Measles Symptoms : गोवरची लागण कशामुळे होते? जाणून घ्या कोणते लसिकरण ठेवेल गोवरला दूर

आता गोवर संसर्गजन्य आजार
Measles Symptoms
Measles Symptomsesakal
Updated on

Measles Symptoms : आपल्याला दोन तीन वर्ष कोकोनाचा सामना करावा लागला आहे. कोरोना आता संपला असला तरीही कोरोनासारखे व्हायरल आजार आता मोठ्या प्रामाणात पसरत आहेत. मधल्या काळात मंकीपॉक्ससारखे आजारही पसरले. आता गोवर हा संसर्गजन्य आजार पसरला आहे. मुंबई पूण्यासारख्या मोठ्या शहरात अनेक लोकांना याचा संसर्ग होत आहे. याबद्द्ल आधिक जाणून घेऊयात.

Measles Symptoms
Measles : गोवर उद्रेकाची मुंबईत भीती!

गोवर हा हवेतून विषाणूपासून पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे. गोवर आजार विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात झालेला आढळतो. तसेच काहीवेळा मोठेपणीही गोवर होऊ शकते. गोवर आजार एकदा झाल्यास पुन्हा तो आजार त्या व्यक्तीला होत नाही. गोवर हा रोग पॅरामॅक्सोव्हायरस (Paramyxovirus) या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. शरीरात या विषाणूंची लागण झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे जाणवू लागतात.

Measles Symptoms
Measles in Mumbai : मुंबईत गोवरचा कहर; मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

गोवर हा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवराची साथ येत असते. गोवर आजाराने संक्रमित व्यक्तीच्या खोकला, शिंका यातून गोवराचे विषाणू हवेत पसरतात. आणि विषाणूंच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना गोवर आजार होतो.

Measles Symptoms
Measles vaccination : डब्ल्यूएचओ करणार लसीकरणाबाबत मार्गदर्शन

काय काळजी घ्यावी

गोवरचे सुरुवातीची लक्षणे दिसल्यास वेळ वाया न घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. रक्त तपासणीनंतर तुम्हाला कोणता आजार आहे हे स्पष्टपणे कळेल. त्यानंतरच डॉक्टर तुम्हाला गोवरची लस देतील.

Measles Symptoms
Measles Infection : मालेगाव येथे पन्नासवर बालकांना गोवरची लागण

लहान बालकांना आवश्यक त्या लसी वेळेवर द्याव्यात. गोवर उठलेल्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे. गोवर असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. दूषित हातांचा स्पर्श आपले तोंड, डोळ्यांना करू नये.

Measles Symptoms
Measles : लहान मुलांना गोवरचा धोका; काय काळजी घ्याल ?

गोवर आणि लसीकरण

MMR ही लस या आजारावर दिली जाते. या लसीमुळे गालगुंड, गोवर आणि वाऱ्याफोड्या ह्या तीन आजारांपासून रक्षण होते. MMR vaccine लहानपणी दिली जाते. त्यामुळे पुढे गालगुंड, गोवर आणि रूबेला अशा आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

Measles Symptoms
measles disease : गोवंडी परिसरात गोवरचा संसर्ग

लहान बालकांना नवव्या महिन्यात गोवरची लस देतात व दुसरा डोस दीड ते दुसऱ्या वर्षी देतात. गोवराची लस दिलेल्या मुलांना आयुष्यात पुढे कधीही गोवर आजार होत नाही. मोठ्या लोकांसाठीही गोवरची लस दिली जाते. यामूळे फोड्या कमी होतात आणि सात आठ दिवसांनी त्याचा त्रासही कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.