनी डिटॉक्स करण्याचं काम उत्तमरित्या होतं.

तसंच फ्लेवेनाइड्समुळए रक्त शुद्ध होण्यासही मदत होते. यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे देखील किडनीतील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

सफरचंद- सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात जे विषारी पदार्थ नष्ट करण्यास मदत करतात. तसचं यात आढळणाऱ्या अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे किडनी निरोगी राहण्यास मदत होते. किडनीच्या समस्या असलेल्या रुग्णांनी नियमितपणे सफरचंदाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

हे देखिल वाचा-

kidney detox fruits
Kidney Health : या आजारांपासून बचाव करण्यासाठी अशी घ्या किडनीची काळजी, जाणून घ्या टिप्स

कलिंगड- कलिगंडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त अससतं. यामुळेच कलिंगडाच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसंच यामुळे किडनीचं कार्य सुरळीत चालण्यास मदत होते आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. तसचं कलिंगडामध्ये असलेलं लायकोपीन नावाचं अँटीऑक्सिडंट किडनी निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं.

अननस- किडनी डिटॉक्स करण्यासाठी अननसाचं सेवन देखील उपयुक्त ठरतं. यातील ब्रोमेलेन नावाच्या एंझाइममध्ये अँटीइंफ्लेमेटरी गुण आढळतात. यामुळे किडनीतील सूज कमी होण्यास मदत होते. तसंच अनननस हे विटामिन सी Vitamin C आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असून यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

बेरीज्- बेरीज् म्हणजेच स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरीस ब्लूबेरी अशा सर्वच प्रकारच्या बेरीजचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स उपलब्ध असतात. यामुळे किडनीचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इंफ्लामेशनपासून संरक्षण होतं.

तसंच बेरीजच्या सेवनामुळे शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर पडण्यास मदत होते. बेरिजच्या सेवनामुळे UTI म्हणजेच युरीन इंफेक्शनचा धोका कमी होतो. बेरीजचा ज्यूसचं सेवन केल्याने किडनीच्या अनेक समस्या दूर होऊन किडनी निरोगी राहण्यास मदत होते.

डाळिंब- किडनी निरोगी राहण्यासाठी डाळिंबाचं सेवन फायदेशीर ठरतं. डाळिंबात असलेल्या पोटॅशियममुळे लघवीतील आम्लता कमी होण्यास मदत होते तसचं डाळिंबाच्या सेवनामुळे किडनीस्टोनचा धोकाही कमी होतो.

डाळिंबाच्या सेवनामुळे किडनी डिटॉक्स होण्यास मदत होते. तसचं किडनीचं कार्य सुधारतं. किडनीच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही नियमित डाळिंबाच्या ज्यूसचं सेवन करू शकता.

पपई- पपईमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर आढळतं. यामुळे युरीन फ्लो वाढण्यास आणि डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.

अशा प्रकारे आहारामध्ये या फळांचं नियमित सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.