अलिकडच्या काळ्यात चुकीच्या आहारामुळे तसंच बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातच अनेक गंभीर आजारांचा तरुणांना सामना करावा लागतोय. मधुमेह, कोलेस्ट्रॉल तसंच हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबासारख्या High Blood Pressure समस्यांमुळे आरोग्याच्या इतर गंभीर समस्या निर्माण होत आहेत. Marathi Health Tips Know the reasons behind high blood pressure
सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या वाढताना दिसत आहे. ज्या व्यक्तीचं ब्लडप्रेशर 140/90 mmHg किंवा याहून जास्त असल्यास त्याला हाय ब्लड ब्रेशर Blood Pressure किंवा हायपरटेंशन म्हंटलं जातं.
भारतामध्ये दर तीन पैकी एक व्यक्ती उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त आहे. रक्तदाब जास्त असल्यास त्याचा किडनीवर Kidney परिणाम होतो तसंच स्ट्रोक आणि हार्ट अटॅकसारख्या जीवघेण्या समस्यांचा धोका वाढतो.
उच्च रक्तदाब High Blood Pressure ही समस्या साधारण असल्याचा अनेकांचा समज असतो. मात्र जर ही समस्या कायम राहिली तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतात. यासाठीच रक्तदाब नियंत्रणात राखणं गरजेचं आहे.
अनेकदा तुमच्या दिनचर्येतील साधारण चुका किंवा काही सामान्य कारणांमुळे देखील रक्तदाब वाढू शकतो. यासाठीच काही गोष्टींपासून दूर राहिल्यास किंवा काळजी घेतल्यास हाड ब्लड प्रेशरची समस्या दूर होवू शकते.
दीर्घकाळासाठी लघवी रोखणं
अनेकजण प्रवासामध्ये तर काहीजण सतत उठण्याचा कंटाळा येत असताना दीर्घकाळासाठी लघवी रोखून धरतात. मात्र याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतो. दीर्घकाळासाठी लघवी रोखून धरल्यास ब्लॅडरवर दबाव निर्माण होवून स्नाय़ू खेचले जातात. यामुळे स्नायू कुमकुवत होतात. परिणामी दीर्घकाळामध्ये उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होवू शकते.
हे देखिल वाचा-
सर्दी खोकल्याच्या औषधांचं सेवन
सर्दी खोकल्याच्या औषधांचं म्हणजेच डिकंजेस्टंट्सच वारंवार सेवन केल्याने रक्तवाहिन्यांवर परिणाम होवू शकतो. यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होवू शकते. यामुळेच जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होत असेल तर काही आयुर्वेदिक तसंच घरगुती उपाय करण्यावर भर द्या.
सतत पेनकिलर घेणं
सर्दी खोकल्याच्या औषधांप्रमाणेत सतत पेनकिलर घेतल्याने देखील रक्तदाब वाढण्याची शक्यता बळावते. अनेकांना थोडीफार डोकेदुखी, पोटदुखीं किंवा शरीरात इतर वेदना झाल्यास सतत पेनकिलर घेण्याची सवय असते. मात्र ही सवय महागात पडू शकते. पेनकिलरच्या अतिसेवनामुळे रक्तदाब वाढण्यासोबतच, किडनीवर परिणाम होत असतो.
एकाकीपणा
अलिकडे सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेकजण प्रत्यक्षात मित्र-मैत्रिणींमध्ये किंवा नातलगांमध्ये वावरण किंवा भेटीगाठी घेणं टाळतात. यामुळे एकाकीपणा वाढत चालला आहे. एकाकीपणामुळे नैराश्य येण्याची किंवा चिंता वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं.
डिहायड्रेशन
डिहायड्रेशन म्हणजेच शरिरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास रक्तवाहिन्यांवर परिणाम होवून रक्तदाब वाढू शकतो.
यासाठीच दैनंदिन आयुष्यात या गोष्टींची काळजी घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून दूर राहता येईल.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.