आरोग्यासाठी आहारातून मीठ कमी करायचंय? या पद्धतीने Salt खाणं करा कमी

खरं तर रोजच्या घरात तयार होणाऱ्या स्वयंपाकासोबतच आपण दिवसभर अशा अनेक पदार्थांचं सेवन करत असतो ज्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ वापरण्यात आलेलं असतं. या मिठाचा वापर कमी करण्यासाठी या काही टीप्स
मिठाच्या वापरावर आणा मर्यादा
मिठाच्या वापरावर आणा मर्यादाEsakal
Updated on

मीठ हे एका प्रकारचं व्हाईट पॉयझन म्हणजेच विष मानलं जातं. आहारात जास्त मीठाचं सेवन केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतो. मीठामध्ये असलेल्या सोडियममुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि इतर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. Marathi Health Tips reduce salt percentage in your food to avoid illness

जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) जारी करण्यात आलेल्या एका अहवालातही सोडियमच्या Sodium अतिसेवनामुळे जगभरात मृत्यूचं प्रमाण आणि आजाराचं Illness प्रमाण वाढत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

खरं तर मिठामुळे Salt पदार्थाला चव येते. किंबहूना मीठाशिवाय स्वयंपाक पूर्णच होवू शकत नाही असं म्हणायला हरकत नाही. मात्र या मिठाचं प्रमाण नियंत्रणात असणं गरजेचं आहे. आता मीठ नसेल तर पदार्थाला चव येणार नाही त्यामुळे मीठ आहारातून कसं कमी करावं असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.

खरं तर रोजच्या घरात तयार होणाऱ्या स्वयंपाकासोबतच आपण दिवसभर अशा अनेक पदार्थांचं सेवन करत असतो ज्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ वापरण्यात आलेलं असतं. तसंच असे काही पदार्थ आहेत. ज्यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण कमी वापरूनही पदार्थ रुचकर लागू शकतात. तेव्हा जाणून घेऊयात आहारातून मीठ कसं कमी करता येईल याबद्दल

असं कमी करा आहारातून मीठ

हे पदार्थ खाणं टाळा- प्रोसेस्ड फूड, तसचं डब्बाबंद आणि अनहेल्दी जंक फूडमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन टाळा. त्याएवजी तुम्ही स्नॅक म्हणून फळं आणि काकडी, गाजर अशा पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

हे देखिल वाचा-

मिठाच्या वापरावर आणा मर्यादा
No Salt Diet : तूम्ही एक महिन्यासाठी मीठ पूर्णपणे सोडले तर काय होईल?

तसंच जर तुम्हाला आहारातून मीठ कमी करायचं असेल तर चिप्स, फ्रेंच फ्राइज आणि फरसाण अशा पदार्थांचं सेवन कमी करा. तसचं बर्गर, पिज्जा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात चीझ आणि मेयोनियजचा वापर होतो. ज्यामध्ये मीठ अर्थातच सोडियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे असे पदार्थ खाणं बंद करा.

त्याचप्रमाणे रेडी टू इट किंवा मायक्रोव्हेव डीनर म्हणजे काही इंस्टट पॅकेट फूडमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. तेव्हा असे पदार्थ आहारात न घेणं उत्तम. सलाड ड्रेसिंग आणि कॅचप किंवा सॉसमध्ये देखील सोडियमचं प्रमाण जास्त असतं. तेव्हा असे पदार्थ आहारातून कमी करून त्याएवजी घरगुती चटणी, मुरंबा यांचा समावेश तुम्ही करू शकता.

स्वयंपाक करताना ही काळजी घ्या

स्वयंपाक करत असताना मिठाचा वापर कमी करून विविध हर्बस् किंवा सोडियम नसलेले गरम मसाले किंवा विविध मसाल्यांचा वापर करून तसंच टोमॅटो, कोकम, चिंच, कैरी अशा फळांचा वापर करून पदार्थांची किंवा भाज्यांची चव वाढवा.

विकतचे विविध मसाले किंवा रेडीमेड प्युरी किंवा ग्रेव्ही वापरण्याएवजी घरगुती मसाले आणि पारंपरिक घरगुती वाटणांचा स्वयंपाकासाठी वापर करा.

चपातीची कणीक भिजवताना तसंच भातामध्ये कोशिंबीरीमध्ये तुम्ही थोडं थोडं मीठाचं प्रमाण कमी करू शकता.

जेवणाच्या टेबलवरून मीठाची बरणी काढून टाका. त्याचसोबत अनेकांना टोमॅटो, काकडी, कांदा अशा जेवणासोबत खाण्यात येणाऱ्या ग्रीन सलाडवर मीठ टाकण्याची सवय असते. या मिठाचा वापर बंद करा. मीठ न टाकताच तुम्ही सलादमध्ये लिंबू, किंवा इतर हर्ब टाकू शकता.

अशा प्रकारे तुम्ही काही चांगले पर्याय निवडून आहारातून मीठ कमी करू शकता आणि तुमच्या आरोग्याच्या काळजी घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.