Healthy Heart नियमितपणे 'हे' केल्याने कोलेस्ट्रॉल होईल दूर

Healthy Heart साठी तेलकट तिखट पदार्थाचं सेवन टाळणं गरजेचं आहे. तसचं ताण कमी घेणं आणि व्यायाम करणं या सवयींमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते
Healthy Heart साठी हे करा
Healthy Heart साठी हे कराEsakal
Updated on

Healthy Heart सध्याच्या काळामध्ये बिघडलेली जीवनशैली आणि राहणीमान यामुळे कोलेस्ट्राॅलची समस्या वाढत जाताना दिसत आहे. केवळ जास्त वय असलेल्या व्यक्तींमध्येच नव्हे तर तरुणांमध्ये देखील कोलेस्ट्रॉलची समस्या वाढते आहे.

कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे हृदयाचं आरोग्य धोक्यात येऊ लागल्याने कार्डिअॅक अरेस्ट आणि स्ट्रोकच्या समस्यादेखाल वाढत आहेत. Marathi Health Tips How to keep your heart healthy and free from bad cholesterol

Healthy Heart साठी तेलकट तिखट पदार्थाचं सेवन टाळणं गरजेचं आहे. तसचं ताण कमी घेणं आणि व्यायाम करणं या सवयींमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. जर तुम्हाला व्यायाम Exercise करणं शक्य नसेल तर नियमितपणे एक काम केल्यास तुमची कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होण्यास मदत होते.

नियमितपणे वॉक करणं म्हणजेच चालण्याने हृदयाचं आरोग्य Heart Helth निरोगी राहण्यास मदत होते. दररोज ३० मिनिटं चालण्याने हृदय निरोगी राहतं. जरी तुम्हाला वर्कआऊट किंवा व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तरी दररोज ३० मिनिटं चालण्याने कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होण्यासोबतच आरोग्याच्या इतर समस्या दूर होवून फिट राहण्यास मदत होते.

चालण्यामुळे कोलेस्ट्रॉल होईल कमी

Walking.heartfoundation.org च्या रिपोर्टनुसार चालण्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. चालण्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढल्याने नसांमधील रक्तप्रवाह वाढतो. यामुळे नसांमध्ये साचलेलं बॅड कोलेस्ट्रॉल वितळण्यास मदत होते. चालण्यामुळे धमन्यांचं आरोग्य चांगल होवून स्ट्रेस कमी होतो.

National library of Medicine या मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार दररोज ३० मिनिटं वॉक केल्याने धमन्यांमध्ये साचलेलं फॅट लिपिड आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. चालण्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. तसंच यामुळे मेंदू आणि इतर अवयव निरोगी राहण्यास मदत होते.

Healthy Heart साठी हे करा
Healthy Heart Tips :  या लाल फळाशी कराल गट्टी, तर होईल Heart Attack ची सुट्टी!

पोहणे

चालण्यासोबत स्विमिंगमुळे देखील कोलेस्ट्रॉल कमी होवून हृदय निरोगी राहण्यास मदत होते. स्विमिंग ही एक अॅरोबिक एक्सरसाइज आहे. एका अभ्यासानुसार पोहल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच वजन कमी होण्यासही मदत होते.

सायकलिंग

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम आहे. नियमितपणे सायकल चालवण्याने कॅलरी बर्न होण्यासही मदत होते.

अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येत अर्धा तास चालणं किंवा जॉगिंग तसचं स्विमिंग किंवा सायकलिंग या अॅक्टिव्हिटीजचा समावेश केलात तर कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()