Vitamin D आणि B12च्या कमतरतेने होवू शकतो हा गंभीर आजार...

अनेकदा आपण या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करतो. मात्र काही वेळा हे महागातही पडू शकतं
Importance of Vitamin D and B12
Importance of Vitamin D and B12Esakal
Updated on

Brain healthy foods: आरोग्यदायी राहण्यासाठी पोषक आहार अत्यंत गरजेचा आहे. आहात सर्व व्हिटॅमिन, खनिजं आणि प्रथिनांचा समतोल राखून आहार घेतल्यास नक्कीच निरोगी आयुष्य जगता येतं. काहीवेळा काही विटामिन्सच्या कमतरतेमुळे शारीरीक समस्या  निर्माण होतात. Marathi Health TIps why Vitamin D and B Twelve necessary for body

अनेकदा आपण या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करतो. मात्र काही वेळा हे महागातही पडू शकतं. पार्किन्सन्स हा एक गंभीर आजार आहे. एका नव्या संशोधनानुसार व्हिटॅमिन डी Vitamin D आणि Vitamin B 12 मुळेदेखील हा आजार होवू शकतो. Parkinson's disease

पार्किन्सन्स हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. जेव्हा मेंदूमधील कार्यामध्ये काही अडथळा निर्माण होवून मेंदूच्या कार्यावर प्रभाव पडतो तेव्हा या आजाराची शक्यता वाढते.

यामुळे आपल्या मज्जातंतूवर परिणाम झाल्याने शरीरातील विविध अवयवांवर त्याचा प्रभाव दिसू लागतो. हा आजार अत्यंत गंभीर रुप धारण करू शकतो. कारण शरीरातील ज्या अवयवांवर याचा परिणाम होतो ते अवयव हळू हळू निकामी किंवा हळू काम करू लागतात. 

पार्किन्सन्स आजार हा व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही होवू शकतो असा संबध आता जोडला जात आहे. (Vitamin D and B12 deficiency Parkinson's)

हे देखिल वाचा-

Importance of Vitamin D and B12
Vitamin K Foods  : तुमच्या शरीराला Vitamin K मिळतंय का? त्याची कमी कशी भरून काढाल?

विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे पार्किंसंस

AdoCbl (5’-deoxyadenosylcobalamin) नावाचं कंपाऊंड हे केवळ विटामिन B12 मध्येच आढळतं. जे जीनमधील अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे पार्किंसंस आजारात डोपामाइनचं नुकसान कमी करू शकतं.

डोपामाइन हे शरीराती मज्जातंतूच्या कार्यासाठी आवश्यक असलेलं घटक आहे. जेव्हा डोपामाइनचं प्रमाण कमी होतं तेव्हा मज्जातंतूच्या कामात बिघाड निर्माण होते. 

इतकचं नव्हे तर व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे शरीरातील अवयवामध्ये कंपन निर्माण होते म्हणजेच ठराविक अवयवांवरिल ताबा गेल्याने ते थरथरू लागतात. तसचं व्हिटॅमिन बी१२ सेरोटोनिन (Serotonin) आणि डोपामाइनच्या (Dopamine) निर्मितीसाठी गरजेचं असतं.

विटामिन बी१२ च्या कमतरतेमुले नैराश्य आणि चिंता वाढू शकते. यामुळे पार्किन्सन्सची लक्षण अधिक वाढण्यास आणि स्थिती खराब होण्याची शक्यता असते. vitamin d and b12 deficiency,

विटामिन डीच्या कमरतेमुले पार्किंसंस

व्हिटॅमिन डी मेंदूच्या विकासासाठी आणि त्याचं कार्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतं. पार्किन्सन्स आजार हा न्यूरॉलॉजिकल असून यांच्या लक्षणांना नियंत्रित करण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत गरजेचं आहे. इतकंच नव्हे व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. 

डोपामाइन  सारखे काही न्युरोट्रांसमीटर नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील व्हिटॅमिन डी फायदेशीर ठरतं.  डोपामाइनची कमतरता निर्माण झाल्यास पार्किन्सन्स सारखा आजार जलद गतीने वाढू शकतो.  यासाठीच आहारामध्ये Vitamin D आणि Vitamin B12 चा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. 

व्हिटॅमिन बी१२ हे मुख्यत्वे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणत आढळतं.  यासाठी आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आवर्जुन समावेश करावा. यासोबतच सुकामेवा, रेड मीट आणि माशांमध्ये हे व्हिटॅमिन आढळतं. त्याचसोबत पालक, रताळं, मशरुम या भाज्यांमध्येही व्हिटॅमिन बी १२ आढळतं. 

तर व्हिटॅमिन डी चा नैसर्गित स्त्रोत म्हणजे सुर्य प्रकाश . यासाठी  दररोज किमान अर्धा तास सुर्य प्रकाश  मिळणं गरजेचं आहे. तसच अंडं, मासे, दूध आणि दूग्धजन्य पदार्थांसोबतच तुम्ही पालक, गाजर, ब्रोकली आणि मशरुम या भाज्यांमध्ये आढळत असल्याने आहारात या गोष्टींचा समावेश करा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()