Matcha Tea : ग्रीन टीला बगल देत जपानी लोक का पित आहेत माचा टी ?

Matcha Tea Good For Health : चहाला पर्याय म्हणून कॉफी, या दोन्हींना पर्याय म्हणून ग्रीन टी, आणि आता ग्रीन टीला सुद्धा जपानी लोकांनी पर्याय शोधला आहे.
Matcha Tea healthy benefits
Matcha Tea healthy benefits
Updated on

Matcha Tea Good For Health :

गेल्या काही वर्षात लोक आरोग्याप्रती जागरूक झाले आहेत. त्यामुळेच चहा कॉफी अशा कॅफेनयुक्त पदार्थांना बगल देत हेल्दी ड्रिंककडे वळले आहेत. भारतीय लोकांच्या आवडत्या चहाची जागा ग्रीन टीने घेतली. जगभरात ग्रीन टी चे अनेक चाहते आहेत. जपानी लोक मात्र यापेक्षा वेगळे आहेत.

चहाला पर्याय म्हणून कॉफी, या दोन्हींना पर्याय म्हणून ग्रीन टी, आणि आता ग्रीन टीला सुद्धा जपानी लोकांनी पर्याय शोधला आहे. ग्रीन टी कितीही फायदेशीर असली तरी त्यामध्ये काहीतरी कमी आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळेच त्यांनी माचा टी शोधून काढली आहे.

Matcha Tea healthy benefits
Tea Prices: आता चहा पिणेही होणार महाग? भारतीय चहा उद्योग संकटात, काय आहे कारण?

जपानी लोकांनी काही नवीन तंत्रज्ञान विकसित केला आहे जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं नाही. जपानी संस्कृती जगभरात प्रसिद्ध. त्यांच्या वेगवेगळ्या खाण्याचे पदार्थ, जपानची प्राचीनता. त्यांचे उत्सव या सर्वालाच एक वेगळाच संस्कृतिक दर्जा आहे. ही माचा टीसुद्धा त्यांच्या संस्कृतीचेच दर्शन घडवणारी आहे.

जपानी लोक थंडीमध्ये गरम गरम माचा टी घेतात तर कडक उन्हाळ्यात थंडगार माचा ड्रिंक सुद्धा घेतात. हेच त्यांच्या अधिक वयोमर्यादेचे सीक्रेट मानले जाते. जाणून घेऊया माचा टी आपल्यासाठी किती फायदेशीर आहे.

Matcha Tea healthy benefits
Green Tea Side Effects : वजन कमी करण्यासाठी 'ग्रीन टी' पिताय? मग, 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या

काय आहे माचा टी?

माचा टीही ग्रीन टीचाच एक भाग आहे. जी पावडर स्वरूपात वापरली जाते. ग्रीन टी काही वेळ पाण्यात टाकून ती गाळून त्याचे सेवन केले जाते. मात्र माचा टी पावडर गरम पाण्यात थेट टाकून तुम्ही पिऊ शकता. ग्रीन टी च्या तुलनेत माचा टी अधिक आरोग्यदायी आणि अँटिऑक्सिडंटने भरपूर एक ड्रिंक आहे.

माचा टी पिण्याचे काय फायदे आहेत?

हेल्थ न्यूज टुडे यांच्यामते, माचा टीमध्ये अँटीट्यूमर गुणधर्म असतात. अँटिऑक्सिडंट युक्त काही गुणधर्म असे आहेत जे आपला कॅन्सरपासून बचाव करतात. जर तुम्ही याचे नियमित सेवन केले तर ब्लड कॅन्सर आणि पेशी वाढणे-कमी होणे अशा आजारांचा धोका कमी होता.

सध्या हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. त्यावरती हा चहा बेस्ट आहे. कारण माचा चहामध्ये असलेले पौष्टिक वेगळेपण हे आपल्याला कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या विकारांपासून दूर ठेवते. त्यामुळे आपल्याला हृदयाच्या आजारांपासून दूर राहता येते.

Matcha Tea healthy benefits
International Tea Day 2024 : चहा करतांना 'या' गोष्टी टाळा; आपोआप चहाची चव वाढेल

जर तुम्ही दिवसातून दोन कप या चहाचे सेवन केले तर तुम्हाला मधुमेहासारख्या गंभीर आजारापासून स्वतःचे संरक्षण करता येईल. मधुमेह टाईप-१ आणि टाईप-२ यांचा धोकाही हा चहा टाळतो. हा चहा वजन कमी करणे, ब्लड प्रेशर नाही नियंत्रित ठेवतो.

जर तुम्हाला चहा सोडायचा नसेल तर तुम्ही हा माचा टीचा अनेक प्रकारे तुमच्या डायटमध्ये समावेश करू शकता. त्यासाठी तुम्ही स्मूदी, हेल्दी ड्रिंक, कोमट पाण्यासह, माचा पावडरचे कुकीज बनवून खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.