Fruits For Weight Loss: जीममध्ये न जाताच 'ही' फळं खाल्ल्याने Belly Fat होईल कमी

अनेक फळांमध्ये कॅलरीजचं प्रमाण अत्यंत कमी असतं तर फायबर मुबलक प्रमाणात असतात. यामुळे अशा फळांच्या सेवनामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. परिणामी फूड क्रेव्हिंग Food Craving कमी झाल्याने वजन कमी होण्यास मदत होते
फळांचे सेवन
फळांचे सेवनEsakal
Updated on

वाढतं वजन Weight Gain ही सध्याच्या घडीची मोठी समस्या बनत चालली असून वाढत्या वजनामुळे आरोग्याच्या Health इतर समस्या देखील निर्माण होवू लागल्या आहेत. लठ्ठपणा किंवा जास्त वजनामुळे डायबेटिस Diabetes, कॅन्सर, थायरॉईड, सांधेदुखी, हृदयाच्या आजारांसह विविध आजारांची समस्या वाढू लागते. Marathi Tips For Health Fruits helpful for weight loss

वजन कमी Weight Loss करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे डाएट Diet करतात. तासनतास जीममध्ये जाऊन वर्कआउट करतात. अनेकदा बेचव असा कमी कॅलरीयुक्त आहार घेतात तर कधी लिक्विड डाएटने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.

मात्र तुम्हाला कमी मेहनत घेऊन जर वजन करायचं असेल आणि खास करून पोटाची चरबी Belly Fat कमी करायची असेल तर तुम्ही नियमित पणे काही फळांचं सेवन करू शकता.

अनेक फळांमध्ये कॅलरीजचं प्रमाण अत्यंत कमी असतं तर फायबर मुबलक प्रमाणात असतात. यामुळे अशा फळांच्या सेवनामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. परिणामी फूड क्रेव्हिंग Food Craving कमी झाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

तसचं जेवणांच्या मधल्या वेळेत इतर जंक फूड किंवा सॅन्क खाण्याएवजी फळाचं सेवन केल्यास पोटही भरेल आणि शरीराला आवश्यक विटामिन, खनिजं, फायबर आणि इतर पोषक तत्व मिळतील. तेव्हा पाहुयात वजन कमी कऱण्यासाठी कोणत्या फळांचं सेवन फायदेशीर ठरू शकतं.

सफरचंद- भारतामध्ये साधारण संपूर्ण वर्षभर उपलब्ध असणाऱ्या फळांपैकी एक फळ म्हणजे सफरचंद. सफरचंदामध्ये अत्यंत कमी कॅलरी असून फायबरचं प्रमाण जास्त असतं. एका मोठ्या सफरचंदामध्ये ५.४ ग्रॅम फायबर असतं.

एका संशोधनानुसार दररोज सफरचंद खाल्ल्याने वजम कमी होण्यास मदत होते. तसचं यामुळे अनेक शारीरिक समस्या कमी होतात.

हे देखिल वाचा-

फळांचे सेवन
सकाळी उठल्यावर करा ‘या’ गोष्टी झपाट्याने कमी होईल वजन Weight Loss

कलिंगड-कलिंगडामध्ये देखील कॅलरीजं प्रमाण कमी असून पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तसंच यात फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळेज वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचं सेवन फायदेशीर ठरतं.

पपई- पपईमध्ये फायबरसोबतच विटामिन सी आणि विटामिन ए मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. पपईमुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. तसचं यातील फायबरमुळे वजनी कमी होण्यास मदत होते. नियमितपणे पपईचं सेवन केल्यास मेटाबोलिज्म बूस्ट होण्यास मदत होते आणि यामुळेच शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होवून वजन कमी होतं.

बेरीज- स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरीज, ब्लूबेरिज अशा बेरीजमध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यंत कमी असतं. तर यामुळे इतर अनेक विटामिन्स आणि पोषक तत्व आढळतात. बेरीजच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब अशा समस्या कमी होण्यास मदत होते. वजन जास्त असलेल्या अनेक व्यक्तींमध्ये या समस्या आढळून येतात.

यासाठीच बेरीजचं सेवन केल्याने या समस्या कमी होवून वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

संत्र- संत्र हे विटामिन सीचं एक प्रमुख स्त्रोत आहे. शिवाय यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असल्याने वजन कमी करण्यासाठी संत्र्य़ाचं सेवन फायदेशीर ठरतं. शरीरासाठी विटामिन सी हे अत्यंत फायदेशीर आहे.

विटामिन सी मुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हाडं मजबूत होतात आणि वजनही कमी होतं. वजन कमी करण्यासाठी महिलांनी दररोज ७५ मिलीग्रॅम आणि पुरुषांती प्रतिदिन ९० मिलीग्रॅम विटामिन सीचं सेवन करणं गरजेंचं आहे.

अशा प्रकारे नियमितपणे आहारामध्ये या फळांचं सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल, शिवाय फळांच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत असल्याने आजारांपासूव दूर राहता येईल आणि हेल्दी राहण्यास मदत होईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.