Mouth Ulcers Home Remedy: तोंडात फोड येणं म्हणजेच तोंड येण्याची समस्या ही तशी सामान्य आहे. मात्र या सामान्य समस्येमुळे देखील काही दिवस त्रास सहन करावा लागतो.
साधारण गालांच्या Cheeks आतल्या त्वचेवर Skin, हिरड्यांवर तसचं ओठांना आतून तोंड येतं. यामुळे काही दिवस वेदना होतात. Marathi Health Tips How to Cure Mouth Ulcers
तसंच खाण्या पिण्यास त्रास होतो. खास करून गरम Hot किंवा तिखट पदार्ख किंवा पेय पिण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. साधारण उन्हाळ्यामध्ये Summer तोंड येण्याची समस्या जास्त प्रमाणात उद्भवते.
उष्णतेसोबतच तोंड येण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. यात अनेकदा पोट साफ न होणं किंवा पोटातील उष्णता, ताण आणि हार्मोनल बदलांमुळेदेखील तोंड येण्याची शक्यता वाढते. त्याचसोबत शरीरामध्ये झिंक, फॉलेट किंवा आयरनची कमतरता निर्माण झाल्यासही तोंड येण्याचा त्रास होतो.
अनेकदा अगदी एक दोन दिवसात हा त्रास कमी होतो. मात्र काही वेळी वारंवार तोंड येणं किंवा ते फार काळ राहणं असा त्रास होत असल्यास काही घरगुती उपाय आरामदायक ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
मीठाच्या पाण्याच्या गुळण्या- मीठ Salt हे डिसइन्फेक्टंट म्हणून प्रभावी आहे. यासाठी कोमट पाण्यामध्ये चमचाभर मीठ मिसळून दिवसातून दोनदा गुळण्या कराव्या. मीठातील अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे मायक्रो-ऑर्गेनिज्मचा बंदोबस्त होवून तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
हे देखिल वाचा-
काळ्या चहाचा शेक- तोंडातील फोड किंवा तोडं येणं कमी करण्यासाठी तुम्ही टी बॅगचा वापर करू शकता. यासाठी गरम पाण्यामध्ये एक टी बॅग बुडवून ठेवा.
त्यानंतर ही टी बॅग थोडी थंड झाल्यावर तोंड आलेल्या ठिकाणी शेक द्या यामुळे आराम मिळेल. चहामधील टॅनिन्स जखम भरण्यासाठी फायदेशीर असल्याने जखम लवकर बरी होईल.
नारळाचं तेल Coconut Oil- ओरल हेल्द म्हणजेच तोंडाच्या आरोग्यासाठी नारळाचं तेल ही उपयुक्त ठरतं. नारळाच्या तेलातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.
यासाठी दिवसातून २-३ वेळा एका कापसाच्या बोळ्यावर नारळाचं तेल घेऊन ते तोंड आलेल्या ठिकाणी लावावं. तसचं रात्री झोपण्यापूर्वी हा प्रयोग नक्की कराव्या. यामुळे फोड तसचं जखमा लवकर बऱ्या होतील.
मध- कोणतीही जखम लवकर बरी करण्यासाठी मध Honey फायदेखील ठरतं. मधामधील अँटी-मायक्रोबियल गुणामुळे जखम लवकर भरते. यासाठीच तोडं आलेल्या ठिकाणी थेट एक दोन थेंब मध घेऊन लावावं. दर २-३ तासांनी तोंड आलेल्या ठिकाणी मध लावा.
लवंग- तोंड आल्यावर तोंडामध्ये वेदनाही होतात. यासाठीच लवंग Clove उपयुक्त ठरू शकते. लवंगमध्ये असलेल्या अंटी-बॅक्टेरियल आणि एनाल्जेसिक गुणांमुळे तोंडातील जखामांचं किटाणूंच्या संसर्गापासून बचाव होतो. लवमग चघळल्याने वेदना कमी होऊन तोडं येणं लवकर कमी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.