Good Fats: सर्वच फॅट्स शरीरासाठी धोकादायक नाहीत... या फॅट्समुळे शरीराला होवू शकतात फायदे

Good Fats Benefits: आहारातील फॅट्ने शरीराचं वजन वाढतं Weight Gain हा समज काही प्रमाणात योग्य असला तरी काही फॅट्स Fats हे शरीरासाठी फायद्याचे असतात. शिवाय हे फॅट्स शरीराला मिळणं गरजेचं देखील आहे
good fats
good fatsEsakal
Updated on

Good fats: वाढत्या वजनामुळे त्रस्त असलेले त्याचसोबत फिटनेससाठी Fitness कायम प्रयत्नशील असलेले अनेक लोक आहारामध्ये तेलकट तुपकट पदार्थ खास असताना विशेष काळजी घेतात. Marathi Health Tips Know about Fats useful for Human Body

आहारातील फॅट्ने शरीराचं वजन वाढतं Weight Gain हा समज काही प्रमाणात योग्य असला तरी काही फॅट्स Fats हे शरीरासाठी फायद्याचे असतात. शिवाय हे फॅट्स शरीराला मिळणं गरजेचं देखील आहे.

डाएट Diet करत असताना अनेकजण स्वयंपाकासाठी Cooking कमी तेलाचा वापर करतात. बटर, तूप हे पदार्थ ताटातून काढून टाकले जातात. तसचं केवळ उकडलेलल्या भाज्या किंवा सूपवर भर दिला जातो.

यामुळे शरीराला पोषक तत्व मिळत असली तरी शरीरासाठी गरजेचे असलेले चांगले फॅट्स मिळत नाहीत. हेल्दी फॅट्स Healthy Fats हे शरीरासाठी गरजेचे असतात. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. तसंच मेंदू आणि हृदय निरोगी राहण्यासाठी हेल्दी फॅट्स गरजेचे असतात.

आता शरीरासाठी कोणते फॅट्स चांगले ते कशातून मिळतील असा प्रश्न अनेकांना पडेल. यासाठी हार्वड युनिवर्सिटीने शरीरासाठी उपयुक्त असलेल्या ३ फॅट्सबद्दल माहिती दिली आहे.

हे देखिल वाचा-

good fats
Chole For Weight loss- वजन कमी करायचंय? मग Diet मध्ये आजच सामील करा प्रोटीनयुक्त छोले, या रेसिपी करा ट्राय

मोनोअनसॅच्युरेटेड

अनसॅच्युरेटेड फॅट्स हे शरीरासाठी चांगले असतात. यातील पहिला प्रकार म्हणजेच मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स. हे फॅट्स तुम्हाला शेंगदाणे, ऑलिव्ह किंवा ऑलिव्ह ऑईल, अवाकाडो, बदाम आणि दुधीच्या बियांमधून मिळतात. या फॅट्सचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत.

यात मोनोसॅच्युरेटेड फॅट्समुळे वजन कमी करण्यात मदत होवू शकते तसचं ते हृदयरोगाचा धोका कमी करतात आणि छातीतील जळजळ कमी करण्यास मदत करतात. विविध अभ्यासातून असं दिसून आलं आहे की मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्समुळे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणाक राखण्यास त्याचप्रमाणे मधुमेही रुग्णासाठी देखील हे फॅट्स फायदेशी ठरतात.

पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स

शरीर निरोगी राहण्यासाठी पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स महत्वाची भूमिका बजावतात. हे फॅट्स हे सुर्यफुलाच्या बिया, सोयाबीन, अखरोट, अळशीच्या बिआ यांमध्ये आढळतं.

पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्सचा एक प्रकार म्हणजेच ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि आणखी एक प्रकार म्हणजे ओमेगा ६ फॅटी ऍसिड. हे फॅट्स शरीर स्वत: तयार करू शकत नाही त्यामुळे आहारामध्ये ओमेगा- ३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. यासाठी मासे, अक्रोड, सुर्यफुलाच्या बिया आणि ड्रायफ्रूटचं सेवन करणं गरजेचं आहे.

अभ्यासानुसार रोजच्या आहारात 8 ते 10 टक्के कॅलरी पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्समधून मिळणं गरजेचं आहे. यामुळे हृदयाच्या आजाराचे धोके कमी होतात.

या फॅट्सचं सेवन टाळा

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स हे आरोग्यासाठी धोकादायक असतात. या फॅट्समुळे कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होवू शकते. तसचं हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं. सोबत वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. यासाठीच कुकीज, पिझ्झा, बर्गर, चीज असलेल्या पदार्थांचं सेवन टाळावं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.