Knee Pain: गुडघ्यांमुळे चालणं-फिरणं झालंय मुश्किल? मग या घरगुती उपायांनी गुडघेदुखी होईल कमी

Gudghe Dukhi Upay: गुडघेदुखी किंवा गुडघ्यांमध्ये वेदना सुरु झाल्यास अनेकजण पेनकिलर घेतात किंवा विविध मलमं आणि स्प्रे लावले जातात. यामुळे काही काळासाठी आराम मिळत असला तरी त्रास पूर्णपणे बरा होत नाही. या समस्येवर तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
knee pain home remedy
knee pain home remedyEakal
Updated on

Knee Pain: खरं तर गुडघे दुखणं किंवा चालताना गुडघ्यांमध्ये वेदना निर्माण होणं किंवा गुडघे अवघडणं हे एकेकाळी वाढत्या वयाचं लक्षण मानलं जातं. साधारण पन्नाशी नंतर साधारण गुडघे दुखीचा Knee Pain त्रास सुरु होतो. Marathi Health Tips Get relief from knee pain by kitchen substances

मात्र अलिकडे कमी वयात किंवा तरुणांमध्ये देखील गुडघेदुखीच्या किंवा गुडघे अवघडण्याच्या Knee Problems समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. कमी वयातच गुडघ्यांच्या समस्या निर्माण होण्यासाठी खरतरं अनेक कारणं जबाबदार आहेत.

चुकीचा किंवा अयोग्य आहार Diet, व्यायामाचा अभाव, सुस्त जीवनशैली आणि लठ्ठपणा याशिवाय इतर अनेक कारणांमुळे कमी वयात गुडघे दुखीचा त्रास होवू शकतो. गुडघे दुखीचा परिणाम आपल्या रोजच्या दिनचर्येवर होतो. कारण यामुळे चालणं-फिरणं देखील मुश्किल होतं.

गुडघेदुखी किंवा गुडघ्यांमध्ये वेदना सुरु झाल्यास अनेकजण पेनकिलर घेतात किंवा विविध मलमं आणि स्प्रे लावले जातात. यामुळे काही काळासाठी आराम मिळत असला तरी त्रास पूर्णपणे बरा होत नाही. या समस्येवर तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. ज्यामुळे वेदना कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

हळदीचं दूध

दूध आणि हळदीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. गुडघेदुखीवरही बाह्य उपचारांपेक्षा जर तुम्ही हळदीच्या दूधाचं सेवन केलं तर योग्य पोषक तत्वं मिळून त्रास कमी होण्यास मदत होते. गुघडे आणि सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी हळदीच्या दुधाचं सेवन उपयुक्त ठरतं.

यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये हळद टाकून या दुधाचं सेवन करावं. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. तुम्ही दुधामध्ये कच्च्या हळदीचा रस देखील टाकू शकता.

हे देखिल वाचा-

knee pain home remedy
Protect Your Knees : वाढत्या वयात गुडघ्याची काळजी

मेथी दाणे

स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या मेथीच्या दाण्यांमुळे गुडघेदुखी किंवा गुडघे अवघडण्याची समस्या दूर होवू शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मेथीचे दाणे चावून खा आणि शिल्लक राहिलेलं पाणी प्या. नियमितपणे हा उपाय केल्यास काही दिवसांमध्ये गुडघ्यांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.

तुळशीचा रस

गुडघे किंना सांधेदुखीसोबतच शरीरातील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या रसाचं सेवन करू शकता. यासाठी तुळशीच्या काही पानांचा रस काढून कोमट पाण्यासोबत सेवन करावं. तसंच तुम्ही नियमित तुळशीच्या चहाचं देखील सेवन करु शकता. नियमितपणे तुळशीच्या रसाच्या सेवनाने गुडघेदुखी कमी होते.

लसूण

स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लसणामुळे तुमची गुडघेदुखी दूर होवू शकते. लसणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन ए आणि आयर्न उपलब्ध असतं. यासाठीच आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. तसंच तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी ३-४ लसणाच्या पाकळ्यांच सेवन करू शकता. यामुळे सांधेदुखी आणि गुडघेदुखीच्या समस्या दूर होतील.

सुकामेवा

सुकामेवा हा शरीरासाठी फायदेशीर आहे. ड्राय फ्रूट्स हे गरम प्रभावाचे असल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. तसंच यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असल्याने हाडांच्या समस्या दूर होण्यास आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते.

याचसोबतत थंडीमुळे होणारी गुडघेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही आल्याचं सेवन करू शकता. आल्याचा चहा किंवा आलेपाक यांच्या सेवनामुळे गुडघ्यांमधील वेदना कमी होण्यास मदत होते. तसंच गुळाच्या सेवनाने देखील गुडघेदुखीचा त्रास कमी होतो.

अशा प्रकारे तुमच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या सेवनामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होवू शकतो.

हे देखिल वाचा-

knee pain home remedy
Knee Surgery : गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर या गोष्टी टाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.