आजारातून लवकर बरं व्हायचंय मग ऐका तुमचं फेव्हरेट म्युझिक, औषधांपेक्षा जास्त प्रभावी Music Therapy

Music Therapy for healthy lifestyle: दररोज २० मिनिटं तुमचं आवडचं संगीत ऐकल्याने अनेक छोट्या मोठ्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होण्यास मदत होते
Music Therapy for healthy lifestyle
Music Therapy for healthy lifestyleEsakal
Updated on

कोणत्याही आजारातून Illness बरं होण्यासाठी अर्थात डॉक्टरांच्या सल्लाने औषधोपचार करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर योग्य आहार आणि पथ्य या आजारातून बरं होण्यासाठी मदत करतात आणि त्याशिवाय रुग्णाची इच्छाशक्ती Will Power हा देखील एक महत्वाचा भाग असतो. Marathi Health Tips Music Therapy can recover major illness

पण तुम्हाला माहित आहे का? आजारातून लवकर बरं होण्यासाठी तसचं औषधांचा शरीरावर चांगला प्रभाव पडावा यासाठी संगीत म्हणजेच म्युझिक Music मदत करू शकतं.

अनेक संशोधनांमधून Research आता म्युझिक अनेक गंभीर आजारातून Serios Illness बरं होण्यासाठी तसंच अनेक जटील आजारांवरील औषधोपचाराचा शरीरावर लवकर आणि सकारात्मक प्रभाव पडावा यासाठी उपयोगी पडतं.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार कॅन्सरच्या Cancer उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या कीमोथेरपीत जर रुग्ण त्याचं आवडतं म्युझिक ऐकत असेल तर त्यामुळे त्या औषधांचा अधिक चांगला परिणाम रुग्णावर दिसून येतो. तसंच या थेरपीमुळे होणारा मळमळण्याचा त्रास म्युझिकमुळे कमी झाल्याचं या अभ्यासात समोर आलंय.

तर यापूर्वी देखील झालेल्या अनेक संशोधनात संगीतामुळे म्हणजेच म्युझिकमुळे ताण तणाव कमी करणं, नैराश्य आणि वेदना कमी करण्यासाठी मदत होते हे सिद्ध झालं आहे.

कीमोथेरपीच्या रुग्णासाठी म्युझिकचा फायदा

कॉलेज ऑफ नर्सिंगमधील असिस्टंट प्रोफेसर असलेल्या जेसन किरवाव यांच्या मते संगीत हे ओव्गहर द काउंटर मेडिसिनप्रमाणे म्हणजेच डॉक्टरांच्या Doctor प्रिस्किप्शन शिवाय मिळणाऱ्या औषधांप्रमाणानेच आहे.

म्हणजेच यासाठी तुम्हाला कोणतच्याही डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. तुमच्या आवडीनुसार हवं तेव्हा तुम्ही म्युझिक ऐकू शकता.

हे देखिल वाचा-

Music Therapy for healthy lifestyle
Water Therapy: वॉटर थेरपीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

प्रोफेसर किरनान म्हणतात की वेदना आणि चिंता या दोनही मेंटल हेल्द म्हणजेच मानसिक आरोग्याशी संबंधीत न्यूरोलॉजिकल स्थिती आहेत. कीमोथेपरीमुळेही होणाऱ्या वेदना किंवा मळमळ ही पोटाशी निगडीत समस्या नसून एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे.

क्लिनिकल नर्सिंग रिसर्च जर्नलमध्ये छापण्यास आलेल्या एका शोधाभ्यासानुसार कीमोथेरपी घेणाऱ्या १२ रुग्णांनी मळमळ थांबण्यासाठी औषधं घेण्याएवजी संगीताचा आधार घेतला. जेव्हा त्यांना मळमळ जाणवत तेव्हा ते ३० मिनिटांसाठी त्यांचं आवडतं म्युझिक ऐकतं.

संगीतामुळे तणाव कमी होतो

जेसन किरनान यांनी सांगितलं की या आभ्यासा दरम्यान असं आढळून आलं की संगीत ऐकल्यानंतर आपल्या मेंदूतील सर्व प्रकारचे न्युरॉन सक्रिय होतात. कीमोथेरपीतील मळमळ वाढण्यासाठी सेरोटोनिन हे मुख्य न्यूरोट्रांसमीटर जबाबदार आहे.

कॅन्सरचे रुग्ण सेरोटोनिनचा प्रभाव कमी कऱण्यासाठीच औषधं घेतात. मात्र संगीत ऐकल्याने मेंदूतून सेरोटोनिनचा स्त्राव कमी होत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे या रुग्णामध्ये मळमळ कमी होत असल्याचं लक्षात आलं.

कॅन्सरच्या रुग्णांना कीमोथेरपीमध्ये होणारा त्रास कमी होण्यासाठी म्युझिकची मदत होत असल्याचं समोर आलं आहे. त्याचप्रमाणे संगीत ऐकल्याने इतरही अनेक समस्या कमी होतात.

ज्यांना लवकर झोप लागत नाही किंवा झोपेशी निगडीत समस्या आहेत. अशांना संगीत मदत करू शकत. म्युझिकमुळे शरीरातील ट्राइटोफन केमिकल तणाव दूर करण्यास मदत करत. यामुळे शांत झोप लागते.

त्याच प्रमाणे संधीवातामुळे होणाऱ्या वेदना कमी कऱण्यासाठी देखीस म्युझिक थेरपी उपयोगी पडते.

दररोज २० मिनिटं तुमचं आवडचं संगीत ऐकल्याने अनेक छोट्या मोठ्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.