तेल हा स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा एक अविभाज्य घटक आहे. दुपारचं जेवण असो वा रात्रीचं आपण एक तरी पदार्थ शिजवण्यासाठी तेलाचा वापर करतो. भारतात प्रत्येक प्रांतानुसार स्वंयंपाक घरांमध्ये वेगवेगळ्या तेलांचा Cooking Oils वापर आढळतो. Marathi Health Tips Healthy Oil for your Heart
तसचं अलिकडच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीने स्वयंपाकासाठी केवळ एकच तेल न वापरता वेगवेगळ्या तेलांचा Oils वापर केला जातो. Try Diffrent Oils for cooking know the benefits
सकस आहारामध्ये Healthy Diet योग्य तेलाचा योग्य प्रकारे समावेश करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या तेलाचा आहारात समावेश करता. यावर तुमच्या हृदयाचं आरोग्य Heart Health अर्थाच तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला आरोग्यासाठी फायदेशीर असेले तेलाचे काही उत्तम पर्याय सांगणार आहोत.
१. सुर्यफूल तेल- भारतातील अनेक घरांमध्ये सुर्यफूलाचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. सामान्यांच्या खिशाला परवडेल असा हा एक तेलाचा पर्याय आहे. सुर्यफूलाचे हृदयासाठी अनेक फायदे आहेत.
सुर्यपूल तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. तसचं य़ात असलेलं PUFA आणि MUFAs जे हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तसचं या तेलातील विटामिन ई देखील निरोगी हृदयासाठी फायदेशीर आहे.
२. शेंगदाणा तेल- अनेक तेल हे गरम झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने रिऍक्ट करतं. एखादा पदार्थ तळण्यासाठी शेंगदाणा तेल Groundnut Oil हा उत्तम पर्याय मानला जातो.
यात ओमेगा-६ फॅटी ऍसिडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं. जास्त तापमानातही या तेलात बदल घडत नाही. हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी शेंगदाणा तेल चांगला पर्याय आहे.
मधुमेही रुग्णांसाठी आहारात शेंगदाणा तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. शेंगदाणा तेलामुळे इन्श्युलिनचे प्रमाण नियंत्रणात राहून रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. भारतात आणि महाराष्ट्रातही शेंगदाणा तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
हे देखिल वाचा-
३. अळशीचं तेल- निरोगी हृदयासाठी अळशीचं तेल फायदेशीर आहे. अळशीच्या तेलाचा उपयोग स्वयंपाकाबरोबरच सलाड ड्रेसिंगसाठी देखील करणं शक्य आहे. अळशी किंवा जवसाच्या तेलामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी अनेक खनिजं आढळतात.
अळशीच्या तेलामुळे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणास राखण्यास मदत होते. तसचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. जवसाच्या तेलामुळे आतड्याचं आरोग्य सुधारतं तसचं बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतात.
४, राइस ब्रान ऑइल- कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यासाठी राइस ब्रान ऑइल हा एक चांगला पर्याय आहे. या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडच योग्य संतुलन असतं.
यामुळे हृदयाचं आरोग्य चांगल राहण्यास मदत होते. राइस ब्रान ऑइलमुळे रक्तातील सारखरेची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत होते.
५. तिळाचं तेल- तिळाचं तेल देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. तिळाच्या तेलामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, विटामिन बी आणि प्रशिनं आढळतात. तिळाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. तसचं तिळाच्या तेलामध्ये
६. ऑलिव्ह ऑइल- ऑलिव्ह ऑइल संपूर्ण शरीरासोबतच हृदयासाठी देखील गुणकारी आहे. ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलिफेनॉल नावाचं संयुग आढळतं जे हृदय विकारांचा धोका कमी करण्यास मदत करतं. तसचं यातील हेल्दी फॅट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यास मदत करत.
ऑलिव्ह ऑइल महाग असल्याने भारतामध्ये सामान्य कुटुंबांमध्ये अन्न शिजवण्यासाठी या तेलाचा वापर फारसा होताना दिसत नाही. साधारण सलाड ड्रेसिंग किंवा काही खास पदार्थांमध्ये ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जातो.
याचसोबत कॅनोला ऑइल आणि अवाकाडो ऑइल हे देखील निरोगी हृदयासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.