Pregnancy मध्ये या फळाचं सेवन केल्यास बाळाचा मेंदू होईल तल्लख, जाणून घ्या फायदे

Pregnancy Diet Tips: तुम्हाला माहित आहे का एका फळाच्या Fruit सेवनामुळे गरोदरपणात तुम्हाला आवश्यकती अनेक पोषक तत्व मिळातात. शिवाय गर्भातील बाळाचा मेंदू तल्लख होण्यासही मदत होते. हे फळ म्हणजे संत्र
Pregnancy Diet Tips
Pregnancy Diet TipsEsakal
Updated on

Pregnancy Diet Tips: गरोदरपणामध्ये महिलांनी पोषक आहार घेणं अत्यंत गरजेचं असतं. गरोदर महिलेच्या आरोग्यासोबतच बाळालादेखील पुरेसं पोषण Diet मिळण्यासाठी अगदी गरोदरपणातील Pregnancy सुरुवातीच्या काळापासूनच हेल्दी डाएट असणं गरजेचं आहे. Marathi Health Tips Orange can be beneficial in Pregnancy for women and Child health

अनेक महिला खास करून आपलं बाळ सुंदर आणि बुद्धिमान Clever व्हावं यासाठी आहारामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतात. गरोदरपणाच्या Pregnancy सुरुवातीच्या काळापासून अनेकजण आहारामध्ये दूध Milk आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश वाढवतात.

मात्र तुम्हाला माहित आहे का एका फळाच्या Fruit सेवनामुळे गरोदरपणात तुम्हाला आवश्यकती अनेक पोषक तत्व मिळातात. शिवाय गर्भातील बाळाचा मेंदू तल्लख होण्यासही मदत होते. हे फळ म्हणजे संत्र. गरोदरपणामध्ये संत्र Orange खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र खासकरून बाळ बुद्धीमान असावं त्याचा मेंदू तीक्ष्ण असावा यासाठी आहारामध्ये संत्र्याचा समावेश नक्की करा.

गरोदरपणामध्ये संत्र खाण्याचे फायदे

बाळाचा मेंदू तल्लख होईल- संत्र्यामध्ये फॉलिक ऍसिड आणि विटामिन बी 6 मोठ्या प्रमाणात आढळतं. गरोदरपणामध्ये संत्र्याचं सेवन केल्यास बाळाच्या मेंदूचा विकास चांगल्याप्रकारे होण्यास मदत होते. तसचं न्यूरल ट्यूबमधील दोष निर्माण होण्याचा धोका टळतो.

फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे बाळामध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये विकृती निर्माण होण्याचा धोका वाढतो. मात्र संत्र्यांमधील फोलेट रक्तपेशींची निर्मिती, नवीन ऊतकांची वाढ आणि निरोगी प्लेसेंटाच्या विकासासाठी उपयुक्त ठरंत.

हे देखिल वाचा-

Pregnancy Diet Tips
Saliva Based Pregnancy Test: यूके मध्ये सुरू झालेली लाळेवर आधारित गर्भधारणा चाचणी नेमकी काय?

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत- संत्र्यामधील विटामिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. गरोदरपणात संत्र्याचं सेवन केल्याने आई आणि बाळ दोघांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसंच संत्र्यामधील आयर्न आणि झिंकमुळे देखील इम्युनिटी वाढण्यास मदत होते.

तसचं संत्र्याच्या सेवनामुळे अर्भाकामध्ये ऊती, रक्तवाहिन्या आणि हाडांचा विकास होण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत- गरोदरपणामध्ये विविध कारणांमुळे रक्तदाब कमी किंवा वाढण्याची शक्यता असते. अशावेळी संत्र्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. संत्र्यामध्ये उपलब्ध असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हायड्रेट राहण्यास मदत- प्रेग्नन्सीमध्ये हायड्रेट राहणं गरजेचं असतं. संत्र्यातील सोडियम आणि पोटॅशियममुळे शरीरात पाण्याची पातळी संतुलित राहण्यासाठी मदत होते. तसचं यामुळे हायड्रेशन होण्यास मदत होते यामुळे गरोदरपणात संत्र्याचं सेवन करावं.

कॉन्स्टिपिशनची समस्या होईल कमी- गरोदरपणातील बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी संत्र्याचं सेवन फायदेशीर ठरतं. संत्र्यातील फायबरमुळे पोटाच्या समस्या दूर होवून सूज कमी होण्यासही मदत होते.

गरोदरपणामध्ये संत्र्याचं सेवन फायदेशीर असल्याने महिला दिवसभरात तीन संत्र्यांचं सेवन करू शकते. मात्र जर तुम्ही गरोदरपणामध्ये इतरही विटमिन सी युक्त खाद्य पदार्थांचं सेवन करत असाल तर मात्र तुम्हाला संत्र्याच्या सेवनावर मर्यादा ठेवाव्या लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.