गालांवरून कळेल तुम्ही किती पाणी पिताय, चेहऱ्यावर दिसतात Dehydrationची लक्षणं

Dehydration Symptoms: शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्याने तुमच्या त्वचेवरही त्याचा परिणाम होतो. चेहऱ्याची त्वचा ही अत्यंत नाजुक असल्याने डिहायड्रेशनचा परिणाम चेहऱ्यावर लगेचच होतो
dehydration symptoms
dehydration symptomsEsakal
Updated on

Dehydration Symptoms: मानवी शरीरात Human Body पाण्याचं प्रमाण ७० टक्के असतं आणि म्हणूनच शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा अनेक अवयवांवर परिणाम होत असतो. Marathi Health Tips your face will tell how much water intake you have to avoid dehydration

पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. तसंच याचा रक्ताभिसरणावर Blood Circulation परिणाम झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होवू शकतात. डिहायड्रेशनमुळे Dehydration पचनक्रिया बिघडते तसंच आतड्यांच्या कार्यावर परिणाम होवून बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

त्याच प्रमाणे शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्याने तुमच्या त्वचेवरही Skik त्याचा परिणाम होतो. चेहऱ्याची त्वचा ही अत्यंत नाजुक असल्याने डिहायड्रेशनचा परिणाम चेहऱ्यावर लगेचच होतो. त्यामुळेच तुमचा चेहरा पाहून तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत आहात कि नाही हे लक्षात येऊ शकतं.

१. ड्राय स्किन- शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा रुक्ष झाल्याने तुमचे गाल तडतडू शकतात. गालावर तडे जाणं किंवा गाल अत्यंत रुक्ष दिसणं हे डिहायड्रेशनचं एक कारणं आहे.

२. निस्तेज त्वचा- डिहायड्रेशनमुळे तुमच्या त्वचेच्या सेल टर्नओव्हरसारख्या आवश्यक कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. यामुळे त्वचा निस्तेज आणि थकल्यासारखी दिसू लागते. पुरेसं हायड्रेशन नसल्याने चेहऱ्याच्या पृष्ठभागावर मृत पेशी तयार तयार होतात. ज्याला आपण डेड स्किन म्हणतो. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो कमी होतो. तसंच चेहरा काळवंडलेला दिसतो.

हे देखिल वाचा-

dehydration symptoms
Health Tips : Dehydration पासून स्वतःला ठेवा दूर...

३. डोळ्यांखाली काळी वर्तुळं- डिहायड्रेशनमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल्स म्हणजेच काळी वर्तुळं Dark Circles दिसू लागतात. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम रक्तप्रवाहावर होत असल्याने देखील काळी वर्तुळ दिसू लागतात. यासाठी पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे.

४. सुरकुत्या- चेहऱ्यावरील सुरकुत्या हे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याचं एक लक्षण आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेची लवचिकता कमी होते. चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या वाढू लागताता. यामुळे अनेकदा चेहऱ्यावर अधिक वय दिसू लागतं.

५. चेहऱ्यावर खाज येणं- डिहायड्रेशनमुळे त्वचेतील पाण्याची पातळी कमी होते. परिणामी त्वचा रुक्ष होते. जेव्हा त्वचा अधिक जास्त ड्राय होते तेव्हा त्वचेवर खाज येऊ लागते. त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे.

त्वचेवर ग्लो टिकून ठेवण्यासाठी तसच चेहरा फ्रेश दिसण्यासाठी त्वचा हायड्रेट राहणं गरजेचं आहे.

त्वचा हायड्रेट कशी ठेवावी?

१. पुरेसं पाणी पिणे- त्वचा चांगली किंवा हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. खास करून दिवसाची सुरुवात किमान दोन ग्लास पाणी पिऊन केल्यास त्याचा त्वचेला फायदा होईल.

२. अँटीऑक्सिडंट्स- हायड्रेट राहण्यासाठी पाण्यासोबतच मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असलेल्या भाज्या आणि फळांचं सेवन करणं देखील गरजेचं आहे. यामुळे त्वचा मऊ आणि लवचिक राहण्यास मदत होते.

३. मॉइस्चराइझर- चेहऱ्याला मॉइस्चराइझर लावणंही तितकचं गरजेचं आहे. आंघोळीनंतर लगेचच त्वचेला चांगंल मॉइश्चराइझर लावा. यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते.

अशा प्रकारे पुरेशा पाण्यासोबतच आहारात फळांचा आणि पालेभाज्यांचा समावेश केल्यास तसंच योग्य Skin Care रुटीनच्या मदतीने चेहऱ्याची त्वचा हायड्रेड ठेवणं शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.